Horoscope Today
आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? |शनिवार, २७ जुलै २०२४ File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Daily Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, २७ जुलै २०२४

चिराग दारुवाला

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर

मेष : शक्य असेल तीच जबाबदारी स्‍वीकारा

मेष

मेष : सकारात्‍मक विचारातून कोणत्याही परिस्थितीत सुसंवाद राखाल. शक्य असेल तीच जबाबदारी स्‍वीकारा. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. विरोधक नमते घेतील. तुमच्या स्वभावाचा लोक चुकीचा फायदा घेऊ शकतात. व्यावसायिक प्रतिष्ठेमध्ये कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

वृषभ : घरातील सदस्य एकमेकांशी सुसंवाद साधतील

वृषभ

वृषभ : आजचा दिवस कौटुंबिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीने शुभ आहे. घरातील ज्येष्ठ सदस्य विशेष कामात मदत करतील. प्रत्येक कार्यात स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे याची जाणीव ठेवा. इतरांच्या प्रभावातून तुम्ही नुकसान करू शकता.कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. कार्यक्षेत्रात तुमच्या योग्य मांडणीचे कौतुक होईल. घरातील सदस्य एकमेकांशी सुसंवाद साधतील.

मिथुन : वैवाहिक जीवन आनंदी राहील

मिथुन

मिथुन : आजचा दिवस तुम्‍ही कुटुंबासोबत व्‍यतित कराल. घरामध्ये धार्मिक नियोजन शक्य आहे. तुमच्या नेतृत्वाखाली एक विशेष उपक्रम पूर्ण होईल. दुपारनंतर जवळच्या नातेवाईकाशी वाद होण्याची शक्यता आहे. यावेळी शांत राहणे चांगले. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कर्क : असंतुलित आहारामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात

कर्क

कर्क : आज ग्रहमान अनुकूल आहे. आर्थिक योजनाही यशस्वी होतील. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. आपल्या आवडीच्या कार्यात थोडा वेळ घालवा. तुमची इच्छा लोकांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. व्यवसायात मेहनत करण्याची वेळ आली आहे. पती-पत्नीमध्ये मधुर संबंध राहतील. असंतुलित आहारामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात.

सिंह : व्यवसायात मंदी येऊ शकते

सिंह

सिंह : आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही वाटेल. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रीत करा. मालमत्तेशी संबंधित योजना त्वरित पूर्ण करा. कुटुंबातील सदस्‍याच्‍या नकारात्मक बोलण्यामुळे घरातील वातावरण थोडे गोंधळाचे होऊ शकते. तुमच्या सहकार्यातून समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. जवळच्या नातेवाईकाला शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तुमच्या मदतीची आवश्यकता असेल. व्यवसायात मंदी येऊ शकते. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम कुटुंबावर होऊ शकतो.

कन्या : व्यवसायात सुधारणा होईल

कन्या

कन्या : आज ग्रहांची स्थिती थोडी अनुकूल राहील. काही काळापासून सुरू असलेल्या तणावातूनही मुक्‍तता होईल. घरातील सुखसोयींशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न कराल. तरुणही त्यांच्या भविष्याबाबत अधिक सक्रिय होतील. कामातील अति व्यस्ततेमुळे कुटुंबीयांना वेळ देता येणार नाही. व्यवसायात सुधारणा होईल.

तूळ : अहंकारामुळे ध्येयापासून दूर जाण्‍याचा धोका

तूळ

तूळ : आज तुम्ही वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. काही लोक तुमच्या कामात अडथळा आणतील; पणतुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कामावर लक्ष केंद्रित करा. तरुणांना त्यांच्या करिअरबाबत काही शुभ सल्ले मिळू शकतात. दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवताना मनावरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अहंकारामुळे ध्येयापासून दूर जाण्‍याचा धोका. कुटुंबातील ज्‍येष्‍ठांबरोमर वेळ व्‍यतित कराल. व्यवसायावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

वृश्चिक : कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.

वृश्चिक

वृश्चिक : सामाजिक कार्यात तुमचे निस्वार्थ योगदान आज तुम्हाला आध्यात्मिक आनंद देईल. प्रतिष्ठित लोकांशीही लाभदायक संपर्क होईल.गुंतवणुकीशी संबंधित कामे पूर्ण करण्यावर भर द्या. चुकीच्या बोलण्यामुळे विद्यार्थी ध्येयापासून दूर जाऊ शकतात. बाजारात तुमच्‍या प्रतिभेच्‍या जोरावर नवीन यश मिळू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.

धनु : कार्यक्षेत्रात कामे शांततेने पूर्ण होतील

धनु

धनु : आज जवळच्या लोकांच्या भेटी आणि मनोरंजनात वेळ व्‍यतित कराल. कोणत्याही विशिष्ट समस्येवर उपाय शोधाल. तरुणाई अभ्यास आणि करिअरबाबत गंभीर आणि सतर्क असेल. चुकीच्या कामात जास्त खर्च झाल्याने मन थोडे अस्वस्थ राहील. कार्यक्षेत्रात कामे शांततेने पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांना पूर्ण पाठिंबा असेल.

मकर : आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम जाऊ शकतो

मकर

मकर: तुमच्या कार्यांला आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टीकोन स्वीकाराल. जवळच्या नातेवाईकाच्या घरी येण्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. खर्चाबरोबरच उत्पन्न वाढल्याने योग्य व्यवस्था होईल. सासरच्या मंडळींशी काहीसा तणाव राहिल. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम जाऊ शकतो. अतिकामामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांना जास्त वेळ देऊ शकणार नाही.

कुंभ : व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये पूर्ण सहकार्य मिळेल

कुंभ

कुंभ : दिवसाच्या सुरुवातीला कामे आयोजित करण्यात काही अडचण येऊ शकते. दुपारनंतर ग्रहस्थिती अनुकूल राहील. पैशाच्या व्यवहारावरून एकमेकांचे नाते बिघडू नका. आर्थिक सुव्यवस्था राखण्यासाठी संयम ठेवा. मानसिक शांती आणि विश्रांतीसाठी, आध्यात्मिक आणि ध्यान कार्यात थोडा वेळ व्‍यतित करा. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये पूर्ण सहकार्य मिळेल.

मीन : समस्या परस्पर सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा

मीन

मीन : जीवनशैलीला नवीन आकार देण्यासाठी सर्जनशील विचार कृतीत आणाल. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक उपक्रमात यश मिळू शकते. मालमत्ता किंवा पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. कोणतीही समस्या परस्पर सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही. पती-पत्नीमधील संबंध सुधारण्यासाठी थोडा वेळ एकत्र घालवा.

SCROLL FOR NEXT