भूमिपुत्र

शेवंतीची कुंडीत लागवड

Shambhuraj Pachindre

शेवंतीच्या फुलांची बहरलेली कुंडी शोभिवंत दिसते. अशा शेवंतीच्या कुंड्या इमारती, मोठी उपहार गृहे, कार्यालये इत्यादी ठिकाणी ठेवण्यासाठी उपयोगात आणतात. त्यामुळे शेवंतीच्या फुलांनी बहरलेल्या कुंड्यांची बाजारात मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. लग्‍न समारंभ किंवा तत्सम कार्यक्रमात या कुंड्या काही काळ ठेवण्याचीही मागणी अलीकडे दिसून येत आहे. शेवंतीच्या कुंडीत लावण्यासाठी अप्पू, हेमंत सागर, सुहाग सिंगार, मोहिनी, मिरा इत्यादी जाती योग्य आहेत. या जातीची कुंडी लागवड केल्यानंतर काठीचा आधार देण्याची आणि झाडाची शेंडा खुडण्याची आवश्यकता नाही. विविध आकाराच्या, उंचीच्या आणि रंगांच्या कुंड्या उपयोगात आणून आणखी आकर्षकता आणता येऊ शकते.

SCROLL FOR NEXT