गांजाची तस्करी  file photo
क्राईम डायरी

Dhule Crime | गांजाची तस्करी करणारे दोघे गजाआड

विनानंबरप्लेट वाहनातून गांजाची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

धुळे : नंबर प्लेट नसलेली दुचाकी थांबवल्याने गांजाची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने या दुचाकी वरील तरुणांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे . या संदर्भात आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने जिल्हाभरात नाकाबंदी तसेच संशयित वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली होती. त्यानुसार धुळे जिल्हयात नाकाबंदी आयोजित केली असता मोहाडी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, पोलीस हेड कॉन्सटेबल भुषण सपकाळे, निलेश पाटील, प्रकाश लोहार, निलेश सावळे आदींनी वरीष्ठांच्या सुचना समजावुन सांगुन पोलीस स्टाफ यांना लळींग टोल नाका येथे नाकाबंदी करुन टोल नाका येथे मोटार सायकल व लहान मोठी वाहने चेक करण्याबाबत आदेशित केले होते.

नाकाबंदी दरम्यान धुळेकडून दोन इसम हे त्यांचे ताब्यातील मोटारसायकलवर आले असता या मोटार सायकलच्या समोरील नंबर प्लेटवर वाहन क्रमांक नमुद नसल्याने पोलीसांनी मोटार सायकल थांबविली. मोटार सायकलची पाहणी केली असता मागील बाजूस नंबर प्लेटवर एमपी 18 पी 1086 असा वाहन क्रमांक व सदर मोसा ही हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो. मॉडेल असल्याचे दिसून आले.

मोटार सायकल चालक व त्याचे मागे बसलेला इसम अशांना त्यांचे नांव गांव विचारता मोटार सायकल चालक याने त्याचे नांव जयराम सरप्या पावरा ( रा. निंबारी ता. शिरपुर), असे सांगितले. त्याच्या मागे बसलेला इसमाने त्याचे नाव नाश-या जायन्या पावरा (भिल), (रा. गोवाडी, ता. नेवाली) असे असल्याचे सांगितले. सदर मोटार सायकलवर दोन्ही इसमांचे मध्ये असलेल्या एक पिवळया गोणीमध्ये काय आहे, याबाबत विचारणा केली असता वरील दोन्ही नमुद इसमांनी उडवा-उडविचे उत्तर दिल्याने पोलीस पथकाने गोणी उघडण्यांस सांगितले. गोणीमध्ये एक प्लॅस्टीक कॅरीबॅगमधे 66,686 /- रुपये किंमतीचा गांजा आढळला. पोलिसांनी 50 हजार रुपये किंमतीची एक मोटार सायकलसह एकुण 1,16,686 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत मोहाडी पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT