Today Horoscope Marathi | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? AI Photo
ज्योतिष आणि धार्मिक

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? | मंगळवार, ६ मे २०२५ आजचे राशिभविष्य

Horoscope Marathi | जाणून घ्या आजचे राशिभविष्य

चिराग दारुवाला

Today Horoscope Marathi |

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष

मेष

मेष : श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहस्थिती अनुकूल आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी पूर्ण योजना आणि आराखडा तयार केल्यास कामात चुका टाळता येतील. मुलांच्या करिअरविषयी आनंदवार्ता मिळाल्‍याने घरात आनंददायी वातावरण निर्माण होईल. सध्याच्या काळात आपल्या सरावात लवचिकता आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मिडिया किंवा निष्क्रिय गप्पांमध्ये गुंतून आपल्या करिअरमध्‍ये तडजोड करू नये. संतुलित आहारासोबत व्यायामावरही लक्ष द्या.

वृषभ

वृषभ

वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आज प्रतिभा आणि उर्जेच्या जोरावर आपण प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकाल. विशेषतः महिलांसाठी काळ अनुकूल असेल. उत्साह आणि लाभांची जाणीव होईल. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे अडचणीत आणू शकते, याची जाणव ठेवा. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यात समतोल राखणे कठीण जाईल. व्यवसायात आपल्या संपर्क व्यक्तीसोबत गोड संबंध ठेवा.

मिथुन

मिथुन

मिथुन : आज तुम्‍ही बुद्धिमत्तेच्या जोरावर सकारात्मक परिस्‍थिती निर्माण कराल. पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळवण्याचा हा योग्य काळ आहे. बेकायदेशीर कामांपासून दूर रहा, अन्यथा अपमान होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी करिअर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करून चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवू नये, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. नोकरदार व्यक्तींवर आज कामाचा ताण अधिक असेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी विशेष काळजी घ्‍यावी.

कर्क

कर्क

कर्क : श्रीगणेश सांगतात की, आज घरात शिस्तीचे वातावरण राहील. आपल्या कामासोबतच वैयक्तिक स्वार्थांवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे आपल्यात नवीन उर्जा संचारेल. घरातील एखाद्या सदस्याच्या वैवाहिक जीवनात वेगळेपणाची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे घरात तणाव निर्माण होईल. आर्थिक प्रश्‍नांवर तोडगा काढताना काळजीपूर्वक निर्णय घ्‍या. व्यवसायात जनसंपर्क मजबूत करा. घरातील वातावरण योग्य आणि आनंदी राहील.

सिंह

सिंह

सिंह : श्रीगणेश म्हणतात की, काही काळापासून सुरू असलेल्या समस्या सोडवण्यात आज तुम्‍ही यशस्वी व्हाल. मित्र आणि गुरुंच्या सहवासात चांगला वेळ जाईल. विद्यार्थी आणि तरुणांना स्पर्धेचा सकारात्मक निकाल मिळू शकतो. कुणाशीही वादात न पडणे योग्य ठरेल. राग आणि आवेगावर नियंत्रण आवश्यक आहे. व्यवसायात परिस्थिती अनुकूल असेल.

कन्या

कन्या

कन्या : घरातील वडीलधाऱ्यांशी नम्रतेने वागणे आणि त्यांच्या सल्ल्याचे पालन करणे आपल्यासाठी शुभ ठरेल. मीडिया आणि जनसंपर्काशी संबंधित कार्यांमध्ये आपली विशेष रुची राहील. इतरांवर अति विश्वास ठेवणे आपल्यासाठी घातक ठरू शकते, याची जाणीव ठेवा. भविष्यकालीन योजना ठरवताना आपल्या निर्णयाला प्राधान्य द्या. कामाच्या ठिकाणी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांसोबत समन्वय योग्य राहिल्यास कामाचा वेग वाढेल. घरात बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे थोडे नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते.

तूळ

तूळ

तुळ : वारसाहक्काच्या संपत्तीबाबतचा वाद सोडविण्‍यास प्राधान्‍य द्‍या. आपल्याला सर्जनशील कार्यांमध्येही रस असेल. आपली दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा निष्काळजीपणामुळे एखादे महत्त्वाचे काम लांबणीवर पडू शकते. मुलांच्या कृती आणि संगतीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. व्यवसायाशी संबंधित आपली कार्यपद्धती इतरांशी उघड करू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : श्रीगणेश म्‍हणतात की, आपण आपले उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. बदलत्या परिस्थितीनुसार आपण आपल्या कामाच्या पद्धतीत केलेले बदल फलदायी ठरतील. विमा आणि इतर गुंतवणुकीत पैसे गुंतवणे फायदेशीर ठरेल. कर्ज व्यवहार टाळावेत. घरच्या कामांमध्ये अति हस्तक्षेप करणे योग्य नाही. योजना तयार करताना ती प्रत्यक्षात आणणेही आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचारी आणि सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा असेल.

धनु

धनु

धनु : आत्मविश्वास आणि धैर्याच्या जोरावर आपण विशिष्ट उद्दिष्ट गाठू शकाल. प्रभावशाली व्यक्तीच्या भेटीमुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. काही नव्या योजनांचा गांभीर्याने विचार करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. आपल्या भावनाशील स्वभावामुळे छोटीशी नकारात्मक गोष्टही त्रास देऊ शकते. उत्पन्नासोबतच खर्चही वाढतील. अति घाईमुळे एखादे काम बिघडू शकते. महत्त्वाच्या व्यक्तीच्या सल्ल्याने व्यवसायात फायदा होईल. कुटुंबासोबत खरेदी आणि वेळ घालवल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील.

मकर

मकर

मकर: आज तुम्‍ही नेहमीच्या कामांपेक्षा वेगळ्या गोष्टींचे सखोल ज्ञान घेण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आत्मविश्वास आणि सन्मान दोन्ही वाढतील. काही जण मत्सरामुळे आपल्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करतील. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. सध्या कोणताही व्यवसायिक कर्ज घेणे टाळा. अविवाहित व्यक्तीसाठी योग्य विवाहयोग्य स्थळ आल्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील.

कुंभ

कुंभ

कुंभ : श्रीगणेश सांगतात की घरातील सुखसुविधांसाठी खरेदी करण्यात वेळ जाईल. अध्यात्माशी संबंधित कार्यांमध्ये विशेष रुची असेल. वारसाहक्काशी संबंधित प्रकरण कोणाच्या मध्यस्थीने सोडवण्याचा योग्य काळ आहे. मित्रांशी संबंध बिघडवू नका. आपले एखादे गुपित उघड होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मानसिक शांततेसाठी धार्मिक ठिकाणी काही वेळ घालवा. कामाच्या क्षेत्रात घाई करण्याऐवजी गांभीर्याने आणि काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे.

मीन

मीन

मीन : श्रीगणेश म्‍हणतात की, मुलांच्या करिअरविषयी चांगली बातमी मिळाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जवळचे नातेवाईकांरोबर एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर चर्चा होईल. प्रवासाचे योग आहेत. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबीयांचा सल्ला घ्या. कोणताही खास कारण नसताना अस्वस्थता आणि तणाव जाणवेल. निसर्गाच्‍या सानिध्‍यात ठेवा वेळ व्‍यतित करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT