Weekly Horoscope AI Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Weekly Horoscope: 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव, तर 'यांचे' टेन्शन वाढणार; तुमचा आठवडा कसा जाणार?

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य ६ ते १२ सप्टेंबर २०२६ जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Weekly Horoscope

हा सप्ताह मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन राशिगटाला उत्तम, तर वृषभ, कन्या, मकर राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश : दि. ७-बुध कन्येत १३/३४. महत्त्वाचे ग्रहयोग : दि. १२-बुध प्रतियुती नेपच्यून, बुध त्रिकोण प्लुटो. वक्री ग्रह: शनी, नेपच्यून, प्लुटो. दि. ११-हर्षल. अस्तंगत ग्रह : बुध दि. ७पर्यंत.

मेष

मेष

रवी केतू ५ वे. मनाची कुचंबणा होत राहील. शिक्षणात अडचणी येऊ शकतात. गाफील राहू नका. धंद्यातील विस्कटलेली घडी पूर्ववत करण्याचा यशस्वी प्रयत्न कराल; पण विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. अर्थप्राप्ती व गृहसौख्य लाभेल. संततीसाठी वेळ द्याल. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल; पण कष्ट जास्त होतील.

वृषभ

वृषभ

रवी केतू ४ थे. मनावर घरगृहस्थीचे दडपण राहील. कुटुंबात मनमानी कराल. आर्थिक प्राप्ती होईल. नोकरी मिळेल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. जवळच्या व्यक्तींचे दूरत्व जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरज भागवाल. गाठीभेटी, प्रवास यश मिळवून देईल. नातेवाईकांसाठी वेळ द्यावा लागेल. संततीसौख्य लाभेल.

मिथुन

मिथुन

रवी गुरू २ रे. आर्थिक प्राप्ती चांगली; पण कष्टाने जेमतेम होईल. भांवडांशी वाद झाले, तरी समजूतदारपणा दाखवाल. महत्त्वाकांक्षी राहाल; पण इतरांना दुखवू नका. विवाह जुळेल. जास्त जबाबदारीने कामे करावी लागतील. सप्ताहात वरिष्ठांचे दडपण राहील; पण कामात यश मिळवाल. आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. कामे बिघडतील. चिडचिड होईल.

कर्क

कर्क

र. के. २ रे. कुटुंबात समस्या राहतील. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. कायदेशीर बाबी सांभाळा. बोलण्याने माणसे दुखावली जातील. एखादी शारीरिक व्याधी जाणवेल. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. मिष्टान्नाचा लाभ होईल. कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी घ्या. प्रवास करा. कामात यश मिळेल.

सिंह

सिंह

र. के.१ ले. महत्त्वाकांक्षी बनाल; पण चिडचिड करत राहाल. स्वतःसाठी खर्च होईल. परदेशगमनाची संधी लाभेल. प्रॉपर्टीची कामे होतील. आर्थिक प्राप्ती होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाची सुरुवात आर्थिक लाभाने होईल. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा भागवाल.

कन्या

कन्या

२. के. १२ वे. आवश्यक खर्च वाढेल. महत्त्वाकांक्षी बनाल. गुरुकृपा राहील. आर्थिक प्राप्ती अनेक मार्गांनी होईल. बोलून इतरांना दुखवू नका. चुकीला क्षमा मिळणार नाही. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यातील अस्थिरता जाणवेल; पण यश मिळेल. एक-दोन दिवस खर्चाचे, त्रासाचे, चिडचिडीचे जातील. कामे रेंगाळली, तर सप्ताहाच्या शेवटी पूर्ण कराल.

तूळ

तूळ

२. के. ११ वे. आर्थिक प्राप्ती होईल. नावलौकिक वाढेल. मित्रासाठी खर्च कराल. महिलांना प्रसूतीसमयी त्रास तुळ संभवतो. कामात अधिकार राहील. व्यक्तिमत्त्व विकासा-कडे लक्ष द्याल. प्रवास घडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. कामाचा मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. कामे रेंगाळतील.

वृश्चिक

वृश्चिक

२. के. १० वे. कार्यक्षेत्र वाढेल. गुरुकृपा राहील. बढतीचे योग येतील. विवाह जुळेल. कामात यश मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल. विपरीत घटनेतून लाभ होईल. भावनिक दडपण येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा जाणवेल. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. गुरुभेट होईल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक प्राप्ती होईल.

धनु

धनु

र. के. ९ वे. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. धार्मिक कृत्ये कराल. शारीरिक व्याधी जाणवेल. कौटुंबिक खर्च वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल. भाग्यकारक अनुभव येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. विश्वासार्हता टिकवाल. मनावर वरिष्ठांचे दडपण होईल. सप्ताहाच्या शेवटी कामाचे समाधान लाभेल.

मकर

मकर

र. के. ८वे. कष्ट वाढतील. शारीरिक व्याधी जाणवेल. कौटुंबिक खर्च वाढेल. अर्थप्राप्तीही होईल. गुरुकृपा राहील. लिखाणात चूक करू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल; पण मोबदला कमी मिळेल. सहकार्याने कामे होतील. आर्थिक प्राप्ती होईल. यश मिळेल. थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी मनावर वरिष्ठांचे दडपण राहील.

कुंभ

कुंभ

र. के. ७ वे. कामासाठी प्रवास घडेल. विपरीत घटनेतून लाभ होईल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. अतिआत्मविश्वास राहील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीच्या समस्या सोडवा. कामात यश मिळेल; पण गोड बोलावे लागेल. संभाषणात वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी थकवा जाणवेल.

मीन

मीन

र. के. ६ वे. कामात यश मिळत राहील. आर्थिक प्राप्ती होईल. गुरुकृपा व आत्मविश्वास राहील. प्रॉपर्टीची कामे होतील. परदेशगमनाची संधी लाभेल. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. संततीसुख लाभेल. कामात यश मिळत राहील; पण श्रेय कमी मिळेल. भावनिक दडपण राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT