आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? AI Photo
ज्योतिष आणि धार्मिक

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? | शुक्रवार, २१ मार्च २०२५

Horoscope | जाणून घ्या आजचे राशिभविष्य

चिराग दारुवाला

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : आज तुम्हाला अनुभवी व्यक्तीची साथ मिळेल

मेष

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्हाला अनुभवी व्यक्तीची साथ मिळेल. तुमच्या मनात काही काळापासून सुरू असलेल्‍या संघर्षाला पूर्णविराम मिळेल. प्रतिकूल परिस्थितीत शांतता आणि संयम राखा; कोणतेही काम घाईघाईने आणि निष्काळजीपणे करू नका. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. व्यावसायिक कामांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन रोजगाराच्या संधी मिळाल्‍याने तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. नोकरदारांनी आपल्‍या लक्ष केंद्रित करावे.

वृषभ : आज दीर्घकालीन योजनांचे नियोजन कराल

वृषभ

श्रीगणेश म्‍हणतात की, आज दीर्घकालीन योजनांचे नियोजन कराल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी वाद टाळा तरुणांनी ध्‍येयपूर्तीसाठी कार्यरत राहावे. व्यवसायात उत्पादन क्षमतेत वाढ होईल. ग्रहमान अनुकूल असून, वेळेचा फायदा घ्‍या.

मिथुन : स्थलांतराशी संबंधित एखादा विचार असेल तर कामात विशेष काळजी घ्‍या

मिथुन

श्रीगणेश सांगतात की, स्थलांतराशी संबंधित एखादा विचार असेल तर कामात विशेष काळजी घ्‍या. कोणतेही देयके मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. मित्राचा सल्ला तुमच्‍यासाठी फायदेशीर ठरेल. निरुपयोगी कामांमध्ये रस घेऊ नका. कोणत्याही प्रकारचे अनुचित काम तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा अनुभव आणि पाठिंबा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. व्यावसायिक कामाला गती देण्यासाठी खूप गांभीर्याने विचार करा. जनसंपर्काची व्याप्ती आणखी वाढवल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल

कर्क

गेल्या काही काळापासून सुरू असलेले कौटुंबिक वाद मिटल्यामुळे घरात शांतीचे वातावरण असेल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. अन्‍य कोणाच्‍या सल्‍ल्‍यापेक्षघ स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. अतिउत्साह देखील केलेले काम बिघडू शकते, याची जाणीव ठेवा. व्यवसायात पूर्ण लक्ष द्या, विस्तार योजना गांभीर्याने घ्या.

सिंह : ग्रहांचे संक्रमण तुमची कार्य क्षमता वाढवत आहे

सिंह

श्रीगणेश सांगतात की, ग्रहांचे संक्रमण तुमची कार्य क्षमता वाढवत आहे. जवळच्या नातेवाईकांशी झालेली भेट फायदेशीर ठरेल. प्रवासाचे नियोजन कराल. स्वतःला श्रेष्ठ समजणे हानीकारक ठरेल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसायात सकारात्मक परिणाम देखील मिळतील. महत्त्‍वाच्‍या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्या.

कन्या : तुमच्या संतुलित वर्तनामुळे प्रत्येक परिस्थितीत योग्य सुसंवाद राहील

कन्या

तुमच्या संतुलित वर्तनामुळे प्रत्येक परिस्थितीत योग्य सुसंवाद राहील. मालमत्ता खरेदी-विक्रीशी संबंधित काही काम करता येईल. रागावण्याऐवजी, एखाद्याची चूक समजून घेऊन प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची चिंता असेल. त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

तूळ : नवीन प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये तुमची आवड वाढेल

तूळ

श्रीगणेश सांगतात की, नवीन प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये तुमची आवड वाढेल. प्रगतीचे नवीन संधी निर्माण होईल. मुलांच्‍या यशाने आनंदी व्हाल. आळस टाळा. तुमच्या कामाकडे अधिक लक्ष द्या. योग आणि ध्यान करणे लाभदायक ठरेल. व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. निरुपयोगी कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालवण्याऐवजी तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करा.

वृश्चिक : महिलांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे

वृश्चिक

श्रीगणेश म्‍हणतात की, महिलांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. एखादी आनंद वार्ता कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. तुमच्या स्वभावात परिपक्वता आणा. छोट्या गोष्टींवरून होणारी चिडचिड घरातील वातावरण दूषित करेल. वाढत्या खर्चाचा ताण जाणवेल. व्यावसायिकांशी सुरू असलेल्या स्पर्धेत यश मिळेल.

धनु : तुमच्या योग्य कार्यशैलीमुळे तुम्हाला समाजात मान्यता मिळेल

धनु

श्रीगणेश सांगतात की, तुमच्या योग्य कार्यशैलीमुळे तुम्हाला समाजात मान्यता मिळेल. कठोर परिश्रमाचेही सकारात्मक परिणाम मिळतील. प्रलंबित आर्थिक व्‍यवहार सोडविण्‍याचा प्रयत्‍न करा. इतरांच्या वैयक्तिक बाबींपासून स्वतःला दूर ठेवा. गैरसमजामुळे नातेवाईकाशी वाद होऊ शकतो. मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे देखील आवश्यक आहे. व्यवसायात तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला योग्य परिणाम मिळेल. बेकायदेशीर कामात सहभाग त्रासदायक ठरेल.

मकर : सकारात्मक वातावरणामुळे परिस्थिती अनुकूल होईल

मकर

श्रीगणेश म्‍हणतात की, कुटुंबात सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही बनवलेल्या नियमांमुळे घरात सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध वातावरण असेल. सकारात्मक वातावरणामुळे परिस्थिती अनुकूल होईल. कोणत्याही नकारात्मक कृतीमुळे मुले चिंताग्रस्त होऊ शकतात. कार्यक्षेत्राकडे दुर्लक्ष करु नका.

कुंभ : काही काळापासून प्रलंबित कामे आज सहजपणे पूर्ण होतील

कुंभ

श्रीगणेश सांगतात की, काही काळापासून प्रलंबित कामे आज सहजपणे पूर्ण होतील. घाई गडबडीऐवजी शांततेने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करा. अहंकार आणि अति आत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते. घरातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्‍ल्‍याचे पालन करणे हितकारक ठरेल. नवीन करार फायदेशीर ठरतील. व्यावसायिक उपक्रमांशी संबंधित कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या.

मीन : आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील

मीन

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वादापासून स्वतःला दूर ठेवा.विरोधक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील; पण काळजी करू नका, काहीही तुमचे नुकसान करणार नाही. व्यवसायात रखडलेल्या कामात गती येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT