ज्योतिष

Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य, २७ मे ते २ जून २०२४

निलेश पोतदार

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : व्यावसायिक प्रगतीसाठी हा एक लाभदायक आठवडा ठरेल

श्रीगणेश म्‍हणतात की, मागील काही आठवड्यांमध्‍ये तुम्‍ही अनेक आव्‍हानांता तोंड दिल्‍याने तुम्‍ही धैर्यवान बनला आहोत. या आठवड्यात विचारांनी भारावून जाण्‍यापेक्षा भविष्यातील यशासाठी कोणत्‍याही गोष्टींबाबत विचार करुनच निर्णय घ्‍या. चिंता आणि तणावाचा सामना करावा लागेल. मात्र परिस्‍थिती शांततेने हाताळून तुम्‍ही यावर मात कराल. ध्‍यान करा, आरोग्याची काळजी घ्‍या. व्यावसायिक प्रगतीसाठी हा एक लाभदायक आठवडा ठरेल.

वृषभ : या आठवड्यात आर्थिक उत्‍पन्‍नही चांगले असेल

श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुमचा कामात चांगला वेळ जाईल. आर्थिक उत्‍पन्‍नही चांगले असेल. मात्र तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आत्मविश्वासाने आव्‍हानांना सामोरे जाल. बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. यामध्‍ये तुमचे बहुतांश वेळही जाईल. आठवड्याच्या शेवटी थकल्यासारखे वाटेल. तुम्‍ही एक अनुभवनसंपत्‍न व्‍यक्‍ती व्‍हाल.

मिथुन :  बढतीचेही योग आहेत. जोडीदारा बरोबरील वाद टाळा

हा आठवडा तुमच्‍यासाठी प्रगतीकारक आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध कराल. बढतीचेही योग आहेत. जोडीदारा बरोबरील वाद टाळा. त्‍यांच्‍या भावना काळजीपूर्वक हाताळा. तणावाचा आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घ्‍या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

कर्क : पालकांकडून खास सरप्राईज मिळेल

श्रीगणेश म्‍हणतात की, आरोग्यामध्‍ये होणारी सुधारणा आठवड्यातील वैशिष्ट्य राहिल. पालकांकडून खास सरप्राईज मिळेल. तुम्ही कामात व्यस्त राहाल. तुमचा संयम आश्चर्यकारक असेल. संयमाच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. तुमच्या कामातील समर्पणाचे कौतूक होईल.

सिंह : हा आठवडा तुमच्‍यासाठी स्‍मरणीय राहिल

या आठवडा तुमच्‍यासाठी स्‍मरणीय राहिल. कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामाच्या बाबतीत तुम्हाला ज्या गोष्टींचा तिरस्कार आहे ते करण्याची तुम्हाला आता गरज नाही. अनावश्‍यक गोष्‍टींसाठी होणारे परिश्रमाबाबतही विचार कराल. भविष्‍यासाठी ही सकारात्मक गोष्ट ठरेल.

कन्या : आरोग्‍यासाठी व्यायामाचे नियमित वेळापत्रक बनवा

श्रीगणेश म्हणतात की, या आठवड्यात नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. गरजूंना मदत करण्‍याचा विचार करा. आरोग्‍य चांगले राहिल. आरोग्‍यासाठी व्यायामाचे नियमित वेळापत्रक बनविण्‍याबाबत प्रयत्न करा. स्वतःच्‍या विश्रांतीसाठी वेळ जागा द्या.

तुळ : तुमच्या विशेष कौशल्याच्‍या जोरावर यश मिळवाल

श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात नवी स्‍वप्‍ने पाहाल. काळजीपूर्वक निर्णय घेतल्यानंतर तुमच्या वाट्याला येणारे कोणतेही काम तुम्ही परिश्रमपूर्वक कराल. तुम्हाला विशेष कौशल्याच्‍या जोरावर यश मिळवाल. सहनशीलता आणि संयम तुमच्‍यासाठी फायदेशीर ठरेल. इच्‍छापूर्तीसाठी विशेष मेहनत घ्‍यावी लागेल.

वृश्चिक : सकारात्मक विचारांच्‍या आधारे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

श्रीगणेश म्हणतात की, या आठवड्यात सकारात्मक विचारांच्‍या आधारे तुमच्या सर्व इच्छा पुष्कळ प्रयत्नाने पूर्ण होतील. कर्मचाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये यासाठी इतरांवर कमी अवलंबून राहणे हा योग्य मार्ग असल्याचे सिद्ध होईल. तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकणार नाही, परंतु तुम्हाला या आठवड्यात मिळणारी प्रसिद्धी आणि ओळख तुमच्यासाठी अधिक अर्थपूर्ण असेल.

धनु : या आठवड्यात तुमचा जोडीदार मिळाल्याने तुम्हाला धन्यता वाटेल

श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुमचा जोडीदार मिळाल्याने तुम्हाला धन्यता वाटेल. आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल. आरोग्यविषयी समस्या सोडविण्‍यासाठी हा आठवडा ठरेल. तुमच्या निर्णयांचा आणि मेहनतीचा अभिमान वाटेल. प्रियजनांकडूक कौतूक होईल.

मकर : तुमची मेहनत या आठवड्यात आर्थिक फळ देईल

या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीवर अनुकूल आहे. आरोग्‍यात सुधारणा होईल. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. तुमची मेहनत या आठवड्यात आर्थिक फळ देईल.  नवीन व्यवसाय उपक्रमासंदर्भात विचार करत असलात तर नवीन महत्त्वाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात शक्य तितके काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

कुंभ : कोणत्‍याही गोष्‍टीत तत्‍काळ प्रतिक्रिया देणे टाळा

आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देईल. तुमच्या कामाची सहकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. आत्‍मपरीक्षण केल्‍यास मतभेद टाळता येतील. तुमच्या जोडीदारासाठी हा एक महत्त्वाचा आठवडा असेल. व्यायामाचा फायदा होईल. कोणत्‍याही गोष्‍टीत तत्‍काळ प्रतिक्रिया देणे टाळा. परिस्थितीवर विचार करुन निर्णय घ्‍या, अशी सूचना श्रीगणेश करतात.

मीन : या आठवड्यात काेणत्‍याही कामातील शॉर्टकट टाळा

श्रीगणेश म्‍हणतात की, या आठवड्यात कोणतेही कामातील शॉर्टकट टाळा. कामात अडथळे येतील. धैर्याने आव्‍हानांना सामोरे जा. अन्‍यथा परिस्‍थिती अधिकच खराब होईल. तुमचे आरोग्य चांगले राहिल. आपण या आठवड्यात स्वत: वर लक्ष केंद्रीत कराल.

SCROLL FOR NEXT