हेमचंद्र फडके
राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचे साधन नसते, तर ते समाजमनाचा ठाव घेऊन परिवर्तन घडवण्याचे शास्त्र असते. गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या कामगिरीचा आलेख पाहिला, तर त्यांनी या शास्त्रात प्रावीण्य मिळवले असल्याची मनोमन साक्ष पटते. पक्षात येणार्या प्रत्येकाची क्षमता पारखून त्याला योग्य स्थान देणे आणि कार्यकर्त्यांच्या फौजेला निवडणुकीच्या मैदानात बूथ स्तरावर सक्रिय करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य भाजपच्या विस्ताराचे आणि महायुतीच्या सलग विजयाचे मुख्य कारण ठरले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आजवरच्या इतिहासात कोणाही एका पक्षाला 48 टक्क्यांहून अधिक जागा मिळण्याची ही पहिली वेळ आहे. या यशामध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचा वाटा मोठा आहे; परंतु त्यापलीकडे जाऊन हे यश मिळवण्यासाठी लोकसभा निवडणुकांमधील पीछेहाटीनंतर विधानसभेमध्ये मुसंडी मारूनही हुरळून न जाता अतिशय चाणाक्षपणाने विजयासाठीचे सुसूत्र नियोजन करणे, जागावाटपामध्ये सामाजिक गणितांचे आकलन करणे, कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे, जनतेच्या प्रश्नांसाठी विविध योजनांची आखणी करणे या सर्वाचे नियोजन सरकारचा प्रमुख म्हणून जे देवाभाऊंनी केले त्याला तोड नाही.
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राज्याच्या राजकारणाचा इतिहास, भूगोल आणि व्याकरण बदलले असल्याची साक्ष देणारे आहेत. भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीने या निवडणुकांत दणदणीत विजय मिळवताना राज्यातील 288 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी तब्बल 215 ठिकाणी अध्यक्षपदे आपल्या ताब्यात घेतली आहेत. याउलट काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून केवळ 51 अध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकांत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. पक्षाने 129 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवला. विशेष म्हणजे, 2017 च्या स्थानिक निवडणुकांतील 1,602 नगरसेवकांवरून यावेळी भाजपची संख्या 3,325 वर पोहोचली आहे. शहरी आणि निमशहरी भागांत पक्षाची संघटनात्मक पकड लक्षणीयरीत्या वाढल्याचे हे द्योतक आहे. महायुतीच्या या विजयामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते, घटक पक्षांचे शीर्षस्थ नेते या सर्वांचा मोलाचा वाटा असला, तरी या यशावर एकहाती प्रभाव आहे, तो देवाभाऊंचा म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पीछेहाटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या तडफदारपणाने आणि कौशल्याने राजकीय समीकरणांना नवे आयाम दिले, त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकांमध्ये ढळढळीतरीत्या दिसून आले. महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासात आणि भाजपच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात कधीही मिळाले नव्हते इतके यश यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळाले. या निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह 32 आमदारांच्या साहाय्याने महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याची किमयाही देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विश्वासामुळेच शक्य झाली होती. त्या पाठोपाठ अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सामावून घेण्याचा फडणवीसांचा निर्णयही मास्टरस्ट्रोक ठरला. सुरुवातीला यामुळे भाजपला फटका बसेल असा अंदाज वर्तवला जात होता; परंतु फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांदरम्यान दिलेल्या मुलाखतींमधून या बेरजेच्या राजकारणाचे तर्कशास्त्र प्रभावीपणे पटवून दिले आणि जनतेने त्यावर ठेवलेला विश्वास विधानसभा निकालांमधून दिसून आला. या दोन्ही पक्षांना सोबत घेतल्यामुळे येणार्या काळात महाराष्ट्राचे राजकीय चित्र पालटणार, हे स्पष्ट झाले होते. नगरपालिका-नगरपंचायतींच्या निवडणुकांमधून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यातील 288 पैकी 129 नगराध्यक्ष एकट्या भाजपचे निवडून आले आहेत. 2017 मध्ये हा आकडा 94 होता. महायुतीने एकूण 75 टक्के नगराध्यक्षपदे पटकावली आहेत. 2017 मध्ये भाजपचे 1602 नगरसेवक होते. 2025 च्या निवडणुकीत ही संख्या दुपटीने वाढून 3,325 झाली आहे. राज्यातील एकूण नगरसेवकांपैकी एकट्या भाजपकडे 48 टक्के नगरसेवक आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे आणि अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचे हे फलित आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात भाजपचा विस्तार केला आहे, तो पाहिला असता राजकीय व्यवस्थापनशास्त्रातले अत्युत्तम उदाहरण म्हटले पाहिजे. सत्तेतून बाहेर फेकले गेल्यानंतरही न खचता त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून बजावलेली भूमिका असो किंवा उपमुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी दाखवलेला संयम आणि अभ्यासू वृत्तीने केलेले काम असो, राज्याच्या राजकारणात अशाप्रकारचे उदाहरण इतिहास आणि वर्तमानात नाही हे वास्तव आहे. ज्या ग्रामीण महाराष्ट्रात भाजपची ताकद एकेकाळी नगण्य किंवा दुर्लक्षित होती, तिथे आज घराघरात कमळ पोहोचले आहे. याचे मुख्य श्रेय फडणवीस यांच्या ‘गाव तिथे शाखा’ आणि ‘बूथप्रमुख’ या संकल्पनांच्या अंमलबजावणीला जाते. ग्रामीण भागातील जनतेला केवळ भावनिक साद न घालता त्यांच्या विकासाच्या प्रश्नांना हात घालणे आणि प्रामाणिकपणाने त्यांची सोडवणूक करणे हे फडणवीस यांच्या धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. मग, ते जलयुक्त शिवार योजनेचे पुनरुज्जीवन असो वा शेतकर्यांना सौरऊर्जेद्वारे मोफत वीज देण्याची ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ असो, ‘लाडकी बहीण’ योजना असो किंवा सातबाराचा निर्णय असो. या प्रत्येक योजनेने ग्रामीण भागातील मतदारांच्या मनात देवाभाऊंबद्दल एक विश्वासाचे नाते निर्माण केले.
फडणवीस यांच्या राजकीय धोरणांमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘परफेक्टनेस’. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कोणाशी युती करायची, कोणत्या जागांवर ताकद लावायची आणि कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवायचे, याचा अभ्यास ते अत्यंत शास्त्रीय पद्धतीने करतात. महायुतीच्या जागावाटपावेळी त्यांनी ज्या संयमाने आणि मुत्सद्देगिरीने निर्णय घेतले, त्यामुळेच आज 75 टक्क्यांहून अधिक नगरपालिकांवर महायुतीचा भगवा फडकत आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र, एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानले जायचे; परंतु फडणवीस यांनी हा सहकाराचा अक्ष पूर्णपणे भाजपकडे वळवला आहे. अनेक साखर कारखाने आणि दूध संघांच्या निवडणुकांमध्ये भाजप किंवा मित्रपक्षांनी मिळवलेला विजय हा याच धोरणात्मक बदलाचा भाग आहे. महाराष्ट्राची सामाजिक गुंतागुंत मोठी विलक्षण आहे. फडणवीस हे उच्चवर्णीय असल्याने त्यांच्यासाठी ही गुंतागुंत सोडवणे अधिक क्लिष्ट होते; परंतु विविध जातीसमुदायांचे प्रश्न मुळाशी जाऊन समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांना तोड नाही. मराठा समाजातील तरुण-तरुणींसाठी त्यांच्या कार्यकाळात घेतले गेलेले कल्याणकारी निर्णय राज्याच्या 65 वर्षांच्या इतिहासात कधीच झाले नाहीत. दुसरीकडे ओबीसी, धनगर आणि दलित समाजातील उपेक्षित घटकांना पक्षाशी जोडण्यासाठी विविध सामाजिक योजनांचा प्रभावी वापर केला. ‘शासन आपल्या दारी’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ थेट शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून त्यांनी ‘पॉलिटिक्स ऑफ डिलिव्हरी’चा नवा पायंडा पाडला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील दुर्गम भागात जिथे रस्ते आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होता, तिथे पायाभूत सुविधांचे जाळे विणून त्यांनी जनतेला विकासाची नवी स्वप्ने दाखवली.
राजकीय डावपेच खेळताना फडणवीस यांनी कधीही स्वतःची मर्यादा ओलांडली नाही. विरोधकांकडून होणार्या वैयक्तिक टीकेला उत्तर न देता त्यांनी आपल्या कामातून प्रत्युत्तर देण्यावर भर दिला. आज फडणवीसांच्या दूरद़ृष्टीमुळेच गडचिरोलीसारखा जिल्हा नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडून देशाचे ‘स्टील हब’ बनू पाहत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सरकारच्या योजना आणि नेतृत्वावरील विश्वास याशिवाय हे घडून आले नसते. उद्योगधंद्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि दावोस सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची मांडलेली भक्कम बाजू यामुळे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जागतिक तत्ववेत्ता प्लेटो म्हणतो, जोपर्यंत तत्वज्ञ राजे होत नाहीत किंवा राजसत्ता चालवणारे तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करत नाहीत, तोपर्यंत राज्यांमधील दुःखे संपणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहताना प्लेटोच्या या विधानाची प्रचिती येते. राजकारणात केवळ गर्दी जमवणारा नेता असून चालत नाही, तर त्या गर्दीला दिशा देणारा, गर्दीत बसलेल्यांचे प्रश्न संवेदनशीलपणाने समजून घेऊन त्यांचे निराकरण करणारा ‘अभ्यासू’ नेता असावा लागतो. देवाभाऊंचा कामाचा झपाटा, प्रशासनावरील पकड, कायद्याचे आकलन, अर्थकारणातील प्राविण्य आणि तांत्रिक विषयांवरील त्यांचे प्रभुत्व हा अनेक गुणांचा समुच्चय त्यांना ‘स्टेटस्मन’ बनवणारा आहे. चाणक्य नीती सांगते की, शत्रू कितीही प्रबळ असला तरी, आपल्या बुद्धीच्या आणि नियोजनाच्या जोरावर त्याला नामोहरम करता येते. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतरही गाफील न राहता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतः मैदानात उतरून सभा घेणे आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देणे, ही त्यांची कार्यपद्धती त्यांच्यातील अजेय विजिगीषु वृत्तीचे दर्शन घडवते. सध्याच्या बेताल राजकारणामध्ये राहूनही प्रचंड संयमी आणि आक्रमक भाषणातही तोल ढळू न देणारी समतोल वक्तृत्वशैली त्यांना मैदान गाजवणाराच नव्हे तर गर्दीचे रुपांतर प्रत्यक्ष मतांमध्ये परावर्तीत करणारा वक्ता म्हणून पुढे आणणारी ठरली आहे. आकडेवारी आणि तर्कसंगत विचार यावर आधारित त्यांचे राजकारण आजच्या तरुणाईला आणि ग्रामीण जनतेलाही भावत आहे.
या सर्वांपलीकडे जाऊन त्यांच्यातील नम्रता आणि अहंकारशून्यता कार्यकर्त्यांना भावणारी आणि विरोधकांची तोंडे बंद करणारी ठरली आहे. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाचा 60-70 वर्षांचा प्रवास पाहणार्या कितीतरी लोक आज हात आखडता न घेता देवाभाऊंची प्रशंसा करताना दिसतात. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अलीकडेच ‘शरद पवार पंतप्रधान व्हावेत, असा सल्ला दिलेला मी कार्यकर्ता आहे; मात्र माझे म्हणणे आहे की, आजच्या घडीला पंतप्रधान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस हेच सर्वाधिक स्वीकारार्ह आणि योग्य आहेत. त्यांना मी भाजपचे नेते म्हणून नव्हे, तर एक कर्तव्यदक्ष नेता म्हणून पाहतोय,’ असे वक्तव्य केले आहे. आगामी दशकभर महाराष्ट्राच्या राजकारणावर देवाभाऊंची पकड कायम राहील हे सांगण्यासाठी आता कुणा राजकीय पंडिताची गरज नाहीये. महाराष्ट्राच्या विकासाचा हा गाडा ज्या वेगाने पुढे जात आहे, त्याचे सारथ्य करणारा हा धुरंधर नेता आगामी काळात राष्ट्रीय राजकारणात प्रमुख स्थानावर दिसल्यास तमाम मराठीजनांमधून त्याचे कौतुकच होईल.
राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचे साधन नसते, तर ते समाजमनाचा ठाव घेऊन परिवर्तन घडवण्याचे शास्त्र असते. गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या कामगिरीचा आलेख पाहिला, तर त्यांनी या शास्त्रात प्रावीण्य मिळवले असल्याची मनोमन साक्ष पटते. पक्षात येणार्या प्रत्येकाची क्षमता पारखून त्याला योग्य स्थान देणे आणि कार्यकर्त्यांच्या फौजेला निवडणुकीच्या मैदानात बूथ स्तरावर सक्रिय करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य भाजपच्या विस्ताराचे आणि महायुतीच्या सलग विजयाचे मुख्य कारण ठरले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आजवरच्या इतिहासात कोणाही एका पक्षाला 48 टक्क्यांहून अधिक जागा मिळण्याची ही पहिली वेळ आहे. या यशामध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचा वाटा मोठा आहे; परंतु त्यापलीकडे जाऊन हे यश मिळवण्यासाठी लोकसभा निवडणुकांमधील पीछेहाटीनंतर विधानसभेमध्ये मुसंडी मारूनही हुरळून न जाता अतिशय चाणाक्षपणाने विजयासाठीचे सुसूत्र नियोजन करणे, जागावाटपामध्ये सामाजिक गणितांचे आकलन करणे, कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे, जनतेच्या प्रश्नांसाठी विविध योजनांची आखणी करणे या सर्वाचे नियोजन सरकारचा प्रमुख म्हणून जे देवाभाऊंनी केले त्याला तोड नाही.
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राज्याच्या राजकारणाचा इतिहास, भूगोल आणि व्याकरण बदलले असल्याची साक्ष देणारे आहेत. भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीने या निवडणुकांत दणदणीत विजय मिळवताना राज्यातील 288 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी तब्बल 215 ठिकाणी अध्यक्षपदे आपल्या ताब्यात घेतली आहेत. याउलट काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून केवळ 51 अध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकांत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. पक्षाने 129 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवला. विशेष म्हणजे, 2017 च्या स्थानिक निवडणुकांतील 1,602 नगरसेवकांवरून यावेळी भाजपची संख्या 3,325 वर पोहोचली आहे. शहरी आणि निमशहरी भागांत पक्षाची संघटनात्मक पकड लक्षणीयरीत्या वाढल्याचे हे द्योतक आहे. महायुतीच्या या विजयामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते, घटक पक्षांचे शीर्षस्थ नेते या सर्वांचा मोलाचा वाटा असला, तरी या यशावर एकहाती प्रभाव आहे, तो देवाभाऊंचा म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पीछेहाटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या तडफदारपणाने आणि कौशल्याने राजकीय समीकरणांना नवे आयाम दिले, त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकांमध्ये ढळढळीतरीत्या दिसून आले. महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासात आणि भाजपच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात कधीही मिळाले नव्हते इतके यश यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळाले. या निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह 32 आमदारांच्या साहाय्याने महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याची किमयाही देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विश्वासामुळेच शक्य झाली होती. त्या पाठोपाठ अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सामावून घेण्याचा फडणवीसांचा निर्णयही मास्टरस्ट्रोक ठरला. सुरुवातीला यामुळे भाजपला फटका बसेल असा अंदाज वर्तवला जात होता; परंतु फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांदरम्यान दिलेल्या मुलाखतींमधून या बेरजेच्या राजकारणाचे तर्कशास्त्र प्रभावीपणे पटवून दिले आणि जनतेने त्यावर ठेवलेला विश्वास विधानसभा निकालांमधून दिसून आला. या दोन्ही पक्षांना सोबत घेतल्यामुळे येणार्या काळात महाराष्ट्राचे राजकीय चित्र पालटणार, हे स्पष्ट झाले होते. नगरपालिका-नगरपंचायतींच्या निवडणुकांमधून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यातील 288 पैकी 129 नगराध्यक्ष एकट्या भाजपचे निवडून आले आहेत. 2017 मध्ये हा आकडा 94 होता. महायुतीने एकूण 75 टक्के नगराध्यक्षपदे पटकावली आहेत. 2017 मध्ये भाजपचे 1602 नगरसेवक होते. 2025 च्या निवडणुकीत ही संख्या दुपटीने वाढून 3,325 झाली आहे. राज्यातील एकूण नगरसेवकांपैकी एकट्या भाजपकडे 48 टक्के नगरसेवक आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे आणि अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचे हे फलित आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात भाजपचा विस्तार केला आहे, तो पाहिला असता राजकीय व्यवस्थापनशास्त्रातले अत्युत्तम उदाहरण म्हटले पाहिजे. सत्तेतून बाहेर फेकले गेल्यानंतरही न खचता त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून बजावलेली भूमिका असो किंवा उपमुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी दाखवलेला संयम आणि अभ्यासू वृत्तीने केलेले काम असो, राज्याच्या राजकारणात अशाप्रकारचे उदाहरण इतिहास आणि वर्तमानात नाही हे वास्तव आहे. ज्या ग्रामीण महाराष्ट्रात भाजपची ताकद एकेकाळी नगण्य किंवा दुर्लक्षित होती, तिथे आज घराघरात कमळ पोहोचले आहे. याचे मुख्य श्रेय फडणवीस यांच्या ‘गाव तिथे शाखा’ आणि ‘बूथप्रमुख’ या संकल्पनांच्या अंमलबजावणीला जाते. ग्रामीण भागातील जनतेला केवळ भावनिक साद न घालता त्यांच्या विकासाच्या प्रश्नांना हात घालणे आणि प्रामाणिकपणाने त्यांची सोडवणूक करणे हे फडणवीस यांच्या धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. मग, ते जलयुक्त शिवार योजनेचे पुनरुज्जीवन असो वा शेतकर्यांना सौरऊर्जेद्वारे मोफत वीज देण्याची ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ असो, ‘लाडकी बहीण’ योजना असो किंवा सातबाराचा निर्णय असो. या प्रत्येक योजनेने ग्रामीण भागातील मतदारांच्या मनात देवाभाऊंबद्दल एक विश्वासाचे नाते निर्माण केले.
फडणवीस यांच्या राजकीय धोरणांमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘परफेक्टनेस’. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कोणाशी युती करायची, कोणत्या जागांवर ताकद लावायची आणि कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवायचे, याचा अभ्यास ते अत्यंत शास्त्रीय पद्धतीने करतात. महायुतीच्या जागावाटपावेळी त्यांनी ज्या संयमाने आणि मुत्सद्देगिरीने निर्णय घेतले, त्यामुळेच आज 75 टक्क्यांहून अधिक नगरपालिकांवर महायुतीचा भगवा फडकत आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र, एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानले जायचे; परंतु फडणवीस यांनी हा सहकाराचा अक्ष पूर्णपणे भाजपकडे वळवला आहे. अनेक साखर कारखाने आणि दूध संघांच्या निवडणुकांमध्ये भाजप किंवा मित्रपक्षांनी मिळवलेला विजय हा याच धोरणात्मक बदलाचा भाग आहे.
महाराष्ट्राची सामाजिक गुंतागुंत मोठी विलक्षण आहे. फडणवीस हे उच्चवर्णीय असल्याने त्यांच्यासाठी ही गुंतागुंत सोडवणे अधिक क्लिष्ट होते; परंतु विविध जातीसमुदायांचे प्रश्न मुळाशी जाऊन समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांना तोड नाही. मराठा समाजातील तरुण-तरुणींसाठी त्यांच्या कार्यकाळात घेतले गेलेले कल्याणकारी निर्णय राज्याच्या 65 वर्षांच्या इतिहासात कधीच झाले नाहीत. दुसरीकडे ओबीसी, धनगर आणि दलित समाजातील उपेक्षित घटकांना पक्षाशी जोडण्यासाठी विविध सामाजिक योजनांचा प्रभावी वापर केला. ‘शासन आपल्या दारी’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ थेट शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून त्यांनी ‘पॉलिटिक्स ऑफ डिलिव्हरी’चा नवा पायंडा पाडला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील दुर्गम भागात जिथे रस्ते आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होता, तिथे पायाभूत सुविधांचे जाळे विणून त्यांनी जनतेला विकासाची नवी स्वप्ने दाखवली.
राजकीय डावपेच खेळताना फडणवीस यांनी कधीही स्वतःची मर्यादा ओलांडली नाही. विरोधकांकडून होणार्या वैयक्तिक टीकेला उत्तर न देता त्यांनी आपल्या कामातून प्रत्युत्तर देण्यावर भर दिला. आज फडणवीसांच्या दूरद़ृष्टीमुळेच गडचिरोलीसारखा जिल्हा नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडून देशाचे ‘स्टील हब’ बनू पाहत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सरकारच्या योजना आणि नेतृत्वावरील विश्वास याशिवाय हे घडून आले नसते. उद्योगधंद्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि दावोस सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची मांडलेली भक्कम बाजू यामुळे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
जागतिक तत्ववेत्ता प्लेटो म्हणतो, जोपर्यंत तत्वज्ञ राजे होत नाहीत किंवा राजसत्ता चालवणारे तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करत नाहीत, तोपर्यंत राज्यांमधील दुःखे संपणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहताना प्लेटोच्या या विधानाची प्रचिती येते. राजकारणात केवळ गर्दी जमवणारा नेता असून चालत नाही, तर त्या गर्दीला दिशा देणारा, गर्दीत बसलेल्यांचे प्रश्न संवेदनशीलपणाने समजून घेऊन त्यांचे निराकरण करणारा ‘अभ्यासू’ नेता असावा लागतो. देवाभाऊंचा कामाचा झपाटा, प्रशासनावरील पकड, कायद्याचे आकलन, अर्थकारणातील प्राविण्य आणि तांत्रिक विषयांवरील त्यांचे प्रभुत्व हा अनेक गुणांचा समुच्चय त्यांना ‘स्टेटस्मन’ बनवणारा आहे. चाणक्य नीती सांगते की, शत्रू कितीही प्रबळ असला तरी, आपल्या बुद्धीच्या आणि नियोजनाच्या जोरावर त्याला नामोहरम करता येते. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतरही गाफील न राहता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतः मैदानात उतरून सभा घेणे आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देणे, ही त्यांची कार्यपद्धती त्यांच्यातील अजेय विजिगीषु वृत्तीचे दर्शन घडवते. सध्याच्या बेताल राजकारणामध्ये राहूनही प्रचंड संयमी आणि आक्रमक भाषणातही तोल ढळू न देणारी समतोल वक्तृत्वशैली त्यांना मैदान गाजवणाराच नव्हे तर गर्दीचे रुपांतर प्रत्यक्ष मतांमध्ये परावर्तीत करणारा वक्ता म्हणून पुढे आणणारी ठरली आहे. आकडेवारी आणि तर्कसंगत विचार यावर आधारित त्यांचे राजकारण आजच्या तरुणाईला आणि ग्रामीण जनतेलाही भावत आहे.