Penguin solitary journey | गोष्ट एका निःशब्द प्रवासाची  
बहार

Penguin solitary journey | गोष्ट एका निःशब्द प्रवासाची

पुढारी वृत्तसेवा

कावेरी गिरी

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कोणताही सेलिब्रिटी नाही, कोणतंही भाषण नाही, ना गाणी आहेत, तरीही हा व्हिडीओ लोकांना थांबवतो, विचार करायला लावतो. ज्यात एक पेंग्विन आपली कॉलनी (समूह) सोडून एकटा बर्फाच्या पर्वताकडे चालतो. तो फक्त एक पेंग्विन, बर्फाच्या विस्तीर्ण प्रदेशात, आपल्या समूहापासून दूर, एकटाच चालत जाणारा.

हा साधा वाटणारा व्हिडीओ आज लाखो लोकांच्या भावना व्यक्त करतो आहे. लोक त्याला वेगवेगळे अर्थ लावत आहेत. काहींना तो दुःखाचा वाटतो, काहींना तो स्वातंत्र्याचा वाटतो, तर काहींना तो आयुष्याच्या निरर्थकतेवर भाष्य करणारा वाटतो. याच पेंग्विनला सोशल मीडियावर नाव मिळालं, निहिलिस्ट पेंग्विन (छळहळश्रळीीं झशपर्सीळप). पळहळश्रळीीं म्हणजे असंख्य भावना किंवा अर्थ न मानणारा, एकाकी, अर्थहीन वाटणारा.

व्हिडीओ नेमका आहे तरी काय?

व्हायरल होणारा हा व्हिडीओ खरं तर नवीन नाही. तो 2007 मध्ये बनवलेल्या एका डॉक्युमेंटरीमधला आहे. या डॉक्युमेंटरीचं नाव आहे एपर्लेीपींशीी रीं ींहश एपव ेष ींहश थेीश्रव. हा चित्रपट अंटार्क्टिकामधील निसर्ग, प्राणी आणि तिथे काम करणार्‍या शास्त्रज्ञांवर आधारित आहे. यात एक पेंग्विन एकटा चालत आहे, समूहापासून दूर जातो आणि आपला वेगळा मार्ग घेतो. अनोळखी प्रदेशातले जीवन दाखवणारे द़ृश्य. या क्लिपमध्ये पेंग्विन आपल्या समूहापासून दूर निघतो आणि बर्फाळ पर्वताकडे चालू लागतो. ही हटके वर्तणूक पाहून लोकांनी त्यात भावनिक किंवा दार्शनिक आशय जोडायला सुरुवात केली.

या डॉक्युमेंटरीत एका द़ृश्यात एक अ‍ॅडेली पेंग्विन दिसतो. इतर पेंग्विन्स समुद्राकडे, आपल्या नैसर्गिक मार्गाने चाललेले असतात; मात्र हा एक पेंग्विन त्या दिशेला न जाता बर्फाच्छादित पर्वतांच्या दिशेने चालत जातो. तो कोणालाही न थांबता, मागे न वळता, शांतपणे पुढे जात राहतो. व्हिडीओदेखील आश्चर्यकारक आहे. कारण, पाहणार्‍याला असे वाटते की, जणू निराशेने भरलेला पक्षी एकाकी प्रवासाला निघाला आहे. लोक या घटनेला आजच्या वेगवान, तणावपूर्ण आणि वाढत्या आनंदहीन जीवनाशी जोडत आहेत. काही सरकारी आणि ब्रँड अकाऊंटस्नीदेखील या ट्रेंडचा उपयोग क्रिएटिव्ह पोस्टस् बनवण्यासाठी केला आहे.

चित्रपटातील दिग्दर्शकांनीही सांगितले आहे की, पेंग्विन सहसा अशा दिशेने जात नाहीत. कारण, तिकडे त्यांना अन्न, पाणी किंवा इतर पेंग्विन मिळण्याची शक्यता नसते, तरीही हा पेंग्विन त्याच्या कळपापासून वेगळा होतो आणि एकाकी वाटेवर निघतो, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटते. पेंग्विन सहसा कळपात राहतात आणि एकमेकांच्या मागे लागतात. मग, हा व्हिडीओ आज अचानक का व्हायरल झाला? आजच्या काळात सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा स्रोत राहिलेला नाही. तो लोकांच्या भावना, तणाव, थकवा आणि आयुष्याबद्दलचे प्रश्न व्यक्त करण्याचं माध्यम बनला आहे. अनेक लोक आयुष्यात थकलेले आहेत. कामाचा ताण, स्पर्धा, नातेसंबंध, आर्थिक चिंता, एकटेपणा... अशावेळी हा एकटा चालणारा पेंग्विन काही लोकांना स्वतःसारखा वाटू लागला.

सोशल मीडिया काय म्हणतो?

व्हायरल पेंग्विन व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, काही तासांतच जगभरात मीम्स तयार झाले. हा व्हिडीओ 2026 मध्ये सर्वात मोठा इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. सोशल मीडियावर लोकांनी त्यावर फिलॉसॉफिकल, इमोशनल आणि मीमआधारित अर्थ जोडले आहेत. व्हिडीओवरून लोक वेगवेगळे अर्थ लावत आहेत. काहींनी हा व्हिडीओ जीवनातील निराशा, थकवा किंवा बर्नआऊटचा प्रतीक म्हणून पाहिला. काहींनी म्हटलंय, ‘जेव्हा तुम्ही जीवनातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करून सुट्टी घेऊ इच्छिता’. काहींनी याला व्यक्तिगत स्वातंत्र्य, गर्दीपासून अलग राहण्याची इच्छा म्हटले आहे.

काही लोक म्हणू लागले, ‘हा पेंग्विन म्हणजे आपणच आहोत. सगळे जिथे जात आहेत, तिथे न जाता वेगळ्या वाटेने जाणारा. कोणालाही काही न सांगता, फक्त निघून जाणारा’, तर काहींनी म्हटलं, ‘व्हिडीओमध्ये एक पेंग्विन त्याच्या साथीदाराला सोडून एकाकी प्रवासाला निघताना दिसत आहे, जणू काही तो खूप निराश झाला आहे आणि जगाची दिनचर्या सोडून स्वतःच्या जगात हरवला आहे. तो धावतो, संघर्ष करतो, पडतो; पण थांबत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही भावनिक धक्का बसेल’. आजच्या तरुण पिढीला, हा विचार फार जवळचा वाटतो. कारण, अनेक जण स्वतःला विचारतात हे सगळं का करतोय? याचा शेवट काय? सगळेच एकाच शर्यतीत का धावत आहेत? हा पेंग्विन त्या प्रश्नांचा मूक प्रतीक बनला आहे.

भावनिक आणि तात्त्विक अर्थ बाजूला ठेवला, तर शास्त्रज्ञांचं म्हणणं थोडं वेगळं आहे. तज्ज्ञांच्या मते, हा पेंग्विन कदाचित दिशाभूल झालेला होता. त्याला आजार, थकवा किंवा मेंदूशी संबंधित समस्या असू शकते. प्राण्यांमध्ये कधी कधी असे अनपेक्षित वर्तन दिसून येते. म्हणजे हा पेंग्विन आयुष्याचा अर्थ शोधायला निघालेला नव्हता. तो फक्त निसर्गातील एक दुर्मीळ क्षण होता; पण इंटरनेटने त्या क्षणाला भावनांचा अर्थ दिला. हा निराशाजनक विचारांसह चालणारा पेंग्विन मानला जाऊ शकत नाही. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. माणूस नेहमीच कथा शोधत असतो. एखाद्या द़ृश्यात तो स्वतःचं दुःख, आनंद, प्रश्न पाहतो. या पेंग्विनमध्ये लोकांना स्वतःचा एकटेपणा दिसतो. शांतपणे निघून जाण्याचे स्वप्न दिसतं. हा पेंग्विन काही बोलत नाही, तरीही तो खूप काही सांगतो, असं लोकांना वाटतं. माणसाच्या मनात किती प्रश्न आहेत, हे यातून दिसतं. प्रत्येक गोष्टीला लगेच अर्थ द्यायलाच हवा असं नाही; पण ‘तुम्ही चालताय; पण कुठे?’

कदाचित उत्तर आपल्यालाही माहीत नाही, असे म्हणायला हरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT