मेष :
संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्याच्या वृत्तीमुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.
वृषभ :
इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत. कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे.
मिथुन :
आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा.
कर्क :
उद्योग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. जोडीदाराशी नाते तणावाचे राहील.
सिंह :
अर्धा दिवस स्वतःला थोडा आळस वाटू शकतो. हिंमत ठेवली तर, बरेच काम केले जाऊ शकते. आर्थिक व्यवहार करताना जपून करा.
कन्या :
आज काही चिंता तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकते. त्याच चिंतेला दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या घरच्यांसोबत बोलले पाहिजे.
तूळ :
घरातील वरिष्ठ व्यक्ती काही ज्ञानाची गोष्ट सांगू शकतील. तुम्ही त्यावर अंमलबजावणीही कराल. नवीन गाठीभेटी होतील.
वृश्चिक :
मूड एकदम बहारदार राहील. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. गुंतवणूक जपून करा.
धनु :
सांपत्तिक स्थिती सुधारली तरी खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण होतील.
मकर :
परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल.
कुंभ :
तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. मुलांचा अभिमान वाटेल.
मीन :
तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल.