Chhatrapati Sambhaji nagar Crime News
कुंडलवाडी (छत्रपती संभाजीनगर) : कुंडलवाडी (ता.बिलोली) शहरापासून 04 कि.मी.अंतरावर असलेल्या अर्जापूर येथे पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने स्वतः जाळून घेतल्याची घटना सोमवार (दि.21) रोजी उघडकीस आली. पत्नी व प्रियकराविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पत्नीचे गावातीलच शंकर लिंगप्पा पांचाळ (वय 52) याच्याशी अनैतिक संबंध जुळले होते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये दररोज भांडणे होत असत. रोजच्या अनैतिक संबंधाला कंटाळून रविवार (दि.20) रोजी आनंदा जाधव यांनी रात्री 10:55 वाजताच्या सुमारास स्वतःला पेटवून घेतले असता, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मौजे अर्जापूर येथे आनंदा हणमंतराव जाधव (वय 40, व्यवसाय मजुरी) आणि पत्नी राजश्री आनंदा जाधव (वय 33) हे रहात होते. घटनेची माहिती मिळताच कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी श्यामराव हणमंतराव जाधव यांनी कुंडलवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी राजश्री आनंदा जाधव आणि प्रियकर शंकर लिंगप्पा पांचाळ या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मांजरमकर करत आहेत.