Horoscope Today
आजचे राशिभविष्य, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? मंगळवार, २३ जुलै २०२४ File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? |बुधवार, २४ जुलै २०२४

चिराग दारुवाला

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर

मेष : आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल

मेष

मेष : आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे काम प्रामाणिकपणे करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल. अति कामाचा ताण आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो.

वृषभ : भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करा

वृषभ

वृषभ : लोकांची चिंता न करता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला नवीन यश मिळेल. भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करा. घरात धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यक्रम होतील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. घसा दुखीचा त्रास होवू शकतो.

मिथुन : वैवाहिक जीवन सामान्य राहील

मिथुन

मिथुन : सकारात्मक आणि संतुलित विचाराने काही काळापासून सुरू असलेल्या समस्या नक्कीच सुटतील. भावांसोबत सुरू असलेले कोणतेही वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासंबंधी तुमच्या भविष्यातील योजना सध्या टाळा. न्‍यायालयाशी संबंधित काही कार्यवाही असल्यासणि निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तणाव आणि चिंता यामुळे निद्रानाश सारख्या तक्रारी उद्भवू शकते.

कर्क : प्रलंबित काम पूर्ण झाल्‍याने समाधान लाभेल

कर्क

कर्क : आज तरुणाई त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. प्रलंबित काम पूर्ण झाल्‍याने समाधान लाभेल. वैयक्तिक बाबी बाहेरील लोकांसमोर उघड करू नका. घरातील सुविधांवर खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. शेजाऱ्यांशी वाद टाळा. घरातील काही समस्यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होईल. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी.

सिंह : मुलांचे शिक्षण,करिअरशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण होतील

सिंह

सिंह : मुलांचे शिक्षण आणि करिअरशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबात काही काळापासून सुरू असलेली बेशिस्‍त दूर करण्यासाठी महत्त्वाचे नियम बनवाल. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हितकारक ठरेल. सध्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा. पती-पत्नी परस्पर तडजोडीने कुटुंबाचे योग्य व्यवस्थापन करतील.

कन्या : तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळेल

कन्या

कन्या : तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळेल. अनुभवी आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचे पालन केल्याने व्यक्तिमत्त्वात भर पडेल. झटपट यश मिळवण्याच्या इच्छेने कोणतेही अनुचित काम करू नका. मुलांचे मनोबल टिकवण्यासाठी तुमचे सहकार्य आवश्यक आहे. खोकला, सर्दी, ताप यांसारख्या ऋतुमानाच्या समस्या असतील.

तूळ : महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल

तूळ

तूळ : तुम्हाला दैनंदिन दिनक्रमापेक्षा नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्लाही घ्या. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा.कुटुंबासोबत मनोरंजन, खरेदीत वेळ जाईल.

वृश्चिक : तुमच्‍या मेहनतीला यश मिळेल

वृश्चिक

वृश्चिक : कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्‍या मेहनतीला यश मिळेल. जवळच्या नात्यांमध्ये काही काळ सुरू असलेले वाद कुणाच्या तरी हस्तक्षेपाने मिटतील. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल.

धनु : आत्मविश्वासाने बहुतेक कामे पूर्ण होतील

धनु

धनु : आत्मविश्वासाने बहुतेक कामे पूर्ण होतील. व्यस्त असूनही तुम्ही तुमच्या वैयक्तिक हितासाठीही वेळ काढाल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. इतरांची जबाबदारी तुमच्या डोक्यावर घेतल्याने तुमच्यासाठी त्रास होईल. तुमच्या क्षमतेनुसार काम करा. विद्यार्थ्यांनी निरुपयोगी कामात गुंतून आपल्या करिअर आणि अभ्यासाशी खेळू नये. कार्यक्षेत्रात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

मकर : वैवाहिक जीवन आनंदी राहील

मकर

मकर : आज जवळच्या नातेवाइकांशी सुरू असलेले मतभेद दूर होतील. विद्यार्थी त्यांच्या नोकरीशी संबंधित कोणत्याही मुलाखतीत यशस्वी होतील. कुटुंबाशी संबंधित घेतलेले महत्त्वाचे निर्णय सकारात्मक परिणाम देतील. मित्राबाबत अप्रिय माहिती मिळाल्याने मन अस्वस्थ होईल. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे काम होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ : जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होतील

कुंभ

कुंभ : जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुमचे योगदान असेल. तुमच्या कोणत्याही नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प करा. कोणतीही योजना राबविण्यापूर्वी नीट विचार करावा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कामातही वेळ जाईल.

मीन : पचनक्रिया मजबूत होण्यासाठी पौष्टिक आहार घ्या

मीन

मीन : आज तुमच्‍या सामाजिक सीमा वाढतील. घराच्या देखभालीशी संबंधित काही योजना असतील. तुमच्या जवळच्या नातेवाईकाशी संबंध बिघडू शकतात. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात धोका पत्करू नका. पचनक्रिया मजबूत होण्यासाठी पौष्टिक आहार घ्या.

SCROLL FOR NEXT