Yogini Ekadashi
जाणून घ्या योगिनी एकादशीचे महत्त्व, पूजाविधी आणि महत्त्वाच्या वेळा PUDHARI
ज्योतिष आणि धार्मिक

Yogini Ekadashi 2024 | जाणून घ्या योगिनी एकादशीचे महत्त्व, पूजाविधी आणि महत्त्वाच्या वेळा

चिराग दारुवाला

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना वाहिलेली एकादशी म्हणजे योगिनी एकादशी. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आषाढ महिन्यातील पहिली एकादशी म्हणजे योगिनी एकादशी होय. या दिवशी व्रत केल्याने जगातील सर्व प्रकारचे आनंद प्राप्त होतात. या दिवशी जर दानधर्म केला तर ८४ हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पूण्यप्राप्त होते. योगिनी एकादशी केव्हा आहे, आणि या दिवशी कोणते शुभ योग साकारत आहेत, याची माहिती आपण घेऊ.

योगिनी एकादशी केव्हा आहे?

आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ही भगवान विष्णूला वाहिलेली असते. या दिवशी योगिनी एकादशी साजरी करतात. योगिनी एकादशी २ जुलैला आहे. या दिवशी व्रत केला जातो आणि माता लक्ष्मची पूजा केली जाते. याशिवाय काही विशेष उपाय ही केले जातात, जेणे करून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

योगिनी एकादशीच्या मुहूर्तावर चार महत्त्वाचे योग साकारात आहेत. पवित्र हृदयाने या दिवशी व्रत केले तर जीवनात कधीही पैशांची कमतरता पडत नाही, त्यामुळे हे व्रत सर्वांनी करावे असे सांगितले जाते.

एकादशी केव्हा सुरू होत आहे?

योगिनी एकादशी तिथी १ जुलैला सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून २३ मिनिटांनी संपले. त्यामुळे उदयतिथीनुसार २ जुलैला योगिनी एकादशीचा उपवास करावा.

योगिनी एकादशी व्रताचे महत्त्व

धार्मिक मतांनुसार योगिनी एकादशीचा उपवास केल्याने पापमुक्ती मिळते. भगवान विष्णूंनी असे सांगितले आहे की या दिवशीचे व्रत म्हणजे ८८ हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पूण्य मिळवण्यासारखे आहे.

ज्यांना या योगिनी एकादशीचा उपवास करायचे आहे, त्यांना दशमीच्या दिवशीपासूनच उपवास करावा, असे धर्मग्रंथ सांगतात. तसेच उपवासाचे नियम आणि विधी यांचे काटेकोर पालन करावे.

ही एकादशी सर्व संकटं, अडचणी, दारिद्र्य आणि पाप यांचे निर्दालन करणारी आहे, त्यामुळे योगिनी एकादशीला फार महत्त्व आहे.

योगिनी एकादशीचे पूजाविधी

  • योगिनी एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाचीही पूजा करू शकता.

  • सकाळी शुचिभूर्त होऊन पिवळे कपडे परिधान करावेत.

  • त्यानंतर उपवास करावा आणि विष्णूची पूजा करावी आणि योगिनी एकादशीची कथा वाचावी. त्यानंतर भगवान विष्णूची आरती करावी.

  • या दिवशी दानधर्म, अन्नदान, गरजूंना मदत करणे अशांनी भगवान विष्णू प्रसन्न होतात.

SCROLL FOR NEXT