बहार

शोध सुखाचा : मिरर टेक्निक

Arun Patil

[author title="सुजाता पेंडसे" image="http://"][/author]

आतापर्यंत तुम्हाला थॉट पॅटर्न म्हणजे विचारांची रीत काय आहे, काय पद्धतीचे विचार आपण जास्त करतो, हे समजलेले आहे. स्वत:च्या विचार पद्धतीकडे थोडं बाजूला राहून पाहता येणं ही तुमच्या प्रगतीची छोटी का असेना; पण पहिली पायरी आहे. ज्याला किमान कळतंय की, माझ्या मनात काय काय सुरू आहे, त्याने चांगल्या बदलाचा प्रवास सुरू केलेला असतो.

आपल्या विचारांकडे बघताना तुमच्या लक्षात आलेच असेल की, हे विचार बरोबर आहेत किंवा अमुक विचार चुकीचे आहेत, हाही विचार फरक आता तुमच्या मनात येतो आहे. या ठिकाणी एक गडबड होऊ शकते, तुम्ही तुमच्या विचारांचे दोनच भागात विभाजन करत राहता. ते म्हणजे ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट. या दोन्हीत तुमचे विचार घालून बघता. पण विचारांच्या या दोनच कॅटॅगरी नाहीत, तर दोन्हीच्या मधलीसुद्धा एक फेज असते. ज्यात काही थोडं बरोबर असतं, तर थोडं चूक असतं. एखादा माणूस संपूर्णपणे चुकीचा असतो आणि तसाच शेवटपर्यंत राहतो, वागतो, अशी टोकाची उदाहरणे अपवाद असतात. प्रत्येक माणसात काही भले-बुरे असते. त्यामुळे विचारांचे ज्ञान झाले तरी एकदम स्वत:ला दोषी धरू नका किंवा 'मी संपूर्ण बरोबरच,' असा विचार करू नका, तर बदलायची तयारी ठेवा आणि त्याची प्रोसेस लगेचच सुरू करा.

बर्‍याचवेळा माणसाला चांगलं काही करून बघायची भावना त्या क्षणी अनावर होते; पण ते करण्यामध्ये सातत्य ठेवणं अजिबात जमत नाही. जेव्हा तुम्ही एखादी चांगली गोष्ट ऐकता किंवा वाचता, तेव्हा काही क्षण मनाला त्या विचारांनी भारून गेल्यासारखं होतं, त्यावेळी तुम्ही ठरवता की, 'काही झालं तरी मी हे करणारच!' ही मनाची स्थिती जोवर असते, तोवर ते केलं जातं. परंतु तो निश्चय नंतर अक्षरश: विरून जातो कारण 'सातत्य राखणं' हा दुर्मीळ गुण आहे, जो तसा प्रत्येकाकडे असतो; पण आळस किंवा 'बघूया नंतर!' 'नाही केलं म्हणून काय आकाश कोसळणार आहे?', 'इतके दिवस कुठे माहीत होतं? तेव्हाही आयुष्य चाललंच होतं की!' अशा प्रकारची अनेक आळशी समर्थनं करायला माणूस तत्पर असतो, त्यामुळं सातत्य राखण्यात माणूस स्वत:च खोडे घालत असतो. म्हणून काही झालं तरी ज्याला स्वत:मध्ये बदल करून सुखाकडे जायचंय, त्याने सराव आणि सातत्य या दोन गोष्टी सोडायच्या नाहीत. भले परिणाम लगेच दिसणार नाहीत; पण ते होत असतात.

आपल्या विचारांचा पॅटर्न कळल्यानंतर एक प्रभावी तंत्र तुम्हाला वापरता येईल, ते म्हणजे 'मिरर टेक्निक.' हे एक तंत्र आहे की, ज्यामुळे अनेक चांगले बदल कमीत कमी वेळात तुम्हाला दिसू लागतील. काय आहे हे तंत्र, याबद्दल जाणून घेऊया.

'आरसा' हा माणसाचा दैनंदिन जीवनातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक जण स्वत:ला आरशात पाहत असतो; पण तेव्हा तो फक्त आपले प्रतिबिंब पाहत असतो. मात्र त्याही पलीकडे तुमची तुमच्या मनातली इमेजही दाखवत असतो, ज्याकडे कुणीच गांभीर्याने पाहत नाही. उदा. तुम्ही जेव्हा आरशात बघता, तेव्हा काय बघता? तुमचे रंग-रूप, पोशाख, हेअरस्टाईल. पादत्राणे किंवा अशा गोष्टी बघता, ज्यांनी तुमचे शरीर सजवले जाते. 'कोणतीही व्यक्ती हेच बघते.. त्यात काय?' असाही विचार मनात आलाच असेल. इथे तेच सांगायचे आहे की, आरशातले रंग-रूप न्याहाळताना तुम्ही स्वत:वर मनोमन नकळत कॉमेन्टही करता, ज्या बर्‍या किंवा वाईट असतात. ज्याचा नकळत तुमच्या मनावर मोठा प्रभाव पडतो.

एक उदाहरण घेऊया. एखादी स्त्री जी 'वेट लॉस'साठी धडपडतेय. एक-दोन किलो वजन कमी झालंय म्हणून तिने छान हवा तसा ड्रेस घालताय; परंतु आरशात पाहताना तिला दिसतं की, हा ड्रेस आपल्याला चांगला दिसत नाही. अजून काही किलो वजन कमी केल्याशिवाय हा आपल्याला शोभणार नाही. म्हणजे एका प्रतिबिंबाने किती निगेटिव्ह विचार आणले, तर 'अजून मी जाड आहे!', 'मला हवे ते कपडे घालता येत नाहीत.' 'मनासारखे काही खाता-पिता येत नाही, कारण डाएट सांभाळल्याशिवाय वजन कमी होणार नाही!' वगैरे विचारांची मालिकाच मग मनात सुरू होते. काही जणी त्याकडे दुर्लक्ष करून तोच ड्रेस घालून बाहेर जातीलही; पण मनात रुखरुख राहूनच जाते. असे जे विचार विश्वासाने.. संपूर्णपणे पटून सुप्त मनात पोचतात, ते परिणाम घडवून आणतात. मग कितीही डाएट केले तरी वजन कमी होत नाही. मग पुन्हा वैताग.. चिडचिड. शेवटी प्रयत्न थांबतात.

हे एक छोटंसं उदाहरण आहे. आरशात बघितल्यावर तुम्ही सगळे काय काय, कुठपर्यंत विचार करता हे जाणून घ्याच एकदा. ज्यामुळे सुप्त मनात काय काय पोचलंय, ते कळू शकतं. आता याच आरशाचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करायचा ते बघू या.

तुमच्या घरातला असा एक आरसा निवडा, जिथे तुम्ही एकटे काही वेळ राहू शकता. बेडरूममधला आरसा किंवा बाथरूममधल्या आरशाचाही तुम्ही वापर करू शकता. शक्यतो सकाळची शांत वेळ किंवा झोपायला जाण्यापूर्वीची वेळ निवडा. आरशासमोर जाऊन उभे राहा. अगदी शांतपणे स्वत:चे पोश्चर नीट करा. खांदे थोडे पाठीमागे खेचा. हनुवटी किंचित वर करून आत्मविश्वासाने तुमच्या प्रतिबिंबाकडे पाहा. इकडे तिकडे न पाहता तुमच्या डोळ्यांवर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वसन करा. मन शांत.. स्वस्थ झाले की, तुम्ही जी अषषळीारींळेपी केली आहेत त्याबद्दल विचार करा. मी हवं ते मिळवलं. आभारी आहे.. आभारी आहे..' म्हणत आरशाशी अजून जे काही उत्तम बोलता येईल ते सर्व बोला. मनात काही क्षण हा आनंद साठवून घ्या.

असे कोणत्याही इच्छेबाबत तुम्ही करू शकता. यापूर्वी आपण अषषळीारींळेपी बद्दल जाणून घेतलंच आहे. त्यामुळे हव्या त्या गोष्टींबद्दल विचार करताना काही वाक्ये तुम्ही अशीही घेऊ शकता. 'मी आरशात पाहिलं की माझा आत्मविश्वास वाढतो!', 'संपत्ती माझ्याकडे आकर्षित होते. मला हवे ते मिळत राहते!', 'माझे कुटुंब, मी खूप आनंदात आहोत!', 'मला हव्या त्या प्रशस्त घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे!', 'माझी प्रकृती अत्यंत स्वस्थ आणि निरोगी आहे!'

ही वाक्ये 'मी' किंवा 'तू' असे शब्द वापरूनही म्हणता येतील. ज्या वाक्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल वाटते, असे संबोधन घ्या. ही वाक्ये मनातल्या मनात म्हणण्यापेक्षा मोठ्याने.. किमान तुम्हाला स्वत:ला ऐकू येतील अशी असावीत. किमान पाच मिनिटे रोज सकाळ-संध्याकाळ हा सराव करावा. यात सातत्य अत्यंत महत्त्वाचे.

सुरुवातीला आरशासमोर उभे राहून काही बोलणे, हे ऑकवर्ड वाटू शकेल; मात्र सरावाने ते सोपे जाईल. किमान सात दिवस न चुकता ही सवय केली तर ते विचार सुप्त मनापर्यंत पोहचण्यास मदत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT