v2v technology for road accident | धूम अपघातरोधक तंत्रज्ञानाची 
बहार

v2v technology for road accident | धूम अपघातरोधक तंत्रज्ञानाची

पुढारी वृत्तसेवा

महेश शिपेकर, वाहनउद्योग अभ्यासक

आजच्या डिजिटल युगात जिथे इंटरनेट आणि समाजमाध्यमे हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता उत्पन्नाचे एक प्रमुख स्रोत बनले आहेत. किंबहुना, हल्लीचे बरेच तरुण-तरुणी पारंपरिक नोकरीपेक्षा युट्युबर किंवा इन्फ्ल्यूएन्सर (प्रभावक) बनण्याच्या मागे अधिक प्रमाणात धावताना दिसताहेत. अशा काळात लोकेश कुमारसारख्या एका प्रस्थापित युट्युबरने घेतलेला निर्णय सर्वांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.

भारतातील रस्ते अपघाताला पायबंद घालण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञानाच्या पातळीवर महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. केंद्रीय रस्ते परिवहन अणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार 2026 च्या शेवटपर्यंत व्हेईकल टू व्हेईकल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (व्ही 2 व्ही) लागू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. यानुसार वाहन एकमेकांच्या संपर्कात राहतील आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळू शकते.

जगभरात सर्वाधिक अपघात होणार्‍या देशांत भारताचा समावेश होतो. आपल्याकडे नेहमीच होणार्‍या अपघातात हजारो नागरिकांचा मृत्यू होतो. सरकारी आकडेवारीनुसार, दरवर्षी लाखो नागरिक अपघातात मृत्युमुखी पडतात आणि त्यापेक्षा अधिक संख्येने नागरिक जखमी होतात. अतिवेग, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग, वाहतूक नियम न पाळणे, विरुद्ध दिशेने वेगात येणे, अचानक ब्रेक दाबणे आदी कारणांमुळे अपघाताची शक्यता राहते. या गोष्टी लक्षात घेता सरकारने आता पारंपरिक उपायापेक्षा अधिक परिणामकारक ठरतील अशा उपायांचा आधार घेण्याची तयारी केली आहे.

व्हेईकल टू व्हेईकल दळणवळण यंत्रणेचे स्वरूप

‘वाहन ते वाहन दळणवळण तंत्रज्ञान’ हे एक प्रकारचे वायरलेस तंत्रज्ञान आहे. त्यात रस्त्यावर धावणार्‍या गाड्या एकमेकांना डेटा शेअर करत राहतात. या डेटामध्ये गती, दिशा, ब्रेकिंग, लोकेशन आणि अचानक होणारी घटना याचा समावेश असतो. यानुसार एखादे वाहन अचानक ब्रेक दाबत असेल किंवा एखाद्या वळणावर वाहन समोरून वेगात येत असेल, तर परिसरात धावणार्‍या गाड्यांना त्याचे संकेत लगेचच मिळतात. या तंत्रज्ञानाला सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ते मोबाईल फोनमधील सीमकार्डप्रमाणे काम करते. प्रत्येक वाहनांत एक विशेष उपकरण बसविण्यात येईल आणि ते 360 अंश सेल्अइस परिसरातील गाड्यांना सिग्नल पाठविण्यास सक्षम राहील.

गडकरींचे वक्तव्य

यासंदर्भात अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. रस्ते अभियांत्रिकीत सुधारणा, कायद्याचे काटेकोरपणे पालन, वाहतूक नियमांचे उल्लंघनप्रकरणी दंड आकारणे यासारखे पावले अगोदरच उचलण्यात आली आहेत. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते सुरक्षा आणखी सक्षम केली जाणार असल्याचे त्यांनी सागितले. ‘व्ही टू व्ही’ तंत्रज्ञानाच्या मदतीने चालकाला परिसरातील वाहनांच्या घडामोडींची प्रत्यक्ष माहिती मिळेल आणि तो त्यानुसार निर्णय घेण्यास सक्षम राहील.

चालकाला मदत कशी मिळेल?

‘व्ही टू व्ही’ तंत्रज्ञान चालकासाठी एक डिजिटल सहायकाप्रमाणे काम करेल. यानुसार मागील आणि पुढील वाहनांची गती, अचानक ब्रेक दाबल्याचा इशारा, ब्लाईंड स्पॉटवरील वाहनाचे स्थान, वेगात येणार्‍या गाडीची माहिती, चौक किंवा वळणावर वेग कमी करण्याची सूचना किंवा अपघाताची शक्यता याबाबतचे सिग्नल मिळतील. चालकाला या सूचना डॅशबोर्डवर मिळतील आणि तो तातडीने निर्णय घेऊन गाडीचा वेग कमी करत स्वत:ला, गाडीला आणि अन्य प्रवाशांना सुरक्षित ठेवू शकेल.

360 अंश ट्रान्समिशनचे वैशिष्ट्ये

या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे 360 अंश ट्रान्समिशन सिस्टीम. याचा अर्थ, हे वाहन केवळ पुढील किंवा मागच्याच वाहनाचा मागोवा घेणार नाही, तर चहुबाजूला असणार्‍या गाड्यांचा वेध घेईल आणि त्यांना कम्युनिकेट करेल. प्रामुख्याने महामार्ग, पर्वतीय रस्ता, घाट रस्ता, शहर वाहतुकीत असताना चालकाला त्याचा सर्वात मोठा फायदा मिळेल.

सरकारी सूत्रानुसार, व्ही टू व्ही तंत्रज्ञान अमलात आणण्यापूर्वी त्याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतली जाईल. निवडक शहरे आणि राष्ट्रीय महामार्गावर त्याची तपासणी केली जाईल. यानंतर त्याचा अनुभव आणि आकडेवारीच्या आधारावर देशभरात टप्प्याटप्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल. यासाठी वाहन कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या आणि टेलिकॉम सेक्टर यांना सोबत घेतले जाईल. आगामी काळात नवीन वाहनांत हे तंत्रज्ञान इनबिल्ट स्वरूपात मिळू शकते.

जुन्या वाहनांचे काय होणार?

अर्थात, सरकारकडून वाहनांसाठी नवीन तंत्रज्ञान आणले जात असताना सध्याच्या वाहनांचे काय होणार, असा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते, जुन्या वाहनांसाठी वेगळे व्ही टू व्ही उपकरण उपलब्ध करून देण्याची योजना आणली जाऊ शकते. अर्थात, त्याचा खर्च आणि अनिवार्यता याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय पातळीवर व्ही टू व्ही तंत्रज्ञान

जगभरातील अनेक विकसित देशांत अमेरिका, जपान, युरोपच्या काही भागांत ‘व्ही टू व्ही’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तेथील अभ्यासानुसार, या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अपघाताचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के कमी करता येऊ शकते. भारतासारखेअनेक देश या जागतिक अनुभवाचा आधार घेत आपल्या परिस्थितीला अनुसरून तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात, हे तंत्रज्ञान जेवढे उपयुक्त आहे, त्याच प्रमाणात आव्हानेदेखील कमी नाहीत. यात तंत्रज्ञानाच्या खर्चाचा मोठा मुद्दा आहे. डेटा सुरक्षा आणि खासगीपणा याबाबतही चिंता व्यक्त केली जाऊ शकते. नेटवर्क कव्हरेजचीदेखील समस्या राहू शकते. तज्ज्ञांच्या मते, या आव्हानावर वेळीच मार्ग काढला, तर व्ही टू व्ही तंत्रज्ञान भारतीय रस्ते सुरक्षा व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT