Weekly Horoscope
हा सप्ताह वृषभ, सिंह, धनु, मकर राशिगटाला उत्तम, तर कर्क, वृश्चिक, मीन राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. महत्त्वाचे ग्रहयोग: दि. १२-बुध युती मंगळ, वक्री ग्रह : हर्षल, नेपच्यून, शनी. दि. ११-गुरू वक्री, दि. ९ बुध वक्री.
मेष रवी शुरू ७ वा. अहमपणामुळे भावनिक दडपण वाढेल, विपरीत घटनेतून लाभ होईल. डोळ्याचे, घशाचे विकार जाणवतील. भावंडांशी वाद टाळा. निर्णायक कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास इ.साठी खूप धावपळ होईल. घरगृहस्थीचे सुख लाभेल. कामात शिथिलता येईल. सप्ताहाच्या शेवटी संततीचा सहवास लाभेल.
कामात यश रवी शुक्र ६ वा. कामात यश मिळत राहील. श्रेय कमी मिळेल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. कौटुंबिक खर्च वाढेल, कायमस्वरूपाची नोकरी मिळेल. बिवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. गाठीभेटी, प्रवास इ. साठी धावपळ करून यश मिळेल. शेवटी थकवा जाणवेल.
रवी शुक्र ५ वा, धार्मिक कृत्ये कराल. कला क्षेत्रात आघाडी घ्याल. विवाह जुळेल. कामाची खूप जबाबदारी राहील. सुवर्णालंकारांची प्राप्ती होईल. परदेशगमन पडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला खूप उत्साहाने कामे कराल, गोडधोड बेत कराल. कुटुंबाच्या गरजा भागवाल, सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवास ३. धावपळ करून यश मिळवाल.
रवी शुक्र ४ था. घरगृहस्थीची मधूनमधून काळजी वाटेल. घरात पुढाकार घ्याल. वाहनसौख्य लाभेल, कायदेशीर बाबी सांभाळा, आनंदी आशावादी, कर्तव्य दक्ष राहाल. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा भागवाल, खर्च होईल.
रवी शुक्र ३ रा. नवीन कौशल्याची कामे करण्याची धमक राहील. यश मिळवाल, आध्यात्मिक क्षेत्रात मोठे यश मिळवाल. कामात विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होतील, एक-दोन दिवस खचर्याचे कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी पूर्ण कराल, जामीन राहू नका.
रवी शुक्र २. रा. आर्थिक प्राप्ती चांगली, जेमतेम, कष्टाने होईल, सुवर्णालंकारांची प्राप्ती होईल, वडिलांच्या प्रकृतीची काळजी प्या. विवाहास अनुकूलता लाभेल, सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचे समाधान मिळेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील, खर्च वाढेल, चिडचिड होईल. कामे रेंगाळलेली, तरी सप्ताहाच्या शेवटी ती पूर्ण कराल.
रवी शुक्र १ ले. आनंदी, उत्साही राहाल. प्रकृती नरमगरम राहील. भागीदारीचे व्यवहार तपासून पाहा. अधिकार अपेक्षेप्रमाणे चालणार नाहीत. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. सप्ताहाच्या सुरवातीला वरिष्ठांच्या सूचना विचाप्नात घेऊन कामे कराल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. कामात समाधान लाभेल. खर्च वाढेल.
रबी शुक्र १२ से. चैनीसाठी माफक खर्च कराल. आर्थिक प्राप्ती होईल. धंद्यातील अंदाज चुकू शकतील. भावनावेग आवरा, प्रशिक्षणासाठी निवड होईल, भावनिक दडपण राहील, सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामाचे समाधान मिळवाल. सप्ताहाच्या शेवटी शेवटी आर्थिक प्राप्ती होईल.
रवी शुक्र ११ में. मोठे आर्थिक लाभ होतील. मित्रपरिवासाठी करमणुकीसाठी खर्च कराल. भावनिक दडपण राहील, कर्णविकार जाणवेल, आध्यात्मिक श्रेष्ठत्व मिळवाल. विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे होतील, सहजीवन लाभेल. एक-दोन दिवस प्रकृती नरमगरम राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. मनोबल वाढेल.
रवी शुक्र १० वा. नोकरदारांना बढतीचे योग येतील. सरकार पुरस्कार मिळतील, धंद्यात दुर्लक्ष झाल्यास नुकसान होईल. प्रॉपर्टीची कामे होतील, कुटुंबात शांतता पाळा, विवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल; पण वाद टाळा. सहजीवन लाभेल. प्रवास घडेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल, वरिष्ठांची मर्जी सांभाळा
रवी शुक्र ९ वा. कामासाठी प्रवास घडेल, सामाजिक कार्यात सहभाग राहील. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. सामाजिक कार्यातून लाभ होईल. भावनावेग आवरा. प्रयत्न कमी पडतील. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीचा सहवास लाभेल. कामात यश मिळेल, पण श्रेय कमी मिळेल. सहजीवन लाभेल. प्रवास घडेल. सप्ताहाच्या शेवटी थकवा जाणवेल,
रवी शुक्र ८ बा. धंद्यात मंदीचे वातावरण लाभेल. शारीरिक दगदग होईल. अचानक धनलाभ संभवती, भाग्यकारक पति अनुभव येईल. कामासाठी प्रवास घडेल. कर्तव्यतत्पर राहाल. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीला प्राधान्य बाल, संततीसुख लाभेल, प्रिय व्यक्ती भेटेल. मनोबल वाढेल, कामात यश येईल. श्रेय कमी मिळेल. सहजीवन लाभेल,