Weekly Horoscope file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Weekly Horoscope: मार्चचा शेवटचा आठवडा 'या' राशींसाठी ठरेल भाग्यवान; आर्थिक लाभ आणि विवाहाचे योग!

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य २२ ते २८ मार्च २०२६ जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Weekly Horoscope

हा सप्ताह वृषभ, मिथुन, तूळ, मकर राशिगटाला उत्तम, तर मेष, सिंह, धनु राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश: दि. २५ शुक्र मेषेत २९/५१, अस्तंगत ग्रह: मंगळ, शनी. महत्त्वाचे ग्रह : दि. २२-रवी युती नेपच्यून, दि. २५-रवी युती शनी, रवी लाभ प्लुटो, शनी लाभ प्लुटो.

मेष

मेष

रवी, शनी, नेपच्यून १२ वे. अनाकलनीय खर्च उद्भवतील. अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ होतील. विवाह जुळतील. विलंब, अडचणी त्रास होतील; पण व्यक्तिमत्त्व सुधारेल. बक्षिसे मिळवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साह वाढेल. कौटुंबिक गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास सभा संमेलनासाठी धावपळ होईल. गृहसौख्य लाभेल.

वृषभ

वृषभ

र.श.ने. ११ वे. मोठे आर्थिक लाभ होतील; पण प्रलोभने टाळा. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. कामात यश मिळेत जाईल. धंद्यात शत्रू निर्माण होतील. प्रयत्न वाढवा. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कौटुंबिक सौख्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल. भावंडे भेटतील.

मिथुन

मिथुन

र.श.ने.१० वे. बढतीची शक्यता निर्माण होईल. मित्राकडून फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या. भाग्यकारक स्थित घटनाही घडू शकेल; पण अतिआत्मविश्वासाने मार्ग चुकू शकाल. सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक घटना घडेल. एक-दोन दिवस अचानक खर्च वाढेल. कामे रेंगाळतील. एक-दोन दिवस उत्साहाने कामे पूर्ण कराल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क

कर्क

र.श.ने ९ वे. भाग्यात अडचणी येतील. कायदेशीर बाबी सांभाळा. अपघात टाळा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कार परदेशगमनाची संधी लाभेल. कामाकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. नेहमीच्या कामाचा वेळ वाया जाईल. सप्ताहाच्या उत्साहाने कामे पूर्ण कराल.

सिंह

सिंह

र.श.ने ८ वे. शारीरिक श्रम जाणवतील. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. गुरुकृपा राहील. भावनिक दडपण फार राहील. तुमच्या विचारांनी मित्र प्रभावित होतील. विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांचे दडपण राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. शेवटी अत्यावश्यक खर्च वाढेल. कामे रेंगाळतील.

कन्या

कन्या

र.श.ने.७ वे. भावनिक दडपण राहील. गैरसमज होतील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कामात जोडीदाराची मदत होईल. आग्रही राहाल. सुवर्णालंकारांचा लाभहोऊ शकेल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मित्रांच्या समवेत करमणुकीत वेळ जाईल.

तूळ

तूळ

र.श.ने ६ वे. आलेली संधी, लाभ हातून जाऊ शकेल. कामासाठी प्रवास परदेशमन घडेल. शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल. विवाह होऊ शकेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. व्यवसायाच्या सुरुवातीला सहकार्याचे वातावरण लाभेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. धार्मिक कृत्ये कराल. शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक

र.श.ने.५ वे. अडचणीत आल्यासारखे वाटेल. भावनिक दडपण येईल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. विसरभोळेपणामुळे नुकसान संभवते. पोटाची तक्रार जाणवेल. शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला वाद टाळा. यश मिळत जाईल. इतरांचे सहकार्य मिळवा. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी मनावर दडपण येईल.

धनु

धनु

र.श.ने. ४ थे. घरगृहस्थीत मतभेद, काळजी राहील. भावंडांशी वाद टाळा. त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना संधी लाभेल. प्रवास घडेल. नावलौकिक वाढेल. सप्ताहाच्या सुरुवातीला शैक्षणिक बाबतीत विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कामे होतील; पण मोबदला कमी मिळेल. इतरांच्या सहाय्याने यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल कमी राहील.

मकर

मकर

र.श.ने. ३ रे. नवीन कामे हाती घेण्याची क्षमता राहील. कामातही यश मिळेल; पण कुटुंबातील समस्या तीव्रपणे जाणवतील. चोर, विसरभोळेपणा यांच्यामुळे नुकसान संभवते. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहात घरगृहस्थी संततीकडे लक्ष द्याल. अपेक्षेपेक्षा कमी मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी सहकार्याने कामे होतील. प्रवास घडेल.

कुंभ

कुंभ

र.श.ने.२ रे. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. कौटुंबिक समस्या जाणवतील. त्रास, विलंब, अडचणी अनुभवाल; पण गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. आक्रमकता व वाचाळतेला आवर घाला. सुरक्षा बाळगा. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे होतील. गाठीभेटी घ्या. घरगृहस्थीचे सौख्य लाभेल. संततीसौख्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी कामे होतील; पण मोबदला कमी मिळेल.

मीन

मीन

र.श.ने. १ ले. मनाचा गोंधळ उडेल. क्रोध आवरा. भावनिक दडपण राहील. आर्थिक प्राप्ती वाढेल. घरगृहस्थीत पुढाकार घ्याल. परदेशगमनाची संधी लाभेल. विलंब, अडचणी त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ. धावपळीने कामे होतील. सप्ताहाच्या शेवटी गृहसौख्य लाभेल. निर्णायक कामात यश मिळेल; पण मनोबल कमी राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT