Weekly Horoscope
हा सप्ताह दि. 15 पासून कर्क, तुळ, कुंभ, मीन राशिगटाला उत्तम, तर वृषभ, कन्या, मकर राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश-दि. 15 रवी धनूत 28/14, दि. 20-शुक्र धनूत 7.45. महत्त्वाचे ग्रहयोग-दि. 14 मंगळ केंद्र नेपच्यून, दि. 15-रवी षडाष्टक गुरू, दि. 17 रवी केंद्र शनी, दि. 19 रवी षडाष्टक, हर्षल, शुक्र षडाष्टक गुरू, वक्री ग्रह-गुरू हर्षल. अस्तंगत ग्रह-शुक्र.
रवी मंगळ 9 वे. प्रशिक्षणासाठी निवड होईल. भाग्यकारक अनुभव येईल. परदेशगमनाची संधी लाभेल. अचानक आर्थिक प्राप्ती होईल. अनाकलनीय खर्च होतील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. गृहसौख्य कमी लाभेल. इतरांचे सहकार्य मिळेल. सहजीवन लाभेल. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
रवी मंगळ 8 वे. सर्व ठिकाणी सुरक्षितता बाळगा. धंद्यात मंदीचे वातावरण राहील. विश्वासार्हता टिकवून ठेवाल. धंद्यात शत्रू वाढतील. कुपथ्य केल्यास वृद्धांना त्रास संभवतो. गुरुकृपा राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीचा सहवास लाभेल. मनोबल वाढेल. कामात यश मिळत जाईल. भावनिक दडपण राहील. सप्ताहाच्या शेवटी थकवा जाणवेल.
रवी मंगळ 7 वे. स्वत:चा तडफदारपणा दाखवाल; पण वृत्ती घमेंडखोर बनेल. मनमानी कराल. ‘जसे कराल तसे भराल’ असा अनुभव येईल. विवाह जुळल्यास श्रीमंत स्थळ मिळेल. परदेशगमन घडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीला थकवा जाणवेल. संततीचा सहवास लाभेल. मनोबल वाढेल. कामात यश मिळेल. वाद टाळा. सहजीवन लाभेल
रवी मंगळ 6 वे. कामात यश मिळत राहील. राजकीय संकटांचा अंदाज घ्या. खाण्यावर नियंत्रण रहणार नाही. परदेशगमनाची संधी मिळेल. कायदेशीर बाबी सांभाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास इ.साठी खूप धावपळ होईल. एक-दोन दिवस थकवा जाणवेल. संततीचा सहवास लाभेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढेल. कामे होतील.
रवी मंगळ 5 वे. आत्मविश्वास वाढेल. शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल. विवाह जमेल. परदेशगमन घडेल. ‘जशास तसे’ वागण्याने मित्र दुखावले जातील. पशुधन लाभेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी, प्रवास इ.मुळे एक-दोन दिवस कामे यशस्वी होतील. एक-दोन दिवस थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी संततीचा सहवास लाभेल.
रवी मंगळ 4 थे. मनावर घरगृहस्थीचे दडपण राहील. वृत्ती घमेंडखोर बनेल. कुटुंबातील सर्वांच्या आरोग्य सांभाळा. वरिष्ठांची नाराजी राहील. भावनिक दडपण राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला गोडधोड जेवणाचा लाभ होईल. कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी, प्रवास इ. मुळे एक-दोन दिवस कामे होतील. सप्ताहाच्या शेवटी थकवा जाणवेल.
रवी मंगळ 3 रे. नवीन कामे करण्याची धमक राहील. सर्व प्रकारचे यश मिळेल. कुटुंबात लाड होतील. परदेशगमन घडेल. विवाह जुळेल. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. गुरुकृपा राहील. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवास यश मिळवून देईल
रवी मंगळ 2 रे. तडफदारपणा दाखवाल; पण मनमानी कराल. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. शारीरिक तक्रार जाणवेल. भावनिक दडपण राहील. बोलून इतरांना दुखवू नका. सप्ताहाची सुरुवात आर्थिक लाभाने होईल. खर्च वाढेल. कामात कंटाळा कराल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.
रवि मंगळ 1 ले भावना वेग आवरा. मानसिक संतुलन राखा. आर्थिक प्राप्ती होईल. पुरस्कार मिळतील. ‘जशास तसे’ वागण्याने थोडे नैराश्य येईल. पुरस्कार मिळवाल. सप्ताहाच्या सुरूवातीला अडधळे आले तरी कामाचे समाधान मिळवाल. आर्थिक प्राप्ती होईल. एक दोन दिवस खर्च वाढेल. चिडचिड होईल. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी हाती घ्याल.
रवी मंगळ 12 वे. खर्च मोठ्या प्रमाणावर वाढेल. विसरभोळेपणामुळे नुकसान होईल. धंद्यातील स्पर्धेचे मनावर दडपण येईल. नाक, कान, घशाचे विकार जाणवतील. कुटुंबात अशांतता अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचे समाधान मिळेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी कामे बिघडतील. चिडचिड होईल. खर्च वाढेल.
रवी मंगळ 11 वे. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. बक्षीस मिळवाल. गुरुकृपा राहील. शिक्षणात प्रगती होत राहील; पण विलंब, अडचणी त्रास अनुभवाल. टोकाचा विचार करू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामाचे समाधान लाभेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक प्राप्ती होईल.
रवी मंगळ 10 वे. कार्यक्षेत्र विस्तारेल. कामाचे समाधान मिळेल. कर्माला भाग्याची जोड लाभेल. निर्णायक कामात यश मिळेल. स्वत:साठी खर्च कराल. पत्नी भावंडे, वडिलांना कष्ट जाणवतील. सप्ताहाच्या सुरुवातीला यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.