मुंबई : स्कोडा ऑटो इंडियाने नवी कोरी स्लाविया 1.0 टीएसआय सेडान सादर केली. या गाडीची किंमत 10.69 लाख अशा अतुलनीय किमतीपासून सुरू होते. स्लाविया 1.0 टीएसआयमध्ये तीन व्हेरिएंटस आहेत आणि यात दोन ट्रान्समिशनचे पर्याय दिले आहेत. 6 स्पीड टॉर्क कन्वहर्टर अॅटोमॅटिक आणि सनरूफ पर्यायासह फुल्ली लोडेड स्टाईल व्हेरिएंट ही सगळ्यात महाग कार 15.39 लाख या किमतीला उपलब्ध आहे. स्लाविया 1.0 टीएसआयच्या सर्व व्हेरिएंटमध्ये सिक्स स्पीड मॅन्युअल गीअरबॉक्स उपलब्ध असेल.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर झॅक होलिस म्हणाले, 'नव्या स्लाविया 1.0 टीएसआयच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना अतुलनीय असे मूल्य देऊ करत आहोत. ही कार फक्त किमतीच्या बाबतीतच लक्षणीय नाही तर गाडी बाळगण्याचा खर्च आणि देखभालीचा खर्च याबाबतीतही फार काळजीपूर्वक या गाडीची रचना केली आहे. त्यामुळेच स्लाविया ही एक परिपूर्ण गाडी ठरते.'
यात कमाल 6 एअर बॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, वळणांवरील अधिक चांगल्या ट्रॅक्शनसाठी इलेक्ट्रॉनिक डिफरेंशिअल सिस्टम आणि अपघात झाल्यास गाड्या एकमेकांवर आदळण्याची शक्यता दूर करण्यासाठी मल्टि कोलिशन ब्रेक अशा सुविधा आहेत.
त्यामुळे गाडी एकदम आदळून बंद न होता हळूहळू सुरक्षित पद्धतीने थांबते. स्लाविया 1.0 टीएसआयमध्ये 4 वर्षे/100,000 किमी वॉरंटी मिळते. स्लाविय क्रीस्टल ब्लू, भारतासाठी टोरनॅडो रेड एक्स्लुसिव्ह, कँडी व्हाईट, ब्रिलियंट सिल्व्हर आणि कार्बन स्टील रंगात उपलब्ध आहे.