शरयू माने
हल्लीच सौदी अरेबिया या देशातील लाखोच्या संख्येतील उंटांना पासपोर्टची सेवा उपलब्ध करून देण्यात सौदी अरेबियाला यश आलेले आहे. ही योजना खूप दिवसांपासून अमलात आणण्याचे प्रयत्न तिथल्या सरकारकडून चालू होते. यामुळे उंटांच्या पालनपोषणासंबंधीच्या असुविधा दूर होतील, हे सरकारचे धोरण आहे.
जनावरांचे पालनपोषण हा मनुष्याच्या प्रमुख छंदापैकी एक आहे. तसेच, जनावरांपासून उत्पादन व्यवसायाची निर्मिती होते. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदींपासून उत्पादन होते. त्यांची आयात आणि निर्यातही होते. त्यामुळे जनावरांची ने-आण सर्वत्र वाढीस आहे. हल्ली जनावरांना फक्त उत्पादन निर्मिती प्रक्रियेचे साधन न मानता त्यांना विशिष्ट दर्जा परिवारांमध्ये प्राप्त होत आहे. त्यांच्या पालन पोषणाच्या साधनामध्येही आता पूर्वीपेक्षा सुधारणा झालेली आहे. ते वैशिष्ट्यपूर्णरीत्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. उदा. कॅट फूड, डॉग पेडिग्री. त्यांची वस्त्रे इत्यादी वास्तूचा ट्रेंड मार्केट मध्ये आलेला आहे; पण जनावरे ही सामाजिकद़ृष्ट्या माणसांच्या बरोबरीने सगळीकडे वावरू शकत नाहीत. त्यावर निर्बंध आहेत. एखाद्या वस्तूप्रमाणे त्यांना ने-आण करणे शक्य नाही.
विमान, सरकारी वाहने, जहाजे यातून प्रवास करण्यास पाळीव प्राण्यांना बंदी आहे. त्यासाठी काही कागदोपत्री बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. फेरेटस (लांबुडक्या तोंडाचे, लांब शेपटीचे प्राणी), मांजर, कुत्रे यांसारख्या प्राण्यांना परदेशातल्या प्रवासासाठी अगर आंतरराष्ट्रीय प्रवासाकरिता पेट पासपोर्ट तथा आरोग्य प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हे विशिष्ट दस्तावेज म्हणजे मायक्रोचिप आणि रेबिजचे लसीकरण केलेली नोंद असते. भारतामध्ये फिरण्यासाठी अधिकृत असे पासपोर्ट नसले, तरी परदेशात जेव्हा आपण आपल्या पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी अगर अन्य कारणांसाठी नेतो त्यावेळी प्राण्यांची मायक्रोचिप, रेबिज लस आणि निमल क्वारंटिन सर्टिफिकेशन आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाहित सोबत असावे लागते. या पासपोर्टचा वैध कालावधी 3 वर्षे इतका असतो. हा लसीकरणाचा वैध कालावधी असतो. पशुवैद्यकाकडून लसीकरण करून घेताना मायक्रोचिप बसवणे, अॅनिमल हेल्थ सर्टिफिकेट (अकउ) मिळवणे आवश्यक आहे. प्रत्येक देशाचे यासंदर्भात नियम वेगवेगळे असतात. आयात करण्याआधीच पंधरा दिवस या कागदपत्रांची पूर्तता, तपासणी आवश्यक असते. कुत्र्यांना होणारा औजस्की रोग, डिस्टेंपर , रेबिज, लेशम्यानीयासीस आणि लेप्टोस्पायरोसिस हे आजार निदर्शनास आल्यास प्रवासावर निर्बंध येतात, तर मांजर प्रवासादरम्यान रेबिज आणि डिस्टेंपर या आजारांपासून मुक्त असले पाहिजे. हे प्राणी मायक्रोचिप केलेले असावेत हे बंधनकारक केलेले आहे.
काही जनावरांची आयात-निर्यात त्यांच्या शरीरयष्टीमुळे प्रतिकूल असली, तरी काही प्रवास माध्यमे अशा जनावरांच्या आयात-निर्यातीसाठी अनुकूल केलेली आहेत. काही वाहतूक सेवांकडून या प्राण्यांसाठी पासपोर्ट आवश्यक केलेला आहे. एखाद्या प्राण्याची संख्या एखाद्या देशामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळते तेव्हा तो प्राणी त्या देशाचे प्रमुख उदरनिर्वाहाचे माध्यम कदाचित असू शकतो. त्यांची आयात-निर्यात ही क्रमाने व्यावसायिकद़ृष्ट्या होत असते. त्या प्राण्यांवर तिथली अर्थव्यवस्था अवलंबून असते. या प्राण्यांची जोखीम मोठी असते. या जोखमी यशस्वीरीत्या पाळल्या जाव्यात, यासाठी कागदोपत्री अनुशासन ठेवणे महत्त्वाचे असते. या जनावरांचे पासपोर्ट मंजुरीचे काम त्या त्या देशांकडून चालू आहे. हल्लीच सौदी अरेबिया या देशातील लाखोच्या संख्येतील उंटांना पासपोर्टची सेवा उपलब्ध करून देण्यात सौदी अरेबियाला यश आलेले आहे. ही योजना खूप दिवसांपासून अमलात आणण्याचे प्रयत्न तिथल्या सरकारकडून चालू होते. यामुळे उंटाच्या पालनपोषणासंबंधीच्या असुविधा दूर होतील, हे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे व्यावसायिक वाढ होणे साहजिक आहे. देशभरात उंटांच्या संख्येची नोंद ठेवली जाईल.
या सर्व गोष्टींसाठी उंटांसाठी कागदपत्रांची पूर्तता होणे गरजेचे आहे. पासपोर्टवर उंटाच्या मालकाचे नाव, मायक्रोचिप इत्यादी बाबी सुनिश्चित आहेत. सौदी अरेबियाच्या धनसंपदेमधे चार हजार कोटींपेक्षा जास्त योगदान उंटांचे आहे. तीन कोटींपेक्षा जास्त उंटांची संख्या अरब देशांमध्ये आढळते. त्यापैकी सर्वाधिक उंट सोमालियामध्ये आहेत. त्यानंतर सुदान, मोरिटानिया, सौदी अरेबिया आणि येमेन यांचा क्रम लागतो. ऊंट हे सौदी अरेबिया देशाने राष्ट्राचे प्रतीक म्हणून स्वीकारले आहे. तेथे उंटांची सौंदर्य स्पर्धा भरवली जाते. पारितोषिके दिली जातात. उंटांचा तिथे एक इतिहासच आहे. ऊंट तेथल्या व्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण अशा गिनतीमध्ये आहे. तिथल्या धर्मिक स्थळांना लोक उंटांच्या सहाय्याने भेटी देतात. उंटाशिवाय इतर कोणते सोयीस्कर साधन लांबच्या पल्ल्यासाठी सहजासहजी उपलब्ध नाही. मक्का मदिनाचा प्रवास उंटाच्या सहाय्यानेच करावा लागतो. इतर कोणत्याही वाहनाशिवाय हा प्रवास सुलभरीत्या होतो.
या उंटांना आता तिथल्या सरकारकडून हिरव्या रंगाचा पासपोर्ट देण्यात आलेला आहे. त्यावर सौदी अरेबियाचे ‘कोट ऑफ आर्म्स’ हे राजचिन्ह असणार आहे. दूरच्या देशांतही आपल्या मालकाबरोबर भावनिक बंध जपणारी तसेच व्यावसायिक सफर होणार आहे. सौदी अरेबियामध्ये ऐतिहासिक काळात दगडावरच्या कोरीव कामामध्ये उंटांचे चित्र आढळतात. त्या चित्रामध्येही उंटांची वाहतूक इत्यादी बाबींचा संदर्भ लागतो. उंटांमधे इतर प्राण्यांपेक्षा पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे हा प्राणी वाळवंटी भागात सोयीस्कररीत्या वावरू शकतो. तिथले वाळूचे लोट अंगावर झेलून प्रवाशाला सुखरूप निश्चित स्थानी पोहोचवू शकतो. या गुणांचा इतर प्राण्यांत अभाव असतो. तिथल्या राजेशाही थाटात शिरपेच म्हणजे उंटाची सवारी. त्याला कुठे तोड नाही. हा भव्य, शांत स्वभावाचा प्राणी निरूपद्रवी असल्याने मनुष्यप्राण्याला त्यापासून धोका संभवत नाही. झाला तर स्थानिक लोकांना उंटांपासून फायदाच जास्त होतो. उंटाचे दूध, दुग्धजन्य पदार्थ, त्यांची विक्री यात त्याच्या परदेशातल्या प्रवासामुळे वाढ होणार आहे. उंटाची चामडी, लोकरीची मोठ्या प्रमाणात विक्री होते. तेलाच्या निर्यातीसोबत आता उंटांचीही निर्यात सौदी अरेबियाकडून होणार आहे. उंटांचा वावर आता प्रवासासाठी विमानतळावर माणसांसोबत असणार आहे.