Weekly Horoscope file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Weekly Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचा आठवडा, कामात यश मिळेल, पण फसवणुकीपासून सावध राहा!

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य ५ ते ११ एप्रिल २०२६ जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Weekly Horoscope

हा सप्ताह वृषभ, मिथुन, तूळ, मकर राशीला उत्तम, तर मेष, सिंह, धनु राशी कनिष्ठ फलदायी राहील. महत्त्वाचे ग्रहयोग : दि. ५-रवी केंद्र गुरू, दि. ८-मंगळ लाभ हर्षल. अस्तंगत ग्रह : दि. ९ पर्यंत शनी.

मेष

मेष

रवी ने.श.मं. १२ वे. अनेक मोठे खर्च निघतील. त्याचा अंदाज येणार नाही. भावनिक दडपण राहील. जवळच्या व्यक्तींचा विरह जाणवेल. चांगले मित्र जोडा. प्रलोभने टाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. सप्ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.

वृषभ

वृषभ

र.ने.श.मं. ११ वे. अनेक मार्गांनी अर्थप्राप्ती संभवते; पण प्रलोभने टाळा. मित्रांच्या सोबत अनावश्यक खर्च कराल. विवाह जुळेल. प्रॉपर्टीची कामे होतील. कामात हितशत्रूचा त्रास संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला सहकार्याचे वातावरण राहील. यश मिळेल. एक-दोन दिवस प्रकृती नरमगरम राहील. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील.

मिथुन

मिथुन

र.ने.श.मं.१० वे. कर्माला भाग्याची जोड लाभेल; पण अधिकार नीट चालणार नाहीत. धंद्यात अस्थिरता मिथुन जाणवेल. परदेशगमनाची संधी लाभेल. विवाह जुळेल. स्त्रीकडून फसवणूक संभवते. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. वाद टाळा. पुढे अपेक्षित सहकार्यही मिळेल. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

कर्क

कर्क

र.ने.श.म. ९ वे. प्रशिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. नातेवाईकांची सरबराई करावी लागेल. कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात वेळ जाईल. दुर्लक्ष झाल्यास धंद्यात नुकसान होऊ शकेल. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीचा सहवास लाभेल. कामात यश मिळत जाईल. वाद टाळा. सहकार्य लाभेल. प्रवास घडेल.

सिंह

सिंह

र.ने.श.म. ८ वे. शारीरिक व्याधी डोके वर काढतील. जोखमीच्या कामात सुरक्षा बाळगा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला गृहसौख्य, संततीसौख्य लाभेल. शेवटी कामात यश मिळेल; पण वाद टाळा. सप्ताहात गुरुकृपा लाभेल, तर शुक्र नवीन वस्त्रे देईल.

कन्या

कन्या

र.ने.श.मं.७ वे. भावनिक दडपण, अहमपणा राहील. कौटुंबिक खर्च वाढेल. सर्वसाधारणपणे कुटुंबातील सर्वांच्या प्रकृतीच्या तक्रारी राहतील. अचानक धनलाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी घ्या. प्रवास करा. यश मिळेल. घरगृहस्थीचे सौख्य लाभेल. संततीचे सुख लाभेल. गुणवत्ता वाढवा.

तूळ

तूळ

र.ने.श.मं. ६ वे. सर्वत्र आव्हानात्मक परिस्थिती राहील; पण गुरुकृपेने सर्वांवर मात करून यश मिळवत राहाल. प्रवास घडेल. गुप्त कारवायांचा त्रास संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी घ्या. प्रवास करा. कामात यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी कामात शिथिलता येईल; पण कौतुक होईल.

वृश्चिक

वृश्चिक

र.ने.श.मं. ५ वे. अनेक प्रकारे मनाची कोंडीत सापडल्यासारखी स्थिती होईल. भावनिक दडपण येईल. घरगृहस्थीत मतभेद आढळतील. शिक्षण, कला क्षेत्रात गोंधळाचे वातावरण राहील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाची सुरुवात भाग्यकारक मिष्टान्नाचा लाभ करून देणारी राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. शेवटी कामे होतील.

धनु

धनु

र.ने.श.मं. ४ थे. घरगृहस्थीचे मनावर दडपण राहील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. पोटाची तक्रार जाणवेल. प्रॉपर्टीची कामे होतील. गुरुकृपा गुरुकृपा राहील. कला क्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला खर्च वाढेल. कामे रेंगाळली, तरी पुढील एक-दोन दिवसांत ती उत्साहाने पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कामात दुर्लक्ष करू नका.

मकर

मकर

र.ने.श.म. ३रे. नवीन कामे करण्याची क्षमता राहील. यशही मिळेल. पैसा मिळेल. जिद्द, चिकाटी, कल्पनाशक्ती उपयोगाला येईल. वाहनसौख्य लाभेल. विसरभोळेपणा जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी पूर्ण कराल.

कुंभ

कुंभ

र.ने.श.म.२ रे. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील; पण खर्च अनाठायी होईल. मनमानी कराल. कामात सुरक्षा बाळगा. वाद टाळा. गुरुकृपा राहील; पण आक्रमकता, अविचार टाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल. एक-दोन दिवस मजेत घालवाल. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. वेळ वाया जाईल.

मीन

मीन

र.ने.श.मं. १ ले. कामात विलंब, अडचणी अनुभवाल. भावनिक दडपण राहील. मानसिक संतुलन राखा. क्रोध आवरा. परदेशगमनाची संधी लाभेल. निर्णायक कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांचे दडपण राहील. प्रशिक्षणासाठी निवड होईल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभाच्या घटना घडतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT