Weekly Horoscope file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Weekly Horoscope | मिथुन, कर्क राशीच्‍या जातकांना अपेक्षेप्रमाणे होणार लाभ ; तुमचा आठवडा कसा जाणार?

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य २६ एप्रिल ते २ मे २०२६ : जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Weekly Horoscope in Marathi

२६ एप्रिल ते २ मे २०२६ हा सप्ताह मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक, कुंभ राशिगटाला उत्तम, तर वृषभ, कन्या, मकर राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश दि. ३०-बुध मेषेत ६/५२. महत्त्वाचे ग्रहयोग : दि. २६-शुक्र लाभ नेपच्यून, दि. २८-शुक्र त्रिकोण प्लुटो.

मेष

मेष : विद्याव्यासंग वाढेल

रवी १ ला. विद्याव्यासंग बाडेल, पण भावनिक दडपण राहील. जवळच्या व्यक्तीचा विरह जाणवेल. अर्थप्राप्ती होईल. विवाह जुळेल. खर्च, विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे बिघडू देऊ नका, नंतर कामात यश मिळत राहील, कामाचा मोबदला कमी मिळेल. बाद टाळा. सहकायनि वातावरण लाभेल. सहजीवन लाभेल.

वृषभ

वृषभ : मोठे खर्च निघतील

रवी १२ वा. मोठे खर्च निघतील. आर्थिक प्राप्ती व्याध अनेक मागीनी होत राहील. आनंदी, उत्साही राहाल. वडिलार्जित इस्टेटीचा विषय अनुकूल होईल. धंद्यात शत्रू वाढतील. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीला प्राधान्य ग्राल, कामात शिथिलता येईल. कामाचा वेळ उगाच वाया घालवू नका, सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल. वाद टाळा.

मिथुन

मिथुन : बक्षीसपात्र बनाल

रवी ११ वा. स्पर्धेत यश मिळेल; पण नेहमीच्या कामात अस्थिरता, गोंधळ राहील. परदेशगमन, पर्यटन घडेल. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती होईल. शेतीच्या कामातून लाभ होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी प्या. प्रवास करा, कामात यश मिळेल. एक-दोन दिवस कामात शिथिलता येईल. सप्ताहाच्या शेवटी गुरुकृपेने कामे होतील.

कर्क

कर्क : अधिकार गाजवाल

रवी १० वा. अधिकार गाजबाल. कामात यश मिळत राहील, अर्थप्राप्ती चांगली राहील. कायदेशीर बाबी सांभाळा, परदेशगमनाची संधी लाभेल, शारीरिक व्याधी जागवेल. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबाच्या गरजा, समस्थांकडे लक्ष घाल. खर्च होईल. एक-दोन दिवस कामात यश मिळवून देणारे आहेत. शेवटी थकवा जाणवेल.

सिंह

सिंह : कामासाठी दूर जावे लागेल

रवी ९ वा. कामासाठी दूर जावे लागेल, भाग्यकारक अनुभव येईल. दुर्लक्ष झाल्यास कामे बिपडू शकतील; पण गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. विलंब, त्रास अनुभवाल, सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साहाने कामे पूर्ण कराल. मिष्टान्नाचा लाभ होईल. कौटुंबिक गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी घ्या. प्रवास करा. कामात यश मिळवाल.

कन्या

कन्या : प्रकृतीची काळजी घ्या

रवी ८ वा. कुपथ्य करणे, गार वाप्यात फिरणे आजाराला निमंत्रण देणारे ठरेल. कुटुंबातील इतरांचेही आरोग्य सांभाळा. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. भावनिक दडपण राहील. गुणवत्ता वाहता, हट्टीपणा वाढेल. सप्ताहाची सुरुवात खर्थिक कंटाळवाणी होईल. चिडचिड होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल.

तूळ

तूळ : अहंकारी बनाल

रवी ७ वा. अहंकारी बनाल, पण परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता राहील. गुरुकृपा राहील, विवाह जुळेल. अचानक धनलाभ संभवतो. महिलांना प्रसूतीसमयी आस संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाच्या घटना घडतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील, सप्ताहाच्या शेवटी रेंगाळलेली कामे पूर्ण कराल, मिष्टान्न लाभेल.

वृश्चिक

वृश्चिक : कामात यश मिळेल

रवी ६ वा. कामात यश मिळत राहील, कमी श्रमात कामे होतील. भावनिक दहपण राहील. खर्चाचे प्रमाण हिडदा बावेल. शैक्षणिक बाबीत गोंधळाचे वातावरण राहील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. कामे रेंगाळतील.

धनु

धनु :मनाचा कोंडमारा

धनु रवी ५ वा. थोडासा मनाचा कोंडमारा झाला, तरी संतती, शिक्षणास भाग्याची जोड लाभेल, स्पर्धकांचा अंदाज घ्या. गुरुकृपा राहील. शेतीवाडी, बागायतीची कामे होतील, विवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. पुढील ४-५ दिवस कामात यश मिळवून देणारे व आर्थिक मोबदला मिळवून देणारे राहतील.

मकर : मानसिक उद्विग्नता

रवी ४ था. मरगृहस्थीच्या काळजीने मन मधूनमधून उद्विम दान होईल, कलाकारांचे काम चांगले होईल. अनावश्यक खर्च होत रााहील. चोराचिलटापासून सावध राहा, प्रयत्नवादी राहाल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे शारीरिक व्याधी जाणवेल. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील, कामासाठी प्रवास पडेल. सप्ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.

कुंभ

कुंभ : स्वतःला सिद्ध कराल

रवी ३ रा. आव्हानात्मक परिस्थितीतही नवीन करण्याची क्षमता राहील. स्वतःला सिद्ध कराल. गुरुकृया राहील. विवाह जुळेल, विलंब, अडचणी येतील. सुरक्षा बाळगा. कौटुंबिक स्थिती संवेदनशील राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला यश इतरांवर अवलंबून राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

मीन

मीन : आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील

रवी २ रा. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. परदेशगमनाची संधी मिळेल, मानसिक संतुलन राखा. भावनिक दडपण येईल. सुरक्षितता पाळा. निर्णायक कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला ४-५ दिवसांत कामात यश मिळेल. श्रेय कमी मिळेल. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT