भिवंडी : भिवंडी मध्ये हुंडा दे नाहीतर तलाक दे असे सांगत पती आणि सासरच्या मंडळीनीं विवाहितेला चटके दिल्याचा प्रकार समोर आला असून, सदर महिलेच्या तक्रारीवरून पती आणि सासरच्या मंडळींविरोधात भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीसह सासरच्या सहा जणांनी आपसात संगनमताने हुंड्यासाठी विवाहितेला तलाक देऊ न तिला चटके देत छळ केल्याचा संतापजनक प्रकार भिवंडीतून समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह सहा जणांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती फैसल अन्वर अली अन्सारी, सासु किताबुनिसा अन्वर अली अन्सारी, नसरीन जमशेद अन्सारी, जमशेद फारूख अन्सारी, यास्मीन शोहेब अन्सारी, शोहेब फारूख अन्सारी अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता (36) हिचा फैसल याच्याशी 24 जानेवारी 2016 रोजी निकाह झाला असून ती तेव्हापासून सासरच्या मंडळीसोबत राहत आहे. दरम्यान 2016 पासून ते 2025 पर्यंत पती फैसलसह सहा जणांनी शमाने माहेरहून हुंडा म्हणून घर घेण्यासाठी 4 लाख रुपये आणावेत यासाठी तगादा लावून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली आहे. तसेच फैसलने दुसरा लग्न करण्याची धमकी देवून तलाक दिला आहे. यासह चटके देवून तिला शारीरिक, मानसिक छळ केला आहे. त्यामुळे या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने 5 एप्रिल रोजी शांतीनगर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या छळाचे पोलिसांना कथन करताच पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोह अनिल शिरसाठ करीत आहेत. 2014 पासून ते एप्रिल 2019 पर्यंत सासरच्या मंडळींनी आपसात संगनमत करून विवाहितेचा हुंड्यांसाठी शारिरिक मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.