क्राईम डायरी

आता सट्टा मार्केटचे पावसाच्या अंदाजावर बेटिंग

अनुराधा कोरवी

आयपीएल क्रिकेट सामने आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर जोरदार बेटिंग लावण्यात आले होते. त्यानंतर आता सट्टा मार्केट पावसाच्या अंदाजावर बेटिंग घेण्यास सज्ज झाले आहे. पावसाच्या अंदाजवर बेटिंगचा नुकताच भाव फिक्स झाला आहे. मिलीमीटरनुसार कोसळणार्‍या पावसाच्या अंदाजवर भाव ठरवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पावसावर लावण्यात येणार्‍या बेटिंगमध्ये कुठलीही फिक्सिंग करता येत नसल्याने पावसावर बेटिंग लावण्यावर सट्टेबाज सर्वाधिक पसंती देतात.

कधीकाळी मनोरंजन म्हणून खेळला जाणारा सट्टा अर्थात् बेटिंग हा खेळ दिवसेंदिवस आपले स्वरूप बदलत आहे. क्रिकेट, राजकारण आदी कारणांमुळे सट्टा बाजार हा हजारो कोटींची उलाढाल करणारा धंदा बनला आहे. साहजिकच, त्यामुळे बडे डॉन आणि व्यापारी या धंद्यात उतरले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लागणार्‍या हजारो कोटींच्या घरात बेटिंग लागली होती. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणूक निकालावरदेखील जोरदार सट्टा लागला होता. त्यामुळे अनेक बेटिंग अँप कंपन्या मालामाल झाल्या आहेत. आता सट्टा मार्केटने पावसावर बेटिंग घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 7 जून रोजी पावसावर सट्ट्याचा भाव फिक्स करण्यात आला आहे. कमी अधिक प्रमाणात कोसळणार्‍या पावसाच्या मिलीमीटरनुसार भाव फोडण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या चार महिन्यांत 1600 मिलीमीटर पाऊस होईल असा अंदाज बुकींनी वर्तवला असून, त्यासाठी 27 पैसे असा भाव फोडण्यात आला आहे.

सटोरींची पसंती!

नियमित सट्टा खेळणार्‍या सटोरींची पसंती मात्र पावसावर पैसा लावण्यावर अधिक दिसून येते. त्याला कारण म्हणजे पाऊस हा पूर्णता नैसर्गिक असून त्यात कुठल्याही प्रकारे फिक्सिंग करता येत नाही. म्हणून सटोरी पावसावर पैसा लावतात, अशी माहिती सट्टा बाजारातील एका बुकीने दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT