कावेरी गिरी
सुमात्रन वाघ ही दुर्मीळ प्रजाती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सुमात्रन वाघांची संख्या कमी होत चालली आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी जागतिक स्तरावर संरक्षण मोहिमा चालू आहेत.
सुमात्रन वाघ हा इंडोनेशिया सुमात्रा बेटावर आढळणार्या पँथेरा टायग्रिस सोंडाइका प्रजातीचा एक भाग आहे. 20 व्या शतकात इतर बाली आणि जावन वाघ नामशेष झाले असल्याने सुंदा बेटांवर हा एकमेव जिवंत वाघांचा समूह आहे; पण आता मात्र ही सुमात्रन वाघाची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. संख्या कमी होत चालल्याने अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून याची गणना झाली आहे. हा वाघ आकाराने अतिशय लहान असतो. नराचे वजन 100 ते 130 किलो, तर मादीचे केवळ 70 ते 90 किलो वजन असते. सुमात्रन वाघांची संख्या आजघडीला फक्त जास्तीत जास्त 400 असण्याची शक्यता आहे. सुमात्रामधील जंगलांचा र्हास हे या वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे. अवैध शिकार आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे त्यांची संख्या 400 पेक्षा कमी झाल्याचे म्हटले जाते.
सुमात्रन वाघ (Panthera tigris sumatrae) हा इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर आढळणारा, वाघांच्या सर्व उपप्रजातींमध्ये सर्वात लहान असलेला आणि प्रजाती धोक्यात असलेला (Critically Endangered) वाघ आहे; मात्र हे वाघ इतर वाघांपेक्षा लहान; पण अधिक तडफदार स्वरूपाचे असतात आणि त्यांच्या शरीरावर जाड पट्ट्या असतात आणि शरीराची लांबी 2.5 मीटरपर्यंत असते. सुमात्रन वाघ हा जगातील वाघांचा एक विशेष उपप्रकार आहे. हा मुख्यतः इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळतो आणि हेच ठिकाण या वाघासाठी नैसर्गिक अधिवास आहे. आज जगातील इतर बेटांवरील यासारखेच जावा आणि बाली वाघ आधीच नष्ट झाले आहेत. त्यामुळे सुमात्रन वाघांची संख्या कमी होत चालल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय संस्थांनुसार सुमात्रन वाघ ‘उीळींळलरश्रश्रू एपवरपसशीशव’ म्हणजे अत्यंत संकटग्रस्त प्रजाती म्हणून निर्देशित आहे. सुमात्रा बेटावर सध्याच्या अंदाजानुसार फक्त सुमारे 400-600 मॅच्युअर वयाचे वाघ उरलेले आहेत. इंडोनेशियन सरकारचा अंदाज आहे की, जंगलात केवळ 600 सुमात्रा वाघ उरले आहेत. ही संख्या पूर्वीपेक्षा बरीच कमी झाली आहे. 2000 ते 2012 दरम्यान वाघांचे अधिवास जवळपास 17-20 टक्के कमी झाले आहेत. मुख्यतः ऑईल पाल्म (रिश्रा ेळश्र) वृक्षारोपणासाठी जंगले साफ केल्यामुळे. सुमात्रन वाघांसाठी मानवांशी संघर्ष हा आणखी एक मोठा धोका आहे. दुसरीकडे, शिकारी वाघांना तारांच्या सापळ्यांनी लक्ष्य करतात आणि हरणांच्या शिकारी आणि रानडुकरांच्या पिकांवर हल्ला रोखण्याचा प्रयत्न करणार्या शेतकर्यांनी लावलेल्या सापळ्यात हे वाघ अनवधानाने अडकतात आणि बळी ठरतात.
जंगली अधिवास नष्ट
2018 मध्ये सुमात्रा बेटाची जवळपास 40 टक्के जंगलाची हानी झाली आहे. सुमात्रा बेटावर वेगाने जंगलं कापली जात आहेत. मुख्यतः ऑईल पाल्म, कॉफी आणि लाकूड व्यवसायासाठी. हे जंगल हे वाघांचे नैसर्गिक अधिवास आहे. शिकार करण्यासाठी, वंश वाढीसाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी; मात्र जंगलाच्या तुकड्यांमध्ये क्षेत्र विभागल्यामुळे वाघांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
सुमात्रन वाघ काय खातात?
सुमात्रन वाघ हे अत्यंत हिंस्र शिकारी आहेत आणि अन्नसाखळीत वरचे स्थान व्यापतात. ते गौर (सर्वात मोठी वन्य जनावरे), टॅपिर किंवा हत्तींची पिल्ले यांसारख्या मोठ्या प्राण्यांना मारू शकतात आणि माकडे, पक्षी आणि मासे यांसारखे लहान शिकारदेखील खाऊ शकतात; परंतु रानडुक्कर आणि हरीण हे त्यांच्या आहाराचा गाभा आहेत.
अवैध व्यापार
सर्वोच्च शिकारी म्हणून सुमात्रन वाघांना मानवाशिवाय इतर कोणतेही नैसर्गिक शत्रू नाहीत. सुमात्रन वाघांसाठी मुख्य धोक्यांपैकी एक म्हणजे शिकार. सुमात्रन वाघांची अवैध शिकार व हाडे, कातडे अशा भागांचा होत असलेला चोरटा व्यापार हा एक गंभीर धोका आहे. त्यांचे कातडे, हाडे, दात आणि इतर अवयवांचा व्यापार काळ्या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. एक अधिकृत अहवालानुसार, 1998-2002 दरम्यान 50 सुमात्रन वाघांची प्रतिवर्ष अवैध शिकार होत होती.
परदेशात स्टेटस सिम्बॉल म्हणून आणि आशियाई पारंपरिक औषधांमध्ये वापरण्यासाठी या उत्पादनांना खूप मागणी आहे. हरीण आणि इतर प्रजातींच्या शिकारीमुळे कमी होत चाललेली शिकार संख्या, तसेच पाम, कॉफी आणि बाभूळ वृक्षांच्या लागवडीमुळे अधिवास नष्ट होणे आणि लहान शेतकर्यांनी केलेले अतिक्रमण यामुळेदेखील धोका आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष
जंगल व शेतांमधील सीमा धूसर झाल्यामुळे वाघ आता मानवी वस्तीच्या जवळ जाऊन शिकार करू लागले आहेत, ज्यामुळे शेतकरी आपल्या पाळीव पशू किंवा लोकांना बचावण्यासाठी वाघांना मारतात. यामुळे संख्या आणखी घटते.
जंगल कमी झाल्यामुळे सुमात्रन वाघांना शिकार करण्यासाठी उपलब्ध प्राण्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे. याचा थेट परिणाम वाघांच्या पुनरुत्पादन क्षमतेवर आणि वाढीवर होत आहे.
इंडोनेशिया सरकारने वाघ संरक्षणासाठी कठोर कायदा केला आहे. अवैध शिकार करणार्यांना कैद व दंडाचा सामना करावा लागू शकतो.
जगभरातील अनेक वन्यप्राणी संरक्षण संस्था सुमात्रन वाघाच्या संरक्षणासाठी विविध कार्यक्रम राबवताना दिसतात. जंगलात ट्रॅप कॅमेरा प्रणालीद्वारे वाघांच्या हालचाली टिपणे, वन्य भागांचा विस्तार करणे, स्थानिक समुदायाला जागरूक करणे, अवैध व्यापारावर नियंत्रण आणि बंदी आणणे इ. जागतिक संघटनांचे प्रयत्न, जागरूकता वाढविणे आणि कडक कायद्यांमुळे काही ठिकाणी संरक्षणात सुधारणा होत आहे.
सुमात्रन वाघ हा केवळ एक भव्य शिकारी नाही, तर जंगलातील जैवविविधता संतुलित ठेवणारा जीव आहे. त्यामुळे संपूर्ण परिसंस्था संतुलित राहते. वाघाशिवाय संपूर्ण जंगल आणि त्यातील इतर प्रजाती संकटात येतात. त्वरित आणि ठोस उपाय घेतले नाहीत, तर सुमात्रन वाघाची ही प्रजाती आगामी दशकात संपूर्णपणे नष्ट होऊ शकते.