प्रातिनिधिक छायाचित्र.  
ज्योतिष आणि धार्मिक

Shukra Gochar 2026 |यश, प्रेम, पैशांचे योग! जाणून घ्‍या, शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करताच सर्व १२ राशींवर पडणारा प्रभाव

शुक्राचे राशीपरिवर्तनाचा परिणाम जीवनशैलीसह आर्थिक स्थितीवर आणि नातेसंबंधांवर दिसून येतो

पुढारी वृत्तसेवा

शक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत आहे. कुंभ ही शनीची रास असल्याने या काळात सामाजिक वर्तुळ, जबाबदाऱ्या आणि विचार करण्याच्या पद्धतीत मोठे बदल अपेक्षित आहेत.

Shukra Gochar 2026 |

मुंबई: ज्योतिषशास्त्रात शुक्र हा ग्रह प्रेम, नातेसंबंध, ऐश्वर्य, आराम आणि संपत्तीचा कारक मानला जातो. जेव्हा शुक्राचे राशीपरिवर्तन होते, तेव्हा त्याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनशैलीवर, आर्थिक स्थितीवर आणि नातेसंबंधांवर दिसून येतो. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करत आहे. कुंभ ही शनीची रास असल्याने या काळात सामाजिक वर्तुळ, जबाबदाऱ्या आणि विचार करण्याच्या पद्धतीत मोठे बदल अपेक्षित आहेत. हा गोचरकाळ अनेकांसाठी प्रगतीच्या नव्या संधी घेऊन येईल, तर काहींना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान असेल. पाहूया सर्व १२ राशींवर होणारा याचा परिणामाविषयी....

मेष

मेष राशीच्या जातकांचे सामाजिक क्षेत्र विस्तारेल. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. कार्यक्षेत्रात मताला महत्त्व मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि बचतीची सवय लागेल. नातेसंबंधांतील मतभेद संवादाने सुटतील.

वृषभ

वृषभ राशीच्या जातकांच्या करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठ तुमच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा करतील. चैनीच्या वस्तूंवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात स्पर्धा राहील, त्यामुळे नियोजनावर भर द्या. नात्यात अहंकार येऊ देऊ नका.

मिथुन

मिथुन राशीच्या जातकांना कामाचा ताण आणि डेडलाईन्समुळे धावपळ होईल. प्रवासाचे योग आहेत. विनाकारण होणाऱ्या खर्चाला लगाम घालणे आवश्यक आहे, अन्यथा बजेट कोलमडू शकते. जोडीदाराशी संवाद स्पष्ट ठेवा.

कर्क

कर्क राशीच्या जातकांसाठी ऑफिसमधील वातावरण सकारात्मक राहील. जुन्या गुंतवणुकीतून किंवा अडकलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह

सिंह राशीच्या जातकांच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत नवे प्रोजेक्ट्स किंवा मोठे क्लायंट्स मिळतील. उत्पन्नात वाढ होईल, मात्र त्यासोबतच खर्चही वाढण्याची शक्यता आहे. संतुलन राखणे गरजेचे आहे.

कन्या

कन्या राशीच्या जातकांना कामात त्वरित यश न मिळाल्याने थोडी निराशा होऊ शकते. प्रवास किंवा आरोग्यावर खर्च वाढेल. व्यवसायात मोठी जोखीम पत्करणे टाळा. नातेसंबंधात संयम ठेवा, चिडचिड टाळा.

तूळ

तुळ राशीच्या जातकांचा सर्जनशील कामात रस वाढेल. नोकरीत तुमच्या निर्णयक्षमतेची कसोटी लागेल. शेअर मार्केट किंवा ट्रेडिंगमध्ये फायदा होऊ शकतो; पण घाईत निर्णय घेऊ नका. नात्यात मोकळेपणाने संवाद साधा.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या जातकांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. घराचे नूतनीकरण किंवा स्थलांतराचे योग आहेत. आर्थिक चढ-उतार राहतील, त्यामुळे मोठे खर्च तूर्तास टाळावेत. कामाच्या ठिकाणी स्पर्धेचा सामना करावा लागेल.

धनु राशीच्या जातकांना नवीन नोकरी किंवा कराराच्या संदर्भात चर्चा सकारात्मक होईल. व्यवसायात नफा मिळवण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखणे फायदेशीर ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. चुकीचे समज करून घेऊ नका.

मकर राशीचे जातक करिअरमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण करतील. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. आर्थिक बाजू भक्कम होईल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

कुंभ

कुंभ राशीतच शुक्राचे आगमन होत असल्याने जातकांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडतील. घर किंवा शिक्षणावर खर्च होईल. व्यवसायात नेटवर्किंगचा फायदा मिळेल. जुने वाद मिटून नातेसंबंध दृढ होतील.

मीन

मीन राशीच्या जातकांना आर्थिक आघाडीवर सावध राहावे लागेल. खर्चाचा बोजा वाढल्याने बचतीवर परिणाम होऊ शकतो. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. संवादातील स्पष्टता नात्यातील दुरावा कमी करेल.

टीप : वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT