Weekly Horoscope file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Weekly Horoscope: फेब्रुवारीचा हा आठवडा 'या' ४ राशींसाठी ठरणार लाभदायक; पाहा तुमचे राशीभविष्य

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य 8 ते 14 फेब्रुवारी 2026, जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Weekly Horoscope

हा सप्ताह दि. 12 अखेर मेष, सिंह, वृश्चिक, मीन राशिगटाला उत्तम फलदायी राहील, तर मिथुन, तूळ, कुंभ राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश दि. 12-रवी कुंभेत 28/08. महत्त्वाचे ग्रहयोग-दि. 8-शुक्र केंद्र हर्षल, दि. 12-मंगळ षडाष्टक गुरू. वक्री ग्रह-गुरू, बुध. अस्तंगत ग्रह-मंगळ.

मेष : मोठी कामे हाती असतील

मेष

र., मं., प्लू. 10 वे. अधिकार वाढतील. मोठी कामे हाती असतील. आपल्या क्षेत्रात पुरस्कार मिळवाल. नावलौकिक वाढेल. कामे होतील. विवाह जुळेल; पण विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला यश मिळेल. इतरांचे सहकार्य लाभेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी वरिष्ठांची मर्जी सांभाळा. मनोबल वाढेल.

वृषभ : कामासाठी प्रवास

वृषभ

र., मं., प्लू. 9 वे. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. प्रवास कंटाळवाणे होतील. धार्मिक कृत्ये कराल. धंदा-व्यवसायात समाधान लाभेल. कायमस्वरूपाची नोकरी मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. यश मिळत राहील. इतरांचे सहकार्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनोबल कमी राहील.

मिथुन : गोड बोलून कामे करून घ्या.

मिथुन

र., मं., प्लू. 8 वे. धंद्या-व्यवसायात मंदी जाणवेल. भावनिक दडपण राहील. प्रशिक्षणासाठी परदेशगमनाची संधी लाभेल. विवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीचा सहवास लाभेल. गोड बोलून कामे करून घ्या. सप्ताहाच्या शेवटी इतरांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

कर्क : खर्च वाढेल

कर्क

र., मं., प्लू. 7 वे. भावनिक दडपण राहील. कौटुंबिक समस्या जाणवतील. खर्च वाढेल. परदेशगमनाची संधी लाभेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कायदेशीर बाबी सांभाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीत पुढाकार घ्याल. संततीवर प्रेम राहील. आत्मविश्वास राहील. सप्ताहाच्या शेवटी अपेक्षेपेक्षा मोबदला कमी मिळेल. विसरभोळेपणा जाणवेल.

सिंह : भाग्यकारक संधी

सिंह

र., मं., प्लू. 6 वे. कमी श्रमात भाग्यकारक संधी दार ठोठावेल. सुवर्णालंकारांची प्राप्ती होईल. विवाह जुळेल. भावनिक दडपण राहील. मित्रांवर तुमचा प्रभाव राहील. धंदा-व्यवसायात विलंब, त्रास, अडचणी अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास, सभा संमेलने इ.मुळे धावपळ होईल. यशही मिळेल. घरगृहस्थी, संतती, शिक्षणाबद्दल समाधान राहील.

कन्या : संततीची उधळपट्टी चालू राहील

कन्या

र., मं., प्लू. 5 वे. संततीच्या उधळपट्टीकडे लक्ष द्या; पण कोणालाही दुखवू नका. थोडी कुचंबणा होईल. विपरीत घटनेतून फायदा संभवतो. भावनिक दडपण राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास?इ. धावपळीचे; पण यशाचे जातील. भावंडे भेटतील. सप्ताहाच्या शेवटी घरगृहस्थीचे सौख्य लाभेल.

तूळ : विपरीत घटनेतून लाभ

तूळ

र., मं., प्लू. 4 थे. गृहसौख्याच्या काळजीने मन अधूनमधून उद्विग्न होईल; पण मनमानी कराल. गुरुकृपा राहील. विपरीत घटनेतून लाभ होईल. शत्रूवर मात कराल. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साहाने कामे उरकाल. गोडधोड जेवणाचा बेत कराल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. सप्ताहाच्या गाठीभेटी, प्रवास इ.मुळे यश मिळेल. भावंडांशी संपर्क होईल.

वृश्चिक : स्वत:ला सिद्ध कराल

वृश्चिक

र., मं., प्लू. 3 रे. नवीन कामे हाती घेण्याची क्षमता राहील. स्वत:ला सिद्ध कराल. प्रॉपर्टीची कामे होतील. भावनिक दडपण राहील. शारीरिक तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचा कंटाळा कराल. वेळ, पैसा वाया जाईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. गोडधोड जेवणाचा लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

धनु : विवाह जुळू शकेल

धनु

आर्थिक प्राप्ती जेमतेम

र., मं., प्लू. 2 रे. कौटुंबिक खर्च वाढेल. गुरुकृपा राहील. विवाह जुळू शकेल. शेतीवाडीची कामे होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाच्या घटना घडतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी पूर्ण कराल. उत्साह वाढेल.

मकर: तडफदारपणा राहील

मकर

र., मं., प्लू. 1 ले. तडफदारपणा राहील; पण थोडी मनमानी कराल. कुटुंबात कौतुक होईल. कौटुंबिक खर्च वाढेल. शारीरिक व्याधीकडे लक्ष द्या. विसरभोळेपणा जाणवेल. कल्पनाशक्ती चांगली राहील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी कामाचा कंटाळा कराल.

कुंभ : धंदा-व्यवसायात स्पर्धा वाढेल

कुंभ

र., मं., प्लू. 12 वे. विद्याव्यासंग वाढेल. भाग्यकारक घटना घडतील. मात्र, धंदा-व्यवसायात स्पर्धा वाढेल. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल; पण गुरुकृपा राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक घटना घडतील. तुमचा फायदा मातुल घराण्याला होईल.

मीन : गुप्त शत्रू असतील

मीन

र., मं., प्लू. 11 वे. आर्थिक लाभ होतील; पण त्याचा फायदा मातुल घराण्यातील व्यक्तींना होईल. गुप्त शत्रू असतील. प्रॉपर्टीची कामे होतील. परदेशगमनाची संधी लाभेल. कामात विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. निर्णायक कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT