चीनने मागील काही दशकांत समुद्र विज्ञान आणि समुद्र संशोधनाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आता तो दक्षिण चीन समुद्राखाली अत्याधुनिक समुद्र संशोधन केंद्र’ विकसित करणार आहे. चीनचे हे केंद्र केवळ वैज्ञानिक उद्देशांसाठी नसून त्यामागे प्रबळ लष्करी, आर्थिक आणि धोरणात्मक हेतू आहेत. या केंद्रामुळे संपूर्ण जगाच्या सुरक्षा आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणांमुळे आणि अन्य वादग्रस्त निर्णयांमुळे बरीच खळबळ उडाली आहे. जागतिक पटलावर चर्चेचा केंद्रबिंदू अमेरिका बनल्यामुळे चीनविषयीच्या चर्चा मागे पडल्या आहेत. तथापि, भारताचा शेजारी देश आणि क्रमांक दोनचा शत्रू असल्यामुळे आपल्याला चीनच्या हालचालींवर सदैव लक्ष ठेवणे क्रमप्राप्त आहे. चीनने मागील काही दशकांत समुद्र विज्ञान आणि खोल समुद्र संशोधनाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. या संशोधनामध्ये वैज्ञानिक, औद्योगिक आणि लष्करी उद्दिष्टांचा समावेश असून या उपक्रमांमुळे भारतासाठी संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात.