जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? |  File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, २४ ऑगस्‍ट २०२४

जाणून घ्या आजचे राशिभविष्य

चिराग दारुवाला

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : लोकांमध्ये तुमच्‍या कामाची प्रशंसा होईल

मेष

मेष : श्रीगणेश म्‍हणतात की, आज व्यावहारिक कौशल्य आणि समजूतदारपणाने कोणतेही अपूर्ण काम पूर्ण करू शकाल. लोकांमध्ये तुमच्‍या कामाची प्रशंसा होईल. जवळच्या मित्राच्या कामात हातभार लावाल. दैनंदिन कामांमधून तुम्ही तुमच्या कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल. मुलांच्या कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी तुमचे योगदान आवश्यक असेल. भागीदारीशी संबंधित व्यवसायात एकमेकांची साथ ठेवणे आवश्यक आहे. पती-पत्नीचे नाते मधूर होईल. आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नका.

वृषभ : तुमच्या प्रिय मित्राला आर्थिक मदत करावी लागेल

वृषभ

वृषभ : आज तुम्हाला तुमच्या प्रिय मित्राला आर्थिक मदत करावी लागेल. कुटुंबातील सदस्यांसह घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ जाईल. मित्र-मैत्रिणींसोबत सहलीचे नियोजन कराल. वडीलधाऱ्यांच्या सन्मानाला धक्का लावल्याने ते निराश होऊ शकतात. तरुणांनी चुकीच्या कामातून लक्ष हटवून करिअरला प्राधान्य द्यावे. व्‍यवसायात कोणतीही नवीन योजना हाती घेताना काळजीपूर्वक विचार करा. घराची सुव्यवस्था राखण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांशी सुसंवाद साधला पाहिजे. प्रकृती चांगली राहिल.

मिथुन : इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ करू नका

मिथुन

मिथुन : आज तुमचे लक्ष एखाद्या विशिष्ट विषयावर केंद्रित होईल, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्य करणाऱ्या लोकांसोबत थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती लाभेल. इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ करू नका. यामुळे नात्यातील दरी वाढू शकते. जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित कोणतेही काम आज टाळावे. व्यवसायात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. घरातील वातावरण आनंदी राहिल. पोटाशी संबंधित विकारांचा त्रास संभवतो.

कर्क : जुन्या नकारात्मक गोष्टींना प्राधान्‍य देवू नका

कर्क

कर्क : आज तुमच्‍या आवडीच्‍या कामांसाठी थोडा वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्‍हाला नवीन ऊर्जा मिळेल. कुटुंबाशी संबंधित समस्या देखील सोडवली जाऊ शकते. जुन्या नकारात्मक गोष्टींना प्राधान्‍य देवू नका. अन्‍यथा जवळच्या व्यक्तीसोबतचे नातेही खराब होऊ शकते. जवळच्या नातेवाईकाच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल. सार्वजनिक जीवनात यश मिळेल. वैवाहिक जीवनात योग्य सामंजस्य राहिल. सर्दी-खोकल्याचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

सिंह : काळानुरूप आपली जीवनशैली बदलणे आवश्यक आहे

सिंह

सिंह : तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य देणे योग्य ठरेल, असे श्री गणेश सांगतात. काळानुरूप आपली जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. घरामध्ये काही बदलाचे बेत आखले जातील. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टी शिस्तबद्ध असल्‍यामुळे याचा इतरांना त्रास होऊ शकतो. व्यवसायात कर्मचारी वर्गाच्‍या सल्ल्याला महत्त्व द्या. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. अति ताणामुीळे डोकेदुखी होऊ शकते.

कन्या : धार्मिक किंवा आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवा

कन्या

कन्या : घरात नातेवाईक किंवा जवळच्या मित्रांची उपस्थिती आनंदी वातावरण निर्माण करेल, असे श्री गणेश सांगतात. अपत्याबद्दल सतत असलेली चिंता दूर होऊन आराम मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवा. आज कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेऊ नका. जास्त वादात पडू नका; अन्यथा समाजात तुमची वाईट छाप पडू शकते. परिस्‍थिती संयमाने हाताळा. व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी घरातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. अतिकामामुळे थकवा जाणवू शकतो.

तूळ : आज काही विशेष यश मिळू शकते

तूळ

तूळ : आज काही विशेष यश मिळू शकते, असे श्रीगणेश सांगतात. तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळू शकते. घराच्या देखभालीच्या कामात सुधारणा करता येतील. आत्मनिरीक्षणात थोडा वेळ व्‍यतित करा. रागामुळे परिस्थिती बिघडू शकते. मुलांबद्दल काहीतरी नकारात्मक जाणून घेतल्याने मन थोडे चिंताग्रस्त होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. सांधेदुखीचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.

वृश्चिक : कुटुंबातील सदस्यांमध्ये काही मतभेद होऊ शकतात

वृश्चिक

वृश्चिक : श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहमान अनुकूल आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असणारी चिंता आणि तणाव दूर होईल. भावांसोबतही नाते मधुर होऊन कौटुंबिक वातावरणात सुखद बदल घडून येतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही मतभेद होऊ शकतात. एकमेकांचे विचार समजून घ्या आणि त्यांचा आदर करा. धार्मिक किंवा अध्यात्मिक ठिकाणी गेल्याने आराम मिळेल. व्यवसायाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. घरात आनंदी वातावरण राहील. ऍलर्जीशी संबंधित समस्या जाणवू शकते.

धनु : तुम्‍हाला विशिष्ट प्रकल्पात यश मिळण्याची शक्यता आहे.

धनु

धनु : श्रीगणेश म्‍हणतात, तुमच्यासाठी काळ अनुकूल आहे. तुम्‍हाला विशिष्ट प्रकल्पात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्‍या व्‍यक्‍तिमत्त्‍वाने लोक प्रभावित होतील. वेळेचे मूल्य ओळखा. योग्यवेळी योग्य गोष्ट न केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या व्यवहारात संयमता आवश्यक आहे. जुन्या मालमत्तेशी संबंधित समस्येवर तोडगा काढणे कठीण आहे. भागीदारीशी संबंधित व्यवसायातील जुने मतभेद दूर होऊ शकतात. तब्येत थोडी नरम राहू शकते.

मकर : व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील

मकर

मकर : श्रीगणेश म्‍हणतात की, आज सामाजिक आणि कौटुंबिक कार्यात तुमचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. शांततेसाठी थोडा वेळ एकांत किंवा धार्मिक स्थळी घालवणे देखील आवश्यक आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य विचारमंथन आवश्यक आहे. व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील.

कुंभ : कोणतेही काम करताना आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करु नका

कुंभ

कुंभ : आज घराशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर वेळ जाईल, असे श्रीगणेश सांगतात. तुमची सकारात्मक आणि आश्वासक वृत्ती तुम्हाला समाजात आणि कुटुंबात आदर मिळवून देईल. युवकांनी आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम केले तर यश नक्कीच मिळेल. कोणतेही काम करताना आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करु नका. विनाकारण इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्यामुळे तुम्‍हाला टीका सहन करावी लागील.

मीन : आज संधीचा फायदा घेण्याची गरज आहे

मीन

मीन : श्रीगणेश म्‍हणतात की, आज संधीचा फायदा घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या गुणवत्तेनुसार योग्य परिणाम देखील मिळेल. काही खर्च अचानक वाढू शकतात. आर्थिक नियोजन तयार करणे आवश्यक आहे. जबाबदाऱ्यांचा भार पडेल;पण
त्‍या पार पाडता न आल्‍याने चिडचिड होऊ शकते. वैवाहिक जीवनात एकमेकांशी सुसंवाद राखण्यात काही अडचणी येतील. तुमची दैनंदिन दिनचर्या आणि आहार व्यवस्थित ठेवल्याने तुम्हाला निरोगी वाटेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT