पनवेल : विक्रम बाबर
वीज चोरीच्या वाढत्या प्रकरणांनी पनवेल तालुक्यात खळबळ माजवली आहे. पनवेल तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 23 हजार 894 युनिटच्या वीज चोरीचा पर्दाफाश नेरे शाखेचे सहायक अभियंता रत्नाकर गंगाराम जाधव यांनी केला आहे. ही कारवाई केल्या नंतर, तब्बल सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जवळपास 5 लाख 84 हजार रुपयांची चोरी झाली आहे
विद्युत विभागाने वीज चोरीला आळा घालण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वीज चोरी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नेरा शाखेच्या सहाय्यक अभियंता रत्नाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली वीज चोरीवर विशेष कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वीज चोरी करणार्यांची नावे समोर आली आणि पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
नेरा शाखेच्या अंतर्गत येणार्या विहिघर, नेवाळी आणि तभोडे येथे विशेष कारवाई केली आहे.या ठिकाणी अचानक धाडी मारल्या नंतर हा सर्व गैर प्रकार समोर आला आहे. यामध्ये वीज ग्राहकाने विजेची चोरी करून विजेचा गैरवापर करत आल्याचे कारवाईत समोर आले आहे. या कारवाईमुळे परिसरात आत्ता खळबळ माजली आहे.
विहिघर, नेवाळी आणि टेंभोडे गावांमधील वीज चोरीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रत्येक गावेतील वीज चोरीचा तपास करून, त्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली गेली आहे.
विहिघर येथील नाथा रघुनाथ फडके आणि कृष्णा दास नायर यांची वीज चोरी पकडली गेली, ज्यामुळे या दोन प्रकरणांमध्ये एकूण 2 लाख 82 हजार 740 रुपयांची चोरी झाली आहे.
नेवाळीमध्ये तीन वीज चोरीचे प्रकरणे उघडकीस आली, ज्यात मुक्ता मारुती काथारा, मच्छिंद्र वसंत काथारा आणि जोमा पदु पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. यातील एकूण वीज चोरीची किंमत 2 लाख 31 हजार 950 रुपये आहे.
टेंभोडेमध्ये विक्रम विठ्ठल म्हसकर आणि गणेश गोपाल गडगे यांच्या नावांवर कारवाई झाली असून, या प्रकरणांमध्ये 69 हजार 850 रुपयांची वीज चोरी झाली आहे.