स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाकडून केलेल्या कारवाईत राजस्थान व मालेगाव येथील एमडी ड्रगची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली Pudhari News Network
क्राईम डायरी

Dhule MD Drugs News : धुळ्यात एमडी ड्रगची तस्करी करणारे दोघे अटक; कारसह 17 लाखांचा ऐवज जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

धुळे : जळगाववरून धुळ्याकडे येणाऱ्या कारमधून एमडी ड्रगची तस्करी उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत राजस्थान व मालेगाव येथील प्रत्येकी एकास अटक करण्यात आली असून दोघांची चौकशी सुरू आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर संशयित जीजे 16 डीएस 0314 क्रमांकाची कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही आरोपींनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची नावे सय्यद अतीक सय्यद रफीक (मालेगाव) व मजहर खान युसुफ खान (बासवाडा, राजस्थान) अशी आहेत.

झडतीत सय्यद अतीककडून 104 ग्रॅम वजनाचे एमडी पावडर (किंमत रु. 10.40 लाख) मिळाले. तसेच कार, तीन मोबाईल यांसह एकूण रु. 17.51 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, अटक केलेल्या आरोपींनी यापूर्वीही धुळे शहरात एमडी ड्रगची विक्री केल्याची माहिती मिळाली आहे. हे ड्रग प्रामुख्याने उच्चभ्रू लोकांच्या पार्टींमध्ये वापरले जात असल्याचेही प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, धुळ्यातील संभाव्य खरेदीदार व तस्करीचे नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT