Weekly Horoscope file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Weekly Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचा आठवडा; कामात यश मिळेल, आर्थिक प्राप्ती होईल, पण भावनिक दडपण राहील!

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य १४ ते २० जून २०२६ जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Weekly Horoscope

हा सप्ताह मेष, सिंह, कन्या, मकर राशिगटाला उत्तम, तर कर्क, वृश्चिक, मीन राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश : दि. १५-रवी मिथुनेत १२/५३, दि. २०- मंगळ, वृषमेत २४/००. महत्त्वाचे ग्रहयोग : दि. १५- शुक्र लाभ हर्षल, दि. १७ शुक्र त्रिकोण नेपच्यून, शुक्र प्रतियुती प्लुटो. वक्री ग्रह- प्लुटो.

मेष

मेष

रवी बुध ३ रे. नवीन काम करण्याची क्षमता राहील. कला, क्रीडा साहित्य क्षेत्रात चमकाल. यश मिळत राहील. आर्थिक प्राप्ती होईल. निर्णायक कामात यश येईल; पण विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. सप्ताहाची सुरुवात आर्थिक लाभाने होईल. एक-दोन दिवस अनाकलनीय खर्च होईल. कामे यशस्वी होतील. घरगृहस्थीचे सौख्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी उत्साहाने कामे उरकाल.

वृषभ

वृषभ

रवी बुध २ रे. शिक्षणामुळे चांगल्या आधिकाराची कायम स्वरूपाची नोकरी मिळेल. भावनिक दडपण राहील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. धंद्यात शत्रू निर्माण होतील. प्रलोभने टाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला गोडधोड जेवणाचा लाभ होल. कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी घ्या. प्रवास करा. कामे होतील. शेवटी थकवा जाणवेल. घरगृहस्थीला वेळ द्याल.

मिथुन

मिथुन

रवी बुध १ ले. धाडसी कामाचे कौतुक होईल. प्रॉपर्टीची कामे होतील. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. शेतीच्या कामातून लाभ होईल. विवाह इच्छुकांना सुंदर जोडीदार मिळेल. भावनिक दडपण राहील. सप्ताहाची सुरुवात खर्चिक राहील. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा भागवाल. शेवटी कामात यश, पैसा मिळेल.

कर्क

कर्क

रवी बुध १२ वे. चांगल्या अधिकाराची नोकरी मिळेल. भाग्य बलवान राहील. खर्च वाढेल. धंद्यात अस्थिरता जाणवेल. कामासाठी प्रवास घडेल. कायदेशीर बाबीमुळे अडचणीत याल. सप्ताहाच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे आर्थिक प्राप्ती होईल. एक-दोन दिवस खर्चाचे जातील. कामे रेंगाळली, तरी एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा भागवाल.

सिंह

सिंह

रवी बुध ११ वे. मोठे आर्थिक लाभ संभवतात. भाग्यकारक अनुभव येतील. विपरीत घटनेतून लाभ संभवतात. भावनिक दडपण राहील. शिक्षणासाठी परदेशगमनाची संधी लाभेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मित्रामुळे अडचणीत येऊ शकाल. आर्थिक प्राप्ती होईल. एक-दोन दिवस खर्चाचे जातील. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी पूर्ण कराल.

कन्या

कन्या

रवी बुध १० वे. कामात यश मिळत राहील. नोकरीत बढतीचे योग येतील. गुरुकृपा राहील. आग्रही राहाल. मोठे आर्थिक लाभ संभवतात. विवाह जुळेल. श्रीमंत स्थळ मिळेल. भावनिक दडपण राहील. आग्रही राहाल. सप्ताहाच्या सुरुवातीला मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल.

तूळ

तूळ

रवी बुध ९ वे. आर्थिक प्राप्ती वाढेल. भाग्यकारक अनुभव येईल. भावनिक दडपण येईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. चांगल्या कामाची कीर्ती दूरवर पसरेल. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा दूर होईल. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. कामाचा मोबदला मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक

रवी बुध ८ वे. शारीरिक दगदग खूप होईल. बुद्धिकौशल्याने लाभ होतील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. भावनिक दडपण राहील. गुरुकृपा राहील; पण कामाकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे होतील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. सप्ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.

धनु

धनु

रवी बुध ७ वे. भावनिक दडपण राहील. प्रवास घडेल. आर्थिक प्राप्ती, अचानक धनलाभ संभवतो. स्वतःचे आरोग्य सांभाळा. कामात विलंब, अडचणी, त्रास संभवतो. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहात कामात यश मिळेल. श्रेय कमी मिळेल. इतरांचे सहकार्य घ्यावे लागेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी मनावर वरिष्ठांचे दडपण राहील.

मकर

मकर

रवी बुध ६ वे. कामात यश मिळत राहील. कमी श्रमात संधी चालत येईल. गुरुकृपा राहील. पुरस्कार मिळतील. भावनिक दडपण राहील. कौटुंबिक खर्च वाढेल. चिकाटी, कल्पनाशक्ती प्रगतीचा मार्ग दाखवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीसुख लाभेल. कामात यश मिळत राहील. वाद टाळा. इतरांचे सहकार्य मिळवाल. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

कुंभ

कुंभ

रवी बुध ४ थे. घरगृहस्थीची उगाच काळजी करत राहाल. पशुधन लाभेल. गुप्त शत्रू असतील. स्पर्धकांचा अंदाज घ्या. कामासाठी प्रवास करावा लागेल. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. आर्थिक प्राप्ती होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थी व संततीकडे लक्ष द्याल. नंतर कामात यश मिळत जाईल. कष्टाच्या मनाने मोबदला कमी मिळेल. भावनिक दडपण राहील.

मीन

मीन

रवी बुध ३ रे. कामात यश मिळत जाईल. नवीन काम करण्याची धमक राहील. कुटुंबात मनमानी कराल. धंद्यात आव्हानात्मक परिस्थिती राहील. गुरुकृपा राहील. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात चांगले यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी घ्या. प्रवास करा. कामे होतील. घरगृहस्थीकडे लक्ष द्याल. संतती सुख मिळेल. सप्ताहाच्या शेवटी कामे होतील. श्रेय कमी मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT