पुढारी ऑनलाईन डेस्क : हा सप्ताह दि. 12 पर्यंत मेष, सिंह, वृश्चिक, मीन राशिगटाला उत्तम, तर मिथुन, तूळ, कुंभ राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. दि. 12 नंतर सप्ताह मेष, वृषभ, कन्या, धनू राशिगटाला उत्तम, तर कर्क, वृश्चिक, मीन राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश-दि. 11-बुध कुंभेत 12/57, दि. 12-रवी कुंभेत 12/55, महत्त्वाचे ग्रहयोग-दि. 9-रवी युती बुध, मंगळ त्रिकोण शनी, दि. 10-बुध केंद्र हर्षल, दि. 11-रवी केंद्र हर्षल. दि 12-रवी प्रतियुती चंद्र, वक्री ग्रह-मंगळ, अस्तंगत ग्रह-बुध.
रवी, बुध, प्लूटो दि. 12 पर्यंत 10 वे. नंतर शनी, रवी, बुध 11 वे. कायमस्वरूपाची अधिकाराची नोकरी मिळू शकेल. कामाची व्याप्ती वाढेल. उत्तरार्धात बक्षिसे मिळवाल. बढती मिळेल. विवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी प्रवास इ.मुळे कामात यश मिळेल. थकवा जाणवेल. गृहसौख्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढेल. यश मिळेल.
रवी, बुध, प्लूटो दि. 12 पर्यंत 9 वे. नंतर शनी, रवी, बुध 10 वे. प्रशिक्षणासाठी निवड होईल. उत्तरार्धात कामे यशस्वी होतील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. खूप जबाबदारीची कामे करावी लागतील. अपेक्षेप्रमाणे आर्थिक प्राप्ती होईल. प्रगतीत अडथळे येतील. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी प्रवास इ.मुळे कामात यश मिळेल.
रवी, बुध, प्लूटो दि. 12 पर्यंत 8 वे. नंतर शनी, रवी, बुध 9 वे. खर्चाचे प्रमाण वाढेल. धंद्यात मंदी जाणवेल. शारीरिक दगदग होईल. दि. 12 नंतर सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. कायदेशीर बाबीशी संबंध येईल. भाग्यकारक अनुभव येतील. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साहाने कामे यशस्वी कराल. कौटुंबिक गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी थकवा जाणवेल.
रवी, बुध, प्लूटो दि. 12 पर्यंत 7 वे. नंतर शनी, रवी, बुध 8 वे. पूर्वार्धात कामे यशस्वी होतील. प्रवास घडेल; पण खूप भावनिक दडपण येईल. उत्तरार्धात धंद्यात मंदी जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. परदेशगमनाची संधी लाभेल. गुरुकृपा राहील. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कामे यशस्वी होतील.
रवी, बुध, प्लूटो दि. 12 पर्यंत 6 वे. नंतर शनी, रवी, बुध 7 वे. कामात यश मिळेल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. उत्तरार्धात मनावर भावनिक दडपण येईल. कामासाठी प्रवास घडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाच्या घटना घडतील. एक-दोन दिवस खर्च होईल; पण योग्य कारणासाठी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल.
रवी, बुध, प्लूटो दि. 12 पर्यंत 5 वे. नंतर शनी, रवी, बुध 6 वे. आत्मविश्वास राहील; पण पूर्वार्धात मनाची कुचंबणा होईल. उत्तरार्धात कामात यश मिळेल. मोबदला कमी व श्रेय कमी मिळेल. प्रयत्न तोकडे पडतील. भावनिक दडपण खूप राहील. गुरुकृपा राहील. सुरुवातीला कामाचे समाधान मिळेल. आर्थिक मोबदला मिळेल. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील.
रवी, बुध, प्लूटो 4 थे. दि. 12 नंतर रवी, बुध, शनी 5 वे. सप्ताह सर्वसाधारण यशाचा राहील. घरगृहस्थीच्या काळजीने मन उद्विग्न होईल. मनाची कुचंबणा होईल. भावनिक दडपण राहील. शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास घडेल. सप्ताहाच्या सुरुवातील वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक मोबदला मिळेल.
वृश्चिक : रवी, बुध, प्लूटो 3 रे. दि. 12 नंतर शनी, रवी, बुध 4 थे. विकासकामे हाती घ्याल. त्यासाठी गाठीभेटी, प्रवास इ. धावपळ होईल. उत्तरार्धात घरगृहस्थीच्या काळजीने मन उद्विग्न होईल. महिलांना प्रसूतीसमयी त्रास होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनोबल सुधारेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. एक दोन दिवस कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.
रवी, बुध, प्लूटो 2 रे. दि. 12 नंतर शनी, रवी, बुध 3 रे. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. दि. 12 नंतर विकासासाठी नवीन योजना आखाल व अंमलात आणाल. भावंडांशी वाद टाळा. भावनिक दडपण राहील. आर्थिक हानी होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला इतरांच्या सहकार्याने यश मिळेल. वरिष्ठ विश्वासाने तुमच्यावर जादा कामे सोपवतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
रवी, बुध, प्लूटो 1 ले. दि. 12 नंतर शनी, रवी, बुध 2 रे. पित्ताचा त्रास होईल. एकदम राग येईल. विचार क्रांतिकारक राहतील. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. गुरुकृपा राहील. विवाह जुळू शकेल. आरोग्य चांगले राहील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला वाद टाळा. यश मिळेल. श्रेय कमी मिळेल. भावनिक दडपण राहील. सहकार्याचे वातावरण लाभेल.
कुंभ : रवी, बुध, प्लूटो 12 वे. दि. 12 नंतर शनी, रवी, बुध 1 ले. धंद्यात स्पर्धा जाणवेल. मोठे खर्च निघतील. दि. 12 नंतर पित्ताचा त्रास होईल. भावनिक दडपण येईल. विलंब, अडचणी त्रास अनुभवाल. निर्णायक कामात यश मिळेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीच्या समस्या सोडवाल. मनोबल वाढेल. यश मिळेल.
रवी, बुध, प्लूटो 11 वे. दि. 12 नंतर शनी, रवी, बुध 12 वे. बुद्धिकौशल्याने मोठे आर्थिक लाभ होतील. मोठ्या आर्थिक षड्यंत्राच्या मागे लागू नका. दि. 12 नंतर खर्चाचे प्रमाण वाढेल. कायदेशीर कटकटी निर्माण होतील. पोटाची तक्रार राहील. टोकाचे निर्णय घेऊ नका. जवळच्या व्यक्तींचा विरह जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीला प्राधान्य द्याल.