Minor girl Sexual Assault Case
पिंपळनेर,जि.धुळे : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले. यातून ती गर्भवती झाल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील मांजरी गावात घडला. पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे.
साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मांजरी गावात एक अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधून गावातच राहणाऱ्या तरुणाने मुलीला आपल्या घरी बोलावून घेतले. मुलीने विरोध केला असता तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने वारंवार मुलीशी संबंध ठेवले. त्यातून मुलगी 8 महिन्याची गर्भवती झाली. अल्पवयीन मुलीने पिंपळनेर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली असून बुधवारी (दि.9) रोजी दुपारी 4 वाजता संशयित अनिल बाबुराव माळचे (वय 20,रा. मांजरी ता.साक्री) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच रात्रीतूनच अनिल माळचे याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक बी.जी.शेवाळे करत आहेत.