vastu shastra kitchen meal plate and eating rules for home problems
पुढारी ऑनलाईन :
वास्तुशास्त्रात मानवी कल्याणासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात काही बिघाड झाला तर त्याचा परिणाम त्या घरात राहणाऱ्या माणसांवर होतो अशी लोकांची धारणा आहे. भारतीयांमध्ये वास्तुशास्त्राचे महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे आपल्या वास्तूतही अशा काही चुका होत असतील तर जाणून घ्या परिणाम आणि घ्यावयाची काळजी.
वास्तुशास्त्रानुसार, जेवताना केलेल्या लहान-लहान चुकांमुळेही घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. चुकीच्या दिशेला बसून जेवण करणे, मोबाइल किंवा टीव्ही पाहत जेवणे, तसेच दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवण करणे हे नकारात्मक ऊर्जा वाढवतात असे वास्तुशास्त्र सांगते.
वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर आणि जेवण करण्याच्या पद्धतींना फार महत्त्व दिलं जातं. योग्य ठिकाणी स्वयंपाक करणे आणि योग्य दिशेला तोंड करून जेवण केल्यास घरात सुख-शांती नांदते. मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे आरोग्य बिघडणे, आर्थिक अडचणी, घरातील वाद-विवाद आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच स्वयंपाकघर आणि जेवणाच्या थाळीशी संबंधित काही सोपे वास्तुनियम जाणून घेणं आवश्यक आहे.
स्वयंपाकघराची योग्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पूर्व (आग्नेय) कोपऱ्यात स्वयंपाकघर असणं सर्वात शुभ मानलं जातं. ही अग्नि तत्त्वाची दिशा असल्याने येथे बनवलेलं अन्न शुभ आणि ऊर्जादायी असतं. स्वयंपाक करताना व्यक्तीचं तोंड पूर्व दिशेकडे असावं, यामुळे अन्नात सकारात्मक ऊर्जा येते.
स्वयंपाकघर ईशान्य दिशेत (उत्तर-पूर्व) असलं तरी चालतं, मात्र दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेत स्वयंपाकघर असणं शुभ मानलं जात नाही.
जेवण करण्याची योग्य दिशा
जेवताना देखील दिशेला विशेष महत्त्व आहे. जेवणासाठी बसताना तोंड पूर्व दिशेकडे ठेवणं सर्वात उत्तम मानलं जातं. यामुळे शरीराला सूर्याची ऊर्जा मिळते आणि मेंदू अधिक तल्लख राहतो.
उत्तर दिशेकडे तोंड करून जेवण केल्यासही चांगले परिणाम मिळतात, कारण ही दिशा कुबेराची मानली जाते. दक्षिण दिशेकडे तोंड करून कधीही जेवण करू नये. पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवण करता येतं, यामुळे सामान्य लाभ मिळतो असे वास्तुशास्त्र सांगते.