मेष : त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल.
वृषभ : वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे हिताचेही असेल.
मिथुन : कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल.
कर्क : तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल; पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका, एकटे पडाल.
सिंह : अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या, तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल. मन प्रसन्न होईल.
कन्या : संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे हमखास यशप्राप्ती होणार आहे. आर्थिक आवक होईल.
तूळ : आज दिवस चांगला जावा, असं वाटत असेल, तर तुमच्या जोडीदाराचा मूडऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.
वृश्चिक : आशा-आकांक्षा सोडू नका. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. मनावर ताबा ठेवा.
धनु : आसपासचे लोक खूप कामाच्या अपेक्षा तुमच्याकडून करतील; पण जेवढे काम तुम्ही करू शकता, तेवढ्याचेच वचन द्या.
मकर : तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेमप्रकरण धोक्यात येऊ शकते. काळजी घ्यावी लागेल.
कुंभ : दिवस संपण्याच्या आधी उठा आणि कामास लागा. अन्यथा, तुम्हाला आपला दिवस पूर्णतः खराब झाल्याचे वाटेल. कोणतीही कृती काळजीपूर्वक करा.
मीन : प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल.