Yogini Ekadashi
योगिनी एकादशी File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

योगिनी एकादशी : जाणून घ्या श्री हरी पूजेचा मुहूर्त

श्री व्यंकटेश शास्त्री, ज्योतिष पंडित, वास्तुतज्ञ

आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या ११व्या तिथिला एकादशी व्रत पाळले जाईल. एकादशी महिन्यातून दोनदा येते. प्रत्येक एकादशी तिथीचे स्वतःचे नाव आणि महत्त्व असते. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना योगिनी एकादशीचे महत्त्व सांगितले होते. जो योगिनी एकादशीचे व्रत करतो त्याला पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. या विशेष दिवशी जगाचा रक्षक भगवान श्री हरी यांची पूजा केली जाते आणि व्रत पाळले जाते.

हरी पूजेचा मुहूर्त कधी आहे?

हिंदू पंचांगानूसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी १ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.२६ वाजता सुरू होईल आणि २ जुलै २०२४रोजी सकाळी ८.४२ वाजता समाप्त होईल. योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी भगवान विष्णूची पूजा केली जाते. 2 जुलै रोजी सकाळी ८.५६ ते दुपारी २.१० पर्यंत श्री हरी पूजेचा शुभ मुहूर्त आहे.

विष्णूची पूजा करण्याचे महत्त्व

पद्म पुराणानुसार योगिनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि त्याचबरोबर या व्रताच्या पुण्यमुळे अनेक यज्ञांच्या बरोबरीचे फळ प्राप्त होते. योगिनी एकादशीला भगवान विष्णूची पवित्र भावनेने पूजा करावी. या दिवशी भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी द्यावे. या एकादशीला रात्रीच्या जागरनाचे विशेष महत्त्व आहे. असे केल्याने धन, सुख आणि समृद्धी प्राप्त होते.

SCROLL FOR NEXT