Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष :आरोग्याबद्दल विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल. आर्थिक पारितोषिकही मिळेल.
वृषभ : कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे रागाला आमंत्रण आहे. जोडीदाराची साथ लाभेल. दिवस उत्साही असेल.
मिथुन : खूपच कमी सहनशीलता आज असेल. परंतु, कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील.
कर्क : आनंद वाटून घेण्याने आरोग्य बहरून जाईल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल.
सिंह : दिवास्वप्न पाहणे वाईट नाही. या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार मिळवू शकता. तुमच्याजवळ वेळेचा अभाव नसेल.
कन्या : कुटुंबीयांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले, तर त्याकडे दुर्लक्ष करा.
तूळ : दिवसाची सुरुवात चांगली असली, तरी संध्याकाळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल.
वृश्चिक : तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
धनु : चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे. परंतु, खर्च होऊ देऊ नका. तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे काही नवे मित्र जोडाल.
मकर : सामाजिक कामात रमाल. अन्य लोकांना गुपिते सांगणे टाळा. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल.
कुंभ : अधिक काम मानसिकदृष्ट्या चिंतीत करू शकते. संध्याकाळी थोडा वेळ ध्यान करून तुम्ही आपली ऊर्जा परत मिळवू शकता.
मीन : काही ठिकाणी माघार घ्यावी लागू शकेल; पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता, अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या.