Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात गती येईल आणि नवीन संधी मिळतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ : संवाद प्रभावी ठरेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील. कामात प्रगतीची चिन्हे आहेत. लहान प्रवासाचा योग संभवतो.
मिथुन : थोडा ताण जाणवू शकतो, पण संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. खर्च वाढण्याची शक्यता. आरोग्याकडे लक्ष द्या. नातेसंबंध जपा.
कर्क : भावनिक निर्णय टाळा. व्यावहारिक राहा. कामात अडथळे येऊ शकतात. चिकाटीने यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
सिंह : नेतृत्वगुण चमकतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आरोग्य चांगले राहील.
कन्या: कामाचा ताण वाढू शकतो. सहकाऱ्यांशी वाद टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल.
तूळ : जुनी कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाची शक्यता. मित्रांसोबत वेळ छान जाईल. नात्यांमध्ये विश्वास महत्त्वाचा ठरेल.
वृश्चिक : आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. गुप्त योजना यशस्वी ठरतील. कामात प्रगती होईल. मन प्रसन्न राहील.
धनु : नवीन संधी मिळतील, विशेषतः करिअरमध्ये. प्रवासाचा योग आहे. आत्मविश्वास वाढेल. शिक्षणात प्रगती होईल.
मकर : कुटुंबात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. संयम ठेवा. प्रेमात यश येईल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : नवीन कल्पना यश देईल. मित्र आणि संपर्क उपयोगी पडतील. प्रेमसंबंध सुधारतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
मीन : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मन चंचल राहू शकते. कामात लक्ष केंद्रित करा. आर्थिक बाबतीत सावध राहा.