Weekly Horoscope file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Weekly Horoscope: जमा-खर्चाचा ताळमेळ बिघडणार; आठवड्याच्या शेवटी आर्थिक मोबदला मिळणार! पाहा तुमचे साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी, 2026, जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Weekly Horoscope

हा सप्ताह मेष, वृषभ, कन्या, धनु राशिगटाला उत्तम, तर कर्क, वृश्चिक, मीन राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश : दि. २३-मंगळ कुंभेत ११/४९. महत्त्वाचे ग्रहयोग : दि. २२-शुक्र त्रिकोण गुरू, दि. २७-मंगळ केंद्र हर्षल, दि. २८-बुध युती शुक्र. वक्री ग्रह- गुरु, दि. २६-बुध वक्री, अस्तंगत ग्रह : मंगळ.

मेष : अनाकलनीय खर्च उद्भवतील

मेष

र.म.बु.शु.रा. ११ वे. अनाकलनीय खर्च उद्भवतील. अर्थप्राप्तीबरोबर धंद्याची आर्थिक घडी बिघडण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साही राहाल. सुग्रास जेवणाचा लाभ होईल. गृहसौख्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवास इ. मुळे यश मिळेल.

वृषभ : शत्रू वाढतील

वृषभ

र.म.बु.शु.रा. १० वे. धंद्यात मोठ्या उलाढाली होतील. शत्रू वाढतील. गुरुकृपा राहील. विवाह जुळतील. प्रवास घडतील. धार्मिक व मंगल कार्ये होतील. मुत्सद्दीपणाने कामे होतील. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण करू शकाल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन : विवाह जुळल्यास श्रीमंत स्थळ मिळेल

मिथुन

र.म.बु.शु.रा. ९ वे. भाग्य बलवान राहील. कामासाठी प्रवास घडेल. परदेशगमन घडेल. नोकरीत जबाबदारीची मिशन व गुंतागुंतीची कामे करावी लागतील. विवाह जुळल्यास श्रीमंत स्थळ मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाच्या घडना घडतील. एक-दोन दिवस अचानक खर्चाचे, कंटाळवाणे जातील. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.

कर्क : भावनिक दडपण येईल

कर्क

र.म.बु.शु.रा. ८ वे. जमा खर्चाचा मेळ बसणार नाही. कायदेशीर बाबींशी संबंध येईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. भावनिक दडपण येईल. परदेशगमनाची संधी लाभेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक लाभ होतील. करमणुकीत वेळ घालवाल. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. सप्ताहाच्या शेवटी महत्त्वाकांक्षी बनाल.

सिंह : कौटुंबिक खर्च वाढेल

सिंह

र.म.बु.शु.रा. ७ वे. कामासाठी प्रवास घडेल. कौटुंबिक खर्च वाढेल. शारीरिक व्याधी त्रास देतील. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. शैक्षणिक बाबीतील अडथळे दूर करा. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांचे दडपण राहील. कामाचे समाधान मिळेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी वेळ, पैसा वाया जाईल.

कन्या : स्पर्धकांचा अंदाज घ्या

कन्या

र.म.बु.शु.रा. ६ वे. स्पर्धकांचा अंदाज घ्या. प्रतिकार शक्ती वाढेल. एखादी संधी प्राप्त होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कामात जोडीदाराची मदत होईल. नावलौकिक वाढेल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक मोबदला मिळेल.

तूळ : सप्ताहाच्या शेवटी नावलौकिक राहील

तूळ

र.म.बु.शु.रा ५ वे. मनाची कुचंबणा होत राहील; पण कला, क्रीडा, बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. महिलांना प्रसूती समयी त्रास संभवतो. गुरुकृपा राहील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला सहकायनि कामात यश मिळेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी नावलौकिक राहील. वरिष्ठांचे दडपण राहील.

वृश्चिक : शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल

वृश्चिक

र.बु.शु.रा. 4 थे. शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल. झोकून देऊन कामे कराल. सुवर्णालंकारांची प्राप्ती होईल. भावनिक दडपण राहील. खर्च वाढेल. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास इ.साठी धावपळ होईल. कामे होतील. प्रॉपर्टीच्या कामांना वेग येईल. सप्ताहाच्या शेवटी शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल.

धनु : सप्ताहाच्या सुरुवातीला दुर्लक्ष झाल्यास काम बिघडेल

धनु

र.म.बु.शु.रा. ३ रे. नवीन काम करण्याची धमक राहील. कामात यश मिळेल. कला, क्रीडा, साहित्यिक क्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. प्रवास कराल. पुरस्कार मिळवाल. पोटाची तक्रार राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला दुर्लक्ष झाल्यास काम बिघडेल. अपेक्षेप्रमाणे मोबदला मिळणार नाही. सर्वांचे सहकार्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल कमी राहील.

मकर: आर्थिक प्राप्ती चांगली

मकर

र.म.बु.शु.रा.२ रे. आर्थिक प्राप्ती चांगली; पण कष्ट साध्य राहील. कल्पनाशक्ती व शिस्तीने केलेल्या कामाला भाग्याची जोड लाभेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. शैक्षणिक बाबीत होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते. विसरभोळेपणामुळे नुकसान संभवते. इतरांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : कर्माला भाग्याची जोड लाभेल

कुंभ

र.म.बु.शु.रा.१ ले. कर्माला भाग्याची जोड लाभेल. गुरुकृपा राहील; पण भावनिक दडपण राहील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. बोलण्यातील चुका, आक्रमकता, राग यावर प्रसंगी नियंत्रण ठेवा. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास इ. मुळे यश मिळत राहील. घरगृहस्थीकडे लक्ष द्याल. संततीसुख मिळेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल कमी मिळेल.

मीन : घरगृहस्थीचे सौख्य लाभेल 

मीन

र.म.बु.शु.रा. १२ वे. अनेक प्रकारे खर्च होईल. प्रियजनांचे हट्ट पुरवा. पर्यटनास जा. शेतीवाडीत गुंतवणूक करा. धंदा, व्यवसायात अडचणी, त्रास, विलंब अनुभवाल; पण निर्णायक कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीस कौटुंबिक गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ. धावपळीने यश मिळेल. घरगृहस्थीचे सौख्य लाभेल. संततीसौख्य लाभेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT