Nissan Gravite file photo
ऑटोमोबाईल

Nissan Gravite: भारतातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

जपानी कार उत्पादक कंपनी निसानने आपली नवीन कार Nissan Gravite लाँच केली आहे.

मोहन कारंडे

Nissan Gravite launch India

नवी दिल्ली : जपानी कार उत्पादक कंपनी निसानने आपली नवीन कार Nissan Gravite लाँच केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कारचे नाव 'ग्रॅविटी' (गुरुत्वाकर्षण) पासून प्रेरित आहे. आकर्षक लूक आणि प्रगत फीचर्सनी सज्ज असलेल्या या ७-सीटर कारची सुरुवातीची किंमत ५.६५ लाख रूपये (एक्स-शोरूम) आहे.

निसानने नवीन Gravite साठी अधिकृत बुकिंग सुरू केले आहे. इच्छुक ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा डीलरशिपवरून ही कार बुक करू शकतात. विशेष म्हणजे, पहिल्या ५,००० ग्राहकांसाठी कंपनीने 'स्पेशल इंट्रोडक्टरी प्राईस' जाहीर केली आहे, म्हणजेच सुरुवातीच्या ग्राहकांना ही कार कमी किमतीत घरी नेण्याची संधी मिळेल.

देशातील सर्वात स्वस्त ७-सीटर कार

केवळ ५.६५ लाख रूपयांना मिळणारी Nissan Gravite ही देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार आहे. ही कार प्रामुख्याने Renault Triber वर आधारित आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ५.७६ लाख आहे. या दृष्टीने पाहिल्यास, सध्या बाजार उपलब्ध असलेल्या ७-सीटर MPV कारमध्ये ही सर्वात स्वस्त ठरली आहे. या कारच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये बदल करण्यात आले आहेत. Gravite खास करून मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार आणि दैनंदिन गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.

वैशिष्ट्ये काय आहेत?

यामध्ये वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, पुश-बटण स्टार्ट आणि स्टॉप, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक LED हेडलॅम्प आणि रेन-सेन्सिंग वायपर्स आहेत. सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज समाविष्ट आहेत. रियर एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पार्किंग सेन्सर्स, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स, वायरलेस चार्जिंग पॅड, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, रिव्हर्स कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम देखील उपलब्ध आहे.

Nissan Gravite ची मर्यादित लाँच एडिशन देखील सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये फक्त १,००१ युनिट्स तयार केल्या जात आहेत. या स्पेशल एडिशनमध्ये JBL साउंड सिस्टम, ड्युअल-चॅनल डॅशकॅम, अॅम्बियंट लाइटिंग आणि अनेक अतिरिक्त फीचर्स समाविष्ट आहेत.

इंजिन आणि मायलेज

  • इंजिन प्रकार- १.० लिटर, ३ सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल

  • पॉवर / टॉर्क- ७२ HP / ९६ Nm

  • गियरबॉक्स- ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT

  • मॅन्युअल मायलेज- १९.३ किमी/लिटर

  • AMT मायलेज- १९.६ किमी/लिटर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT