आजचे राशिभविष्य, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? |सोमवार , १५ जुलै २०२४

आजचे राशिभविष्य : सोमवार , १५ जुलै २०२४

चिराग दारुवाला

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर

मेष : आज आर्थिक नफा होईल

मेष

मेष : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही कठोर परिश्रम कराल. आज होणारा आर्थिक नफा तुम्हाला दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे प्रेम जीवन तुमच्या आजच्या व्यावसायिक जीवनासारखेच उत्कृष्ट असेल. तुम्ही चांगले संवाद साधता याची खात्री करा. अविवाहितांना जोडीदार भेटेल.

वृषभ : आजचा दिवस सुखदायक आणि प्रेमाने परिपूर्ण

वृषभ

वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस सुखदायक आणि प्रेमाने परिपूर्ण असा असेल. तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मात्र जोडीदाराकडून तुमच्‍यावर आरोप होण्‍याचीही शक्‍यता आहे. तुम्हाला नातेसंबंधातील विश्‍वास दृढ करावा लागेल. वादविवाद टाळा.

मिथुन : बदलते ग्रहमान तुमच्‍यासाठी सकारात्मक

मिथुन

मिथुन : श्रीगणेश म्‍हणतात की, बदलते ग्रहमान तुमच्‍यासाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल. तुमच्‍या कामांना गती मिळेल. जोडीदाराची मदत लाभेल. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असला तरी जोडीदाराबाबत तुमच्‍या भावना व्‍यक्‍त करण्‍यासाठी तुम्ही वेळ काढाल.

कर्क : गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये लाभ

कर्क

कर्क : तुमची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, असे श्रीगणेश म्‍हणतात, तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही व्यवस्थित पाडाल. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये लाभ मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. घरातील कोणत्याही सदस्याच्या लग्नाच्या चर्चा आणि तयारीला वेग येईल. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुम्ही संयम राखा. प्रयत्‍नात कसूर होणर नाही याची काळजी घ्‍या.  जबाबदारीचे ओझे वाढू शकते.

सिंह : तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल

सिंह

सिंह : आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. रोजगाराची संधी उपलब्‍ध होईल. तुम्ही नवीन व्यवसाय उपक्रम सुरु करण्‍याचा विचार कराल. जोडीदारामध्‍ये सकारात्मक बदल जाणवू शकतात, असे श्रीगणेश सांगतात.

कन्या : तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल

कन्या

कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, तुमच्यासाठी आजच्या दिवसाचे सकारात्मक असेल. तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. कोणत्‍याही गोष्टींमध्ये घाई करू नका, तुमच्या कामाला तुमच्याकडून खूप वेळ आणि लक्ष देण्याची गरज आहे, अशी सूचना श्रीगणेश करतात.

तूळ : भविष्याबाबत अतिविचार करु नका

तूळ

तूळ : श्रीगणेश म्‍हणतात की, तुमच्‍या सहकार्‍यामुळे आज तुमचा व्यवसाय नवीन स्तरावर जाईल. तुमच्या व्यवसाय भागीदाराचे कौतुक करा, भविष्‍याबाबत अतिविचार करु नका. वर्तमानावर लक्ष केंद्रीत करा. कोणताही निर्णय घेताना घाई करुन नका, अशी सूचना श्रीगणेश करतात.

वृश्चिक : दिवस खूप मजेशीर जाण्याची शक्यता

वृश्चिक

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज जीवन तुमच्यासाठी एक नवीन दृष्टीकोन घेऊन येईल. तुमच्‍यासाठी सकारात्‍मक दृष्‍टीकोन ठेवणे महत्त्‍वाचे आहे. आज तुम्ही प्रवास करत नसला तरीही तुमचा दिवस खूप मजेशीर जाण्याची शक्यता आहे. आज पती-पत्‍नीचे नाते मधूर होईल.

धनु : जोडीदाराचे वर्तन तुमच्‍यासाठी त्रासदायक

धनु

धनु : आज तुम्‍ही तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ व्‍यतित कराल. आरोग्य सुधारण्‍यासाठी काम करावे लागेल. जोडीदाराचे वर्तन तुमच्‍यासाठी त्रासदायक ठरण्‍याची शक्‍यता आहे. व्यवसायात संथपणा अनुभवाल. आजचा दिवस व्यवसायासाठी तटस्थ आहे, असे श्रीगणेश सांगतात.

मकर : व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल

मकर

मकर : आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होतील, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आरोग्‍य चांगले राहिल.

कुंभ : आज सकारात्‍मक निर्णय घ्या

कुंभ

कुंभ : श्रीगणेश सांगतात की, आज तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल. जीवनसाथी, मित्र आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याने तुमची कामे लवकरच पूर्ण होतील. आज सकारात्‍मक निर्णय घ्या. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

मीन : प्रलंबित कामे पूर्ण होतील

मीन

मीन : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुमचा दिवस समाधान देणार असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही दिवसभर चांगला मूडमध्ये असाल. तुमचे प्रेम जीवन खूप बहरेल. व्यवसायात नवी संधी अनुभवला. आजचा आर्थिक फायदा भविष्यातील गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT