शरयू माने
गोदावरीच्या पाण्याचा उपसा तेलंगणात आणल्याशिवाय दुसरा पर्याय सरकारकडे नव्हता; पण तेलगंणा सरकारने कालेश्वरम् हा जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प 80 हजार कोटींमध्ये उभा केला. त्याला यश आले, हा सिंचन क्षेत्रातील एक चमत्कार, तसेच एक विक्रम ठरला.
हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर 1948 मध्ये हा भाग भारतीय संघराज्यात विलीन झाला. हैदराबाद हे शहर तेलंगणाची राजधानी म्हणून ओळखले जाऊ लागले. तेलगू ही इथली प्रमुख भाषा आहे. आंध्र प्रदेशाचा भाग असलेले हे शहर दि. 2 जूून 2014 रोजी भारताचे स्वतंत्र 29 वे राज्य म्हणून स्थापन करण्यात आलेले आहे. तेलंगणा, त्रिलिंग अशी तेलंगणाची नावे आहेत. तेलंगणा उत्तर कर्नाटक आणि विदर्भ यांच्या सीमेलगत स्थित आहे. तेलंगणा हा भारताचा भौगोलिक तसेच ऐतिहासिक भाग गोदावरीच्या खोर्यात वसलेला आहे. तांदूळ इथले प्रमुख पीक आहे. या प्रदेशाला ऐतिहासिक वारसा आहे. बराच काळ हा भाग सातवाहन, निजामशाही आणि कुतूबशाही यांच्या सत्तेच्या अमलाखाली राहिला. साम्यवाद आणि नक्षलवाद या प्रदेशात लक्षणीयरीत्या अनुभवास येतो. चारमिनार हे पर्यटनस्थळ ऐतिहासिक वारसा टिकवून आहे. पर्यटकांचे हे एक आकर्षणाचे माध्यम आहे. दि. 2 जून रोजी राज्याच्या वायव्य भागाचे विभाजन करून तेलंगणाची निर्मिती करण्यात आली आणि हैदराबाद विभागले जाऊन तेलंगणाला हस्तांतरित करण्यात आले. अशारितीने आंध्र प्रदेश विभाजित झाले.
तेलंगणा कधीकाळी दुष्काळी प्रदेश होता. तेथे सरकारी योजना, प्रकल्प राबविण्यात आले. कालेश्वरम् प्रकल्प हा सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प गोदावरी नदीवर उभारण्यात सरकारला यश आले. हा KLIP (Kaleshwaram Lift irrigation Project) भूपालपल्ली येथील बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आहे. हा प्रकल्प फक्त तीन वर्षांमध्ये पूर्णत्वाला आणला गेला. या सिंचन प्रकल्पाला सर्वात दूरचा प्रवाह प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमावर आहे. प्राणहिता ही नदी पैनगंगा, वैनगंगा आणि वर्धा या तीन नद्यांसह विविध लहान उपनद्यांच्या संगमातून बनलेली आहे. ज्यांचा विसर्ग 280 टीएमसीपेक्षा अधिक आहे. या नद्यांचा प्रवाह दुर्लक्षित क्षेत्रातून म्हणजेच मानवाच्या रेलचेलीपासून लांबच्या क्षेत्रामध्ये जंगले, अभयारण्ये अशा ठिकाणांहून पुढे जात असल्याने तो भाग अजूनही वापरात नाही.
कालेश्वरम् उपसा सिंचन प्रकल्प 13 जिल्ह्यांमधून सुमारे 500 कि.मी.पेक्षा (1100 मैल) जास्त कालव्याच्या क्षेत्राचा वापर करतो. या प्रकल्पाचे उद्दिष्ट दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करणे, अर्थात 240 टीएमसी पाणी सिंचन व्हावे हा आहे. पैकी 195 टीएमसी मेडिगड्डा बॅरेजमधून, श्रीपाद येल्लमपल्ली प्रकल्पातून 20 टीएमसी आणि भूजलापासून 25 टीएमसी वापरात यावे ही संकल्पना राबवलेली आहे. हे पाणी 169 टीएमसी सिंचनासाठी, 30 टीएमसी हैदराबाद महापालिकेच्या पाण्यासाठी, 16 टीएमसी औद्योगिक आणि 10 टीएमसी जवळच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वाटपासाठी विभाजित करून वाटप करण्यासाठी नियोजनात आहे. या प्रकल्पाचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे 13 जिल्ह्यांतील लागवडयोग्य क्षेत्रे, अपस्ट्रिम आणि डाऊनस्ट्रिम घटकांचा विचार करून 18,25,000 फूट क्षेत्र विस्तारित करणे आहे. सीसीएस स्थिर करणे हा एक भाग आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन दि. 21 जून 2019 रोजी तेलंगणाचे राज्यपाल नरसिंहन आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (तेलंगणा) व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते झाले. प्रकल्पाच्या बाहेर जाण्याचे व्यवस्थापन चार मोठ्या प्रमुख पंपिंग सुविधेअंतर्गत झालेले आहे. आंतरिक वादाचे प्रभावीपणे निराकरण करत राज्याने प्रत्येक प्रशासकीय अडथळ्यांना दूर करत तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे काम तडीस नेले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील सुमारे 45 लाख एकर क्षेत्राला पाणी मिळत आहे. या प्रकल्पाअंतर्गत मेडिगट्टा बंधार्याचा महाराष्ट्राला फायदा होणार आहे. या बंधार्यातून पाण्याचा उपसा होऊन गडचिरोलीतील पेंढीपाका, रंगयापल्ली, टेकाडा, रेगुंठा या सिंचन योजनांना हातभार लागावा हा हेतू होता. तेलंगणा सरकारद्वारे तुमडीहेटी बंधारा बांधून या बंधार्यातील पाण्याचा वापर करून चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोलीसारख्या दुष्काळी भागाला सिंचनाचा लाभ करून देण्याच्या हेतूने साकार करण्याच्या वाटचाली चालू राहिल्या. तेलंगणा राज्य दरम्यानच्या काळात सतत दुष्काळ आणि शेतकारी अत्महत्येच्या प्रश्नाला तोंड देत बिकट संकटाच्या साखळीत अडकलेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सिंचन योजनांना प्राधान्य देण्यास आरंभ केला. गोदावरी ही तेलंगणाची प्रमुख नदी असल्याने तिचाच आधार या प्रकल्पाला अपरिहार्य असला, तरी परिस्थिती दुर्मीळ होती. गोदावरी समुद्रसपाटीपासून 150 मीटर उंचीवरून वाहते. त्यापेक्षा उंचीवर असलेले 650 मीटर इतक्या उंचीच्या भूभागावर स्थित तेलंगणा हे राज्य या प्रकल्पाच्या सुविधांना अनुकूल ठरत नव्हते. गोदावरीच्या पाण्याचा उपसा तेलंगणात आणल्याशिवाय दुसरा पर्याय सरकारकडे नव्हता; पण तेलगंणा सरकारने कालेश्वरम् हा जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प 80 हजार कोटींमध्ये उभा केला. त्याला यश आले, हा सिंचन क्षेत्रातील एक चमत्कार, तसेच एक विक्रम ठरला.
गोदावरी नदीचे रोज 13 टीएमसी पाणी 14.09 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून मेडिगट्टा बंधार्याकडे वळते. या बंधार्यातून तेलंगणामधील 13 जिल्ह्यांतील 145 टीएमसी क्षमतेने 20 लहान-मोठ्या जलाशयांत बोगद्यांद्वारे पाणी सोडले जाते. या प्रकल्पातून 3,057 मेगावॅट वीजनिर्मितीचे सरकारचे धोरण होते. प्रकल्पाला 4,627 मेगावॅटची गरज होती. प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवर हेलिपॅडची सुविधा देण्यात आली आहे. काही तांत्रिक त्रुटींचे भविष्यात उपाययोजन, तरतुदी होेण्यासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग करता यावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. या प्रकल्पावर एक लघुपटही यावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. या प्रकल्पावर एक लघुपटही दिग्दर्शक राजेंद्र कोंडापल्ली यांनी दिग्दर्शित केला. ‘लिफ्टिंग अ रिव्हर’ असे या लघुपटाचे नाव असून हा लघुपट या प्रकल्पाविषयी लोकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरला. या प्रकल्पाची बांधणी MEIL (Megha Engineering and infrastructure Limited) ने केली असून हा अभियांत्रिकी चमत्कार ठरला आहे.
हा प्रकल्प महाराष्ट्रातील 50 हजार एकर शेतीच्या क्षेत्राला लाभदायक ठरणारा होता. यापूर्वी गोदावरीच्या पाणीवाटपाबद्दल अनेक वर्षे वाद होता. तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकारने कराराद्वारे या वादाचे खंडन केले. शेतीसाठी लागणार्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या हेतूने सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले होते. गोदावरीचे अतिरिक्त पुराचे पाणी (180 टीएमसी) या प्रकल्पांद्वारे वळविण्यात यश मिळवून देणारे होते, यात शंका नाही. ठरावीक वादाचे विषय वगळता ‘क्लिप’ हा प्रकल्प (KLIP) शेतकर्यांच्या आत्महत्येवर तोडगा काढण्यासाठी, शेतीसाठी वरदान ठरलेला आहे.