वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, उपनि. अजय शितोळेसह पथक यांचे सोबत खाली बसलेले दोन आरोपी.  (छाया बबन गायकवाड)
क्राईम डायरी

Chhatrapati Sambhajinagar Crime : शेंदुरवाद्यातील वयोवृध्दाच्या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश

चोरलेल्या दुचाकीमुळे दीड वर्षानंतर दोन आरोपी पोलिसांच्या गळाला

पुढारी वृत्तसेवा

Police succeed in investigating the murder of an elderly person in Shendurwadya

वाळूज (छत्रपती संभाजीनगर ) : दीड वर्षापूर्वी आव्हानात्मक ठरलेला खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात वाळूज पोलिसांना अखेर यश आले आहे. घटनेतील दोन आरोपींच्या पोलिसांनी बुलढाणा येथून मुसक्या आवळल्या आहेत. सदरची घटना २६ मे २०२४ रोजी शेंदुरवादा गावातील भरवस्तीत मध्यरात्री घडली होती. चोरून आणलेल्या दुचाकीने अखेर खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठी मदत केली. खुनाच्या घटनेतील दोन्ही आरोपी पोलिसांच्या गळाला लागले.

बुलढाणा कारागृहात जेरबंद असलेले आरोपी महेश कांचा काळे (रा. बोरूडी गायरान, सावखेडा. ता. गंगापूर) आणि मंजू कांताराज पवार (डोमेगाव, ता. गंगापूर) या दोघांना अटक केली. याविषयी पोलिसांनी सांगितले की, दिड वर्षापुर्वी वाळूज पोलिस ठाणे हद्दीतील शेंदुरवादा येथे २६ मे रोजी रात्री नारायण पंढरीनाथ निकम (७०) हे घराबाहेर झोपलेले होते तर त्यांची पत्नी बाहेरगावी गेलेली होती. घरात त्यांची सून अन्नपुर्णा नानासाहेब ही एकटी होती. रात्री चोरटे घरात चोरी करीत असतांना घराबाहेर अंगणात झोपलेला वृध्द जागा झालेला चोरट्याच्या नजरेत पडला होता. ते आपल्याला ओळखतील आणि आपले बिंग फुटेल असे वाटल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याने ते जागेवरच कोसळले. सुनेला आवाज आल्याने तिने दरवाजा उघडून पाहीले त्याचवेळी चोरट्यांनी तिच्याकडेही धाव घेत तिच्या कानातील, गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. तिलाही चोरट्यांनी मारहाण केली. आरडा-ओरड झाल्याने ग्रामस्थ आल्याने चोरट्यांनी धुम ठोकली होती. बेशुध्दावस्थेतील निकम यांना उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले होते.

डॉक्टरांनी तपासून नारायण निकम यांचा मृत्यु झाल्याचे जाहीर केले. माहिती मिळताच वाळूजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोउपनि अजय शितोळे, कारभारी देवरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर सकाळी गुन्हे शाखेचे तत्कालिन वरिष्ठ पोनि. संदिप गुरमे यांनीही पथकासह शेंदुरवादा गाठले. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी विशेष पथकाचे पोउपनि. अजय शितोळे यांचे एक पथक नियुक्त केले होते. पथकाने त संपूर्ण परिसर पिंजून काढीत हद्दीतील पोलिस ठाण्यातील गुन्हेगाराची कसून पडताळणी सुरु केली होती. मागील आठ दिवसांपुर्वी लोणार (जि. बुलढाणा) येथे खून, जबरी चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहीती पथकाला मिळाली. पथकाने थेट बुलढाणा गाठून तेथील कारागृहात जेरबंद अस-लेले आरोपी महेश कांचा काळे आणि मंजू कांताराज पवार या दोघांना ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींना वाळूज पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीचे गेलेले दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहे. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर सहाय्यक पोलिस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोउपनि. अजय शितोळे, अंमलदार संदिप धनेधर, विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, स्नेहलकुमार गवळी, किशोर गाडेकर, अमन शेख आदींनी केली.

कारागृहात बुलढाणा जेरबंद होते आरोपी

पोलिसांच्या तपासात बुलढाणा कारागृहात जेरबंद असलेले हे दोन आरोपींनी लोणार भागात अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. एका वयोवृध्दाचा खून करून लोणार येथून एक दुचाकी चोरी करून ती वाळूज येथे आणली असल्याचे समोर आले. दुचाकी वाळूज पोलिस ठाण्यात लावून तेथून दुसरी दुचाकी लांबविली अशी माहिती हाती आली. सदर दुचाकीचा तपास गुन्हे शाखेचे पोउपनि. अजय शितोळे हे करीत होते. या दुचाकीनेच शेंदुरवाद्याच्या खुनाच्या घटनेला वाचा फोडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT