Weekly Horoscope file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Weekly Horoscope: नोकरी, विवाह आणि भाग्य तिन्ही बाजूंनी साथ देणार; 'या' आठवड्यात तुमच्या आयुष्यात काय घडणार?

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य (18 ते 24 जानेवारी 2026), जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Weekly Horoscope

हा सप्ताह मेष, सिंह, वृश्चिक, मीन राशिगटाला उत्तम, तर मिथुन, तूळ, कुंभ राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. महत्त्वाचे ग्रहयोग ः दि. 18-बु.यु.मं., दि. 19-रवी लाभ नेप., बु.ला.श, बु.,त्रि.,ह., शु. यु. प्लुटो, दि. 20-मं. ला. श., मं. त्रि. ह., बु. ला. ने., श. ला. ह., दि. 21-रवी युती बुध, दि. 22-बु. यु. प्लु., दि. 23-र. यु. प्लु., मं. ला. ने. वक्रीग्रह ः गुरू, हर्षल. अस्तंगत ग्रह ः मंगळ, बुध, शुक्र.

मेष : पैसा, वेळ वाया जाईल

मेष

र.प्लू.शु.मं.बु. 10 वे. धंदा, व्यवसायात मोठ्या उलाढाली होतील. प्रयत्न कमी पडले, तर मोठे नुकसान संभवते. अधिकार नीट चालणार नाहीत. कामे यशस्वी होतील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला चांगल्या कामाचा लौकिक वाढेल. कामाचा आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी कामे बिघडतील. पैसा, वेळ वाया जाईल.

वृषभ : सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभ

वृषभ

र.प्लू.शु.मं. बु. 9 वे. प्रशिक्षणासाठी परदेशगमनाची संधी लाभेल. भाग्यकारक अनुभव येतील. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. धार्मिक कृत्ये कराल. विवाह जुळेल. कायमस्वरूपाची नोकरी मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामासाठी प्रवास कराल. मुत्सद्दीपणाने कामे करून यश मिळवाल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभाच्या घटना घडतील.

मिथुन : अतिआत्मविश्वास दुर्बुद्धी देईल

मिथुन

र.प्लू.शु.मं.बु 8 वे. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. सामाजिक कार्यातून लाभ संभवतो. कामात घोटाळे जाणवतील. शेतीच्या कामातून लाभ संभवतो. अतिआत्मविश्वास दुर्बुद्धी देईल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. खर्च वाढेल. वरिष्ठांचे दडपण राहील. सप्ताहाच्या शेवटी अधिकार चालवताना गैरसमज होतील.

कर्क : कामासाठी प्रवास घडेल

कर्क

र.प्लू.शु.मं.बु. 7 वे. भावनिक दडपण राहील. भागीदारीत व अन्यत्र तुमचे विचार पटण्यासारखे नसतील. कामासाठी प्रवास घडेल. परदेशगमनाची संधी लाभेल. कायदेशीर बाबी सांभाळा. प्रतिष्ठा सांभाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, शारीरिक व्याधी जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

सिंह : विवाह जुळेल

सिंह

र.प्लू.शु.मं.बु. 6 वे. स्पर्धकांचा अंदाज घ्या. अपेक्षेप्रमाणे मोबदला मिळाला नाही, तरी सर्व क्षेत्रांत यश मिळेल. गुरुकृपा राहील. संधी येत राहतील. भावनिक दडपण येईल. विवाह जुळेल. गुरुकृपा राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला विपरीत घटनेतून लाभ होईल. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे थकवा जाणवेल.

कन्या : वृद्धांची काळजी घ्या

कन्या

र.प्लू.शु.मं. बुध 5 वे. मनाची कुचंबणा होईल; पण कला साहित्य, शैक्षणिक, बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामातील गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करा. वृद्धांची काळजी घ्या. आग्रही राहाल. भावनिक दडपण येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला इतरांना दुखवू नका. कामे बिघडतील. नंतर मात्र कामात आग्रही राहाल. सप्ताहाच्या शेवटी इतरांचे सहकार्य घ्या.

तूळ : प्रॉपर्टीची कामे होतील

तूळ

र.प्लू.शु.मं.बु. 4 थे. घरगृहस्थीत काळीजीपोटी पुढाकार घ्याल. प्रॉपर्टीची कामे होतील. वाहनसौख्य लाभेल. विवाह जुळेल. शत्रूवर मात कराल. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. गुरुकृपा राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यास अडचणीत येऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी अडचणीतून यश मिळेल.

वृश्चिक : प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका

वृश्चिक

र.प्लू.शु.मं.बु. 3 रे. सर्व क्षेत्रांत यश मिळवाल; पण प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. भावनिक दडपण राहील. घरगृहस्थीत मतभेद जाणवतील. विपरीत घटनेतून लाभ होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास इ.मुळे यश मिळवाल. धनप्राप्ती होईल. एक-दोन दिवस घरगृहस्थीसाठी द्याल. काळजी घ्याल. सप्ताहाच्या शेवटी शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल.

धनु : कर्माला भाग्याची साथ

धनु

र.प्लू.शु.मं.बु. 2 रे. कुटुंबात लाड होतील. कर्माला भाग्याची साथ लाभेल. जामीन राहू नका. आर्थिक प्राप्ती चांगली; पण जेमतेम होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. धार्मिक कृत्ये कराल. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास?इ. मुळे कामात यश मिळेल. गुरुकृपेचा लाभ होईल. सप्ताहाच्या शेवटी घरगृहस्थीची कामे कराल.

मकर: कामाचे नियोजन व कल्पनाशक्ती चांगली

मकर

र.प्लू.शु.मं.बु. 1 ले. मानसिक संतुलन राखा. कर्माला भाग्याची जोड लाभेल. वाहनसौख्य लागेल. विपरीत घटनेतून लाभ होईल. कामाचे नियोजन व कल्पनाशक्ती चांगली राहील. शारीरिक व्याधी जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे होतील; पण बोलून दुखवू नका. कुटुंबाच्या गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवास इ. मुळे यश मिळेल. स्वत:ला सिद्ध कराल.

कुंभ : वायदे करू नका

कुंभ

र.प्लू.शु.मं.बु. 12 वे. आवश्यक, अनावश्यक सर्व खर्च वाढतील. धंद्यात स्पर्धा वाढेल. आक्रमकता टाळा. भावनिक दडपण राहील. वायदे करू नका. गुरुकृपा राहील. विपरीत घटना घडतील. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी, त्रासाची जाईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा, समस्यांकडे लक्ष द्या.

मीन : एक-दोन दिवस खर्चाचे

मीन

र.प्लू.शु.मं बु.11 वे. मित्रांच्या समवेत करमणुकीत वेळ घालवाल. भावनिक दडपण राहील. कामात विलंब, अडचणी त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक घटना घडतील. मित्र तुमच्यामुळे प्रभावित होतील. एक-दोन दिवस खर्चाचे कंटाळवाणे जातील. सप्ताहाच्या शेवटी रेंगाळलेली कामे उत्साहाने पूर्ण कराल. मित्रांची मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT