Weekly Horoscope
हा सप्ताह मेष, वृषभ, कन्या, धनु राशिगटाला उत्तम, तर कर्क, वृश्चिक, मीन राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश : दि. १-शुक्र मीनेत २४/५७. वक्री ग्रह बुध, गुरू. अस्तंगत ग्रह मंगळ, बुध. महत्त्वाचे ग्रहयोग : दि. ४- शुक्र लाभ हर्षल, दि. ५-रवी त्रिकोण गुरू, दि. ७-रवी युती बुध, शुक्र युती नेपच्युन.
र.म.बु.रा. ११ वे. अनेक मार्गांनी लाभ होत राहतील. अपेक्षेप्रमाणे प्रॉपर्टीची कामे होतील. अनाकलनीय खर्च साथ होतील. कायदेशीर बाबी सांभाळा. प्रलोभने टाळा. सप्ताहाची सुरुवात लाभकारक राहील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे, त्रासाचे जातील. रेंगाळलेली कामे पुढील दोन दिवसांत पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कुटुंबाकडे लक्ष द्याल.
र.म.बु.रा. १० वे. धंद्यात मोठ्या उलाढाली होतील. नोकरीत बढतीची अपेक्षा राहील. अपेक्षेप्रमाणे लाभ होत राहतील. विवाह जुळेल. कामात यश मिळेल. प्रलोभने टाळा. प्रवास घडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला भावंडाचे सुख, कामात यश मिळेल. एक-दोन दिवस घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. संतती, शिक्षण, कलांकडे लक्ष द्याल. सप्ताहाच्या शेवटी मोबदला कमी मिळेल. वाद टाळा.
र.म.बु.रा. ९ वे. परदेशगमन, तीर्थयात्रा, कामासाठी प्रवास घडेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. प्रशिक्षणासाठी मिशन परदेशगमनाची संधी लाभेल. कामाकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबसौख्य लाभेल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ. मुळे कामे होतील व नावलौकिक वाढेल. कुटुंबातील मतभेद जाणवतील. संततीसौख्य लाभेल.
र.म.बु.रा. ८ वे. धंद्यात स्पर्धा, संघर्ष जाणवेल. कायदेशीर बाबीकडे लक्ष द्या. खर्च बेसुमार होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. परदेशगमन घडेल. नवीन वस्त्रांचा लाभहोईल. शारीरिक त्रास जाणवेल. सप्ताहाची सुरुवात उत्साहवर्धक होईल. कुटुंबातील कटुता जाणवेल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ. मुळे कामात यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.
र.म.बु.रा.७वे. भावनिक दडपण वाढते राहील. कामासाठी प्रवास घडेल. विवाह जुळेल. शिक्षणातील अडथळे दूर करा. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. मित्रामध्ये प्रिय राहाल. सप्ताहाच्या सुरुवातीला आवश्यक खर्च वाढेल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कौटुंबिक व सरकारी कामासाठी खर्च होईल. सप्ताहाच्या शेवटी धावपळ होईल; पण कामे होतील.
र.म.बु.रा. ६ वे. संधी चालून येईल. यश मिळत राहील. आग्रही राहाल. भावनिक दडपण राहील. गैरसमज होतील. नावलौकिक वाढेल. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. कामात जोडीदाराची मदत होईल. सप्ताहाची सुरुवात आर्थिक लाभाने होईल. एक- दोन दिवस खर्चाचे, चिडचिडीचे जातील. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कुटुंबासाठी खर्च कराल. आर्थिक प्राप्ती होईल.
र.म.बु.रा. ५ वे. मनाची कुचंबणा होत राहील. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. गुरुकृपा राहील. विपरीत घटनांतून लाभ होईल. विवाह जुळेल. नावलौकिक वाढेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक मोबदला मिळेल. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी पूर्ण कराल.
र.म.बु.रा. ४ थे. घरगृहस्थीत मतभेद राहतील. काळजीने मधूनमधून मन व्यथित होईल. प्रॉपर्टीची कामे होतील. भावनिक दडपण राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. पोटाची तक्रार जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यकारक अनुभव येईल. कर्माला भाग्याची जोड लाभेल. आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी खर्च होईल. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल.
र.म.बु.रा. ३ रे. कामे होत राहतील. आर्थिक प्राप्ती. आरोग्य चांगले राहील. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. स्वतःला सिद्ध कराल. वाहनसौख्य लाभेल. छोटे-मोठे प्रवास घडतील. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. विश्वासार्हता राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. जबाबदारीने काम करून समाधान मिळेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभ होईल.
र.म.बु.रा.२ रे. खर्च जास्त, आवक जेमतेम राहील. साकर कौटुंबिक समस्या जाणवतील. विपरीत घटनेतून लाभसंभवतो. विसरभोळेपणामुळे नुकसान संभवते. घशाचे, डोळ्यांचे, कानाचे विकार जाणवतील. सप्ताहाच्या सुरुवातीस सहकार्याने यश मिळेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.
र.म.बु.रा.१ ले. वक्तृत्वाने जग जिंकता येते; पण वाचाळता टाळा. इतरांना दुखवू नका. अपघात टाळा. सुरक्षिततेचे नियम पाळा. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. त्रास, अडचणी अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कष्टाच्या मानाने लाभ कमी होतील. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.
र.म.बु.रा. १२ वे. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कायदेशीर बाबींचा सामना करावा लागेल. मोठे धंदे करण्याच्या मार्गी लागू नका. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीसुख लाभेल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. यश इतरांच्या सहकायनि लाभेल. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा, मानसिक त्रास जाणवेल.