Weekly Horoscope
हा सप्ताह मिथुन, कन्या, मकर, कुंभ राशिगटाला उत्तम, तर मेष, सिंह, धनू राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश ः दि. 7 -मंगळ धनूत 20/16. महत्त्वाचे ग्रहयोग ः दि. 7-मंगळ षडाष्टक गुरू, शुक्र त्रिकोण शनी. दि. 9-मंगळ केंद्र शनी, दि. 10-शुक्र शनी हर्षल, दि. 11-बुध त्रिकोण नेपच्यून, दि. 13 मंगळ षडाष्टक हर्षल. बुध लाभ प्लुटो. वक्री ग्रह ः गुरू, हर्षल. दि. 10 पर्यंत नेपच्यून. अस्तंगत ग्रह ः शुक्र.
रवी बुध शुक्र 8 वे. धंद्यात मंदीचे वातावरण राहील. तुम्ही राबवत असलेल्या सुशासनामुळे विपरीत घटनेतूनही फायदा होऊ शकेल. विलंब, अडचण, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीस धावपळ होईल; पण यश लाभेल. गृहसौख्य लाभेल. संततीचा सहवास लाभेल. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल; पण गृहसौख्य कमी लाभेल.
रवी, बुध, शुक्र 7 वे. भावनिक दडपण राहील. अहम्पणा राहील. कामासाठी प्रवास घडेल. विवाह जुळेल. कायम स्वरूपाची नोकरी मिळू शकेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ.धावपळ होईल. थकवा जाणवेल. शेवटी संततीचा सहवास लाभेल.
रवी बुध शुक्र 6 वे. बुद्धिकौशल्याने कामात यश मिळेल. कौटुंबिक खर्च वाढेल. विवाह जुळेल. परदेशगमनाची संधी लाभेल. नोकरीत अधिक जबाबदारीची कामे करावी लागतील. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साहाने कामे पूर्ण कराल. कौटुंबिक सौख्य लाभेल. गाठीभेटी, प्रवास इ. धावपळीने कामात यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी कामात शिथिलता येईल.
रवी बुध शुक्र 5 वे. मनाची कुचंबणा होईल. अभ्यासापेक्षा कला, क्रीडा क्षेत्राची ओढ राहील. सरकारी संकटाचा अंदाज घ्या. शारीरिक व्याधी जाणवेल. परदेशगमनाची संधी लाभेल. प्रतिष्ठा सांभाळा. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण करू शकाल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवास यश मिळवून देईल.
रवी बुध शुक्र 4 थे. घरगृहस्थीचे मनावर दडपण राहील. पुढाकार घेऊन घरातील कामे कराल. पशुधन लाभेल. मानसन्मान लाभेल. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती होईल. कामात अडचणी, त्रास विलंब अनुभवाल. सप्ताहाची सुरुवात आर्थिक लाभाने होईल. एक-दोन दिवस आवश्यक खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा भागवाल.
रवी बुध शुक्र 3 रे. कामात यश मिळत जाईल. भावंडांसाठी सर्व काही मनापासून कराल. आर्थिक प्राप्ती होईल. कामातील गुणवत्ता वाढवणे गरजेचे राहील. जोडीदाराची मदत होईल. प्रॉपर्टीची कामे होतील. कुटुंबाचे आरोग्य सांभाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला काम झाल्याचे समाधान मिळेल. आर्थिक मोबदला मिळेल. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. शेवटी रेंगाळलेली कामे पूर्ण कराल.
रवी बुध शुक्र 2 रे. आर्थिक प्राप्ती जेमतेम चांगली होईल. कुटुंबात लाड होतील. स्वत:ला सिद्ध कराल. गुरुकृपा राहील. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला गुरुभेट होईल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मानसन्मान लाभेल. आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी प्रमाण वाढेल. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल.
रवी बुध शुक्र 1 ले. अचानक राग येईल. बोलून इतरांना दुखवू नका. त्याचा परिणाम धंद्यात नुकसान होण्यावर होईल. स्वत:साठी खर्च कराल. भावनिक दडपण राहील. मानसिक संतुनल राखा. सप्ताहाच्या सुरुवातीला शारीरिक व्याधी जाणवेल. भाग्यकारक अनुभव येईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. एक-दोन दिवस कामाचे समाधान मिळेल; पण तात्पुरते. आर्थिक मोबदला मिळेल.
रवी बुध शुक्र 12 वे. अनेक मार्गांनी खर्च होईल. चैन करताना प्रतिष्ठा सांभाळा. एखाद्या राजकीय संकटाला निमंत्रण देऊ नका. आर्थिक प्राप्ती होईल. प्रवास घडेल. गुरुकृपा राहील; पण चिडचिड होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला सहकार्याचे वातावरण लाभेल. प्रकृती नरमगरम राहील. विपरीत घटनेतून फायदा संभवतो. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. पुण्यकर्म करा. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल.
रवी बुध शुक्र 11 वे. अनेक मार्गांनी कमी श्रमात आर्थिक लाभ होतील. कर्माला भाग्याची साथ लाभेल. कामात वरचा दर्जा प्राप्त होईल. भावंडांशी वाद टाळा. आर्थिक नुकसान संभवते. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल; पण वाद टाळा. कामासाठी प्रवास घडेल. सहजीवन लाभेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे शारीरिक व्याधी जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी वरिष्ठांचे मनावर दडपण राहील.
रवी बुध शुक्र 10वे. कामाचे क्षेत्र वाढेल. नवीन कल्पना अमलात आणाल. वरिष्ठ बढतीसाठी तुमचा विचार करतील. बक्षीस मिळवाल, तरीही विलंब, अडचणी त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीसुख लाभेल. कामात यश मिळेल. कामासाठी प्रवास घडेल. सहजीवन लाभेल. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनोबल कमी राहील.
रवी बुध शुक्र 9 वे. सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. कामासाठी प्रवास घडेल. तुमच्या भाग्यात भावंडांचाही भाग राहील. कामात विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. निर्णायक कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला गृहसौख्य लाभेल. संततीसुख लाभेल. कामात यश मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल. यश इतरांवर अवलंबून राहील. सहजीवन लाभेल.