Volkswagen Virtus Anniversary Edition File Photo
ऑटोमोबाईल

Volkswagen Virtus Anniversary Edition: 'ही' कार केवळ १५० लोकांनाच खरेदी करता येणार; भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर

प्रसिद्ध कार कंपनी फोक्सवॅगनने आपल्या लोकप्रिय 'व्हर्टस' या सेडान कारला भारतात ४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'Virtus Anniversary Edition' ही विशेष कार लाँच केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Volkswagen Virtus Anniversary Edition

नवी दिल्ली: प्रसिद्ध कार कंपनी फोक्सवॅगनने आपल्या लोकप्रिय 'व्हर्टस' या सेडान कारला भारतात ४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'Virtus Anniversary Edition' ही विशेष कार लाँच केली आहे. या नव्या मॉडेलमध्ये आकर्षक लूक आणि नवा रंग देण्यात आला असून, याची एक्स-शोरूम किंमत १९.१९ लाख रूपये आहे.

काय आहे खास?

या स्पेशल कारची सर्वात मोठी ओळख म्हणजे तिचा 'ॲव्होकॅडो पर्ल' हा नवा रंग. यासोबतच काळ्या रंगाचे छत आणि काळे अलॉय व्हील्स देण्यात आल्यामुळे कारला अधिक स्पोर्टी लूक मिळतो. भारतीय बाजारातील चार वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर लाँच करण्यात आलेली Virtus Anniversary Edition ही मर्यादित संख्येत उपलब्ध होणार असून, केवळ १५० गाड्या विकल्या जाणार आहेत.

फीचर्समध्ये बदल नाही

कारच्या इंटीरियर आणि फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Virtus Anniversary Edition मध्ये २०.३२ सेंमी डिजिटल कॉकपिट, इलेक्ट्रिक सनरूफ, अॅल्युमिनियम पेडल्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, रेन-सेंसिंग वायपर्स आणि ऑटो-डिमिंग इनसाइड रिअर-व्ह्यू मिरर यांसारखी फीचर्स मिळतात. ग्राहक अधिकृत Volkswagen डीलरशिपकडून ३६०-डिग्री कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि पुडल लॅम्प्स यांसारख्या कंपनीच्या अधिकृत अॅक्सेसरीजही खरेदी करू शकतात.

१.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन

कारमध्ये १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन असून ते १५० PS पॉवर देते आणि २५० Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत ७-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारचे मायलेज १९.६२ किमी प्रति लिटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.

सुरक्षेच्या बाबतीतही दमदार

सुरक्षेच्या बाबतीत ही कार अत्यंत मजबूत आहे. यात ६ एअरबॅग्स आणि ४० पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स आहेत. 'ग्लोबल NCAP' क्रॅश टेस्टमध्ये या कारला ५-स्टार रेटिंग मिळालेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT