आजचे राशिभविष्य, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? |शुक्रवार, ५ जुलै २०२४

आजचे राशिभविष्य : शुक्रवार, ५ जुलै २०२४

चिराग दारुवाला

मेष : काही काळापासून सुरू असलेले अडथळे दूर करण्यात आज यश मिळेल

मेष

मेष : काही काळापासून सुरू असलेले अडथळे दूर करण्यात आज यश मिळेल. त्‍यामुळे आत्मसमाधानाची भावना असेल. राजकीय, सामाजिक कार्यात विशेष योगदान असेल. तरुणांची करिअरबाबतची बेपर्वाई भविष्यासाठी घातक ठरू शकते, अशी सूचना श्रीगणेश करतात. कार्यक्षेत्रात एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट प्रगती आणि विजयासाठी उपयुक्त ठरेल. पती-पत्नीचे नाते अधिक घनिष्ठ होईल.

वृषभ : आजचा दिवस संमिश्र फलदायी

वृषभ

वृषभ : आज मालमत्ता आणि गुंतवणूक कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहू शकता, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही प्रत्येक कामात रस घ्याल. तुमच्या क्षमतेनुसार काम पूर्ण कराल. सर्व काही ठीक असले तरी मनात नकारात्मक विचार येऊ शकतो. निसर्गासोबत आणि ध्यानात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला आराम मिळेल. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. व्यावसायिक कामे वाढतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहिल. प्रकृतीच्‍या तक्रारी जाणवतील.

मिथुन : सकारात्‍मक विचार-आत्मविश्वासामुळे नवीन आशा जागृत होणार

मिथुन

मिथुन : श्रीगणेश म्‍हणतात की, मानसिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम वाटेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेट फायदेशीर ठरेल. पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारची प्रकरणे निकाली काढू नका. वाहन किंवा घराच्या दुरुस्तीशी संबंधित कामांवर खर्च वाढेल. नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कार्यक्षेत्रात कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे. कुटुंबासोबत खरेदीमध्ये वेळ जाईल.

कर्क : कामात चांगले यश मिळाल्याने उत्साह वाढेल

कर्क

कर्क : श्रीगणेश सांगतात की, आज काही कामात चांगले यश मिळाल्याने उत्साह वाढेल. तुम्ही दिवसभराचा थकवा विसराल. कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची उत्तम संधी आहे. करिअर आणि वैयक्तिक कामांमध्ये अहंकार टाळा. खूप घाई आणि उत्साह एखाद्याशी संबंध खराब करू शकतात. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट तुमच्या व्यवसायात उपयुक्त ठरू शकते. कौटुंबिक वातावरण मधुर असेल. आरोग्य चांगले राहिल.

सिंह : कोणतीही दीर्घकाळची चिंता दूर होऊ शकते

सिंह

सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे. लाभाचे नवीन मार्ग मिळतील. कोणतीही दीर्घकाळची चिंता दूर होऊ शकते. आर्थिक बाबतीत ठोस आणि महत्त्वाचा निर्णयही यशस्वी होईल. विरोधकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या लहानसहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. मुलांचा ताण कमी करण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. जोडीदारासोबत काही वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तणावामुळे थकवा जाणवेल.

कन्या : आज स्वप्न साकार झाल्‍याने मानसिक समाधान लाभेल

कन्या

कन्या : आज स्वप्न साकार झाल्‍याने मानसिक समाधान लाभेल. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल योग्‍य वेळ आहे, असे श्रीगणेश सांगतात. विद्यार्थी अतिविचारात जास्त वेळ घालवू शकतात. त्‍यामुळे यश हुलकावणी देवू शकते. व्यावसायिक महिला विशेषतः त्यांच्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देतील. पती-पत्नीचे नाते मधुर राहील. पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात.

तूळ : नातेसंबंध सुधारण्यात यशस्वी व्हाल

तूळ

तूळ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्‍ही नातेसंबंध सुधारण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या सकारात्मक विचारसरणीप्रमाणे तुमच्यासाठी उत्कृष्ट परिस्थिती निर्माण होईल. मात्र घरामध्येही एखाद्या छोट्या गोष्टीवरून कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज होऊ शकतात. पती-पत्नीमध्ये अहंकाराबाबत वाद होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहिल.

वृश्चिक : भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल

वृश्चिक

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल. मनोरंजक कार्यात वेळ जाईल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा कार्यक्रमही होईल. व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल अनुभवाल. अचानक काही अडचण आणि समस्या उद्भवू शकतात. नकारात्मक कामात असलेल्या लोकांच्या संपर्कात राहणे तुमच्यासाठी बदनामीचे कारण बनू शकते. कार्यक्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते. आरोग्य उत्तम राहू शकते.

धनु : धर्मकर्म आणि अध्यात्मिक कार्यात रुची राहील

धनु

धनु : श्रीगणेश म्हणतात की, आज धर्मकर्म आणि अध्यात्मिक कार्यात रुची राहील. वाहन किंवा घराशी संबंधित कागदपत्रे जपून ठेवा. व्यावसायिक स्पर्धेत काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. पती-पत्नीचे नाते अधिक गोड होऊ शकते.

मकर : धार्मिक उत्सवात गैरसमजामुळे वाद होऊ शकतो

मकर

मकर : तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवून तुमची विशेष प्रतिभा जागृत करण्यात वेळ जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. एखाद्या धार्मिक उत्सवात गैरसमजामुळे कोणाशी वाद होऊ शकतो. कार्यक्षेत्रातील कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहिल.

कुंभ : गरजू मित्राला मदत केल्याने आनंद मिळेल

कुंभ

कुंभ : आज वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील, असे श्रीगणेश सांगतात. गरजू मित्राला मदत केल्याने आनंद मिळेल. कोणत्याही प्रकारे आपल्या तत्त्वांशी तडजोड करू नका. भावांसोबत गोड संबंध ठेवा. विद्यार्थी अभ्यासापासून विचलित होऊन चुकीच्या कामात गुंतू शकतात.अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. यंत्र किंवा तेलाशी संबंधित व्यवसायात लाभ होईल. अतिकामामुळे तुम्हाला कुटुंबाकडे लक्ष देता येणार नाही.

मीन : नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास मोठे यश मिळू शकते

मीन

मीन : श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या समज आणि बुद्धीच्या जोरावर कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास मोठे यश मिळू शकते. घरात मित्र किंवा पाहुण्‍याचे आगमन होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नका. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT