वृषभ File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Annual Horoscope 2025 | वृषभ | चौफेर प्रगती

Annual Horoscope 2025 | आर्थिक स्थिती व्यवसाय, आर्थिक लाभ, व्यापार, उद्योगधंदा, कारखानदारी या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष आर्थिक लाभाचे आहे.

पुढारी वृत्तसेवा

आपले पाय जमिनीवर स्थिर असतात. व्यवसाय, नोकरी, जागा वरचेवर न बदलण्याचा आपला स्वभाव असतो, मैत्रीला व शब्दाला आपण पक्के असता. श्रद्धा व निष्ठा या बाबतीत आपण कमालीचे तत्त्वप्रधान असता. अनुयायी म्हणून आपली रास अत्यंत चांगली असते. आपल्या नेत्याला आपण आपली निष्ठा अर्पण केलेली असते. त्यामध्ये अस्थिरपणा नसतो. घेतलेल्या निर्णयाला चिकटून राहण्याचा आपला स्वभाव असतो.

आरोग्य

सामान्यतः आरोग्य चांगले राहते. आरोग्याच्या संदर्भात वृषभ राशीच्या व्यक्ती या सामान्यतः चांगल्या असतात. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे.

संपूर्ण वर्ष चांगले आहे. गुरू, शनी, राहू अनुकूल आहेत. आरोग्य दृष्टीने चांगले कालखंड दि. ०१/०६/२०२५ ते दि. २९/०६/२०२५ दि. २०/१२/२०२५ ते दि. ३१/१२/२०२५ उर्वरित सर्व कालखंड आरोग्यासाठी चांगले आहेत.

व्यवसाय, उद्योग

आर्थिक स्थिती व्यवसाय, आर्थिक लाभ, व्यापार, उद्योगधंदा, कारखानदारी या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष आर्थिक लाभाचे व उद्योगधंद्यात, व्यवसायात उलाढाल वाढण्याचे आहेत. विशेषतः वर्षाचा उत्तरार्थ हा अधिक चांगला आहे. दि. १५/०५/२०२५ पासून आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल. दि. १५/०५/२०२५ ते दि. १८/१०/२०२५ या कालखंडात आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकता, व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकता. या कालखंडात बाजारपेठेचा अभ्यास करून शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. या कालखंडात गडी, कर्मचारी, नोकरचाकर, हाताखालील सेवक वर्ग हा चांगला मिळणार आहे. सेवकांचे चांगले सहकार्य लाभेल.

विरोधकावर मात कराल. हितशत्रुच्या कारवायांना आळा बसेल. या कालखंडात आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा व्यवसायाची शाखा सुरू करू शकता. दि. १८/१०/२०२५ नंतर दि. ३१/१२/२०२५ पर्यंत आर्थिक लाभाची प्रगती समाधानकारक होत राहणार आहे. या कालखंडात मित्रांचे, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. आपल्या बाजारातील उलाढाल वाढवू शकाल. नवीन संधी निर्माण होतील. काही लोकांचे अनपेक्षितपणे सहकार्य मिळेल. भागीदारी असलेल्या व्यवसायामध्येसुद्धा हे वर्ष चांगले जाणार आहे. दि. १८/१०/२०२५ पासून जो शनी अकराव्या स्थानात आहे त्या शनीला गुरुची साथ लाभणार आहे. शनीवर गुरूची दृष्टी येणार आहे, ही गोष्ट व्यवसायात लाभ मिळवून देणारी आहे, तर वर्षाच्या उत्तरार्धात राहू दहाव्या स्थानात येत असल्यामुळे तोही व्यवसायाला उपकारक ठरणार आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगला कालखंड दि. २८/०१/२०२५ ते दि. ३०/०५/२०२५ दि. ०१/०७/२०२५ ते दि. ०८/१०/२०२५ दि. २६/११/२०२५ ते दि. २०/१२/२०२५

नोकरी

वृषभ राशीच्या नोकरीतील व्यक्तींना हे वर्ष खूपच चांगले जाणार आहे. गुरू, शनी, राहू या ग्रहांची साथ लाभणार आहे. दि. ०१/०१/२०२५ पासून दि. १४/०५/२०२५ पर्यंत तुमचे निर्णय योग्य ठरतील, अचूक ठरतील, नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. नवीन बाजारपेठ लाभेल, आरोग्याचीही साथ लाभेल. या वर्षी गडी नोकरचाकर यांचे सहकार्य चांगले लाभेल.

दि. १५/०५/२०२५ पासूनचा कालखंड हा नोकरीतील व्यक्तींना अत्यंत लाभदायक व यशदायक ठरणार आहे, प्रगतीचा ठरणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. या कालखंडात नोकरीतील व्यक्तींना बढती मिळण्याची फार मोठी शक्यता आहे. तसेच पगारवाढीची शक्यता आहे. वरील कालखंडात तुमच्या प्रगतीच्या आड कोणीही येऊ शकणार नाही. या कालखंडात हितशत्रुंच्या कारवाया व विरोधकांच्या कारवाया थंड पडतील. वरील कालखंडात तुम्हाला मिळणाऱ्या प्रगतीआड कोणीही येऊ शकणार नाही.

नोकरीत अधिक चांगला कालखंड

दि. १५/०६/२०२५ ते दि. १६/०७/२०२५ दि. १६/०८/२०२५ से दि. ०९/१०/२०२५ दि. २६/११/२०२५ ते दि. १४/१२/२०२५

प्रॉपटी

जागा, जमिनी, बंगला, फ्लैट, वाहन खरेदी व गुंतवणूक या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक राहणार असल्यामुळे तुमची स्वप्ने, मनोरथ प्रत्यक्षात उतरणार आहेत. वास्तू व बाहन खरेदीसाठी हे वर्ष अनुकूल आहे. दि. २८/०१/२०२५ ते दि. ३०/०५/२०२५ दि. २६/०७/२०२५ ते दि. २०/०८/२०२५ दि. १४/०९/२०२५ ते दि. ०९/१०/२०२५ दि. २६/११/२०२५ ते दि. २०/१२/२०२५

संततिसौख्य संततिसौख्य,

मुला-मुलींची प्रगती, त्यांचे शाळा कॉलेजमधील प्रवेश, परीक्षेतील यश, नोकरी, व्यवसायाचे प्रश्न, त्यांची एकूणच प्रगती या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूपच चांगले आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल, परीक्षांचे निकाल अनुकुल लागतील. योग्य शिक्षण संस्थेत प्रवेश मिळेल. नोकरी, व्यवसायाचे प्रश्न मार्गी लागतील. संपूर्ण वर्षभर गुरू अनुकूल आहे. त्याचा चांगला फायदा होईल.

वैवाहिक सौख्य

वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष सौख्यकारक आहे. विशेषतः हे संपूर्ण वर्ष विवाहेच्छुक मुला-मुलींच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष अत्यंत चांगले आहे. त्यामुळे विवाहेच्छुक वृषभ राशीच्या मुला-मुलींना हे वर्ष विवाह जमणे व होणे या दृष्टीने निश्चित अनुकूल आहे. ज्यांचे काही वर्षे विवाह रखडलेले आहेत ते या वर्षी प्रश्न मार्गी लागतील,

प्रवास

प्रवास, तीर्थयात्रा, सहली, परदेश प्रवास या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना संपूर्ण वर्ष चांगले आहे. या वर्षी काहीचे ठरवून प्रवास होतील, तर काहींना अनपेक्षितरीत्या तीर्थयात्रेची व परदेश प्रवासाची संधी लाभणार आहे. संपूर्ण वर्ष प्रबासाला अनुकूल आहे. प्रवास सुखकारक होणार आहेत.

प्रवासाच्या दृष्टीने चांगला कालखंड दि.०१/०२/२०२५ ते दि. २८/०५/२०२५ दि. ०३/०७/२०२५ ते दि. १०/१०/२०२५ दि. २६/११/२०२५तेदि. २०/१२/२०२५

सुसंधी

सुसंधी, प्रसिद्धी, तुमच्या अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना कला, संगीत, नाटघ, लेखन, प्रकाशन, वृत्तपत्र, कायदा, प्रसारमाध्यमे व विविध क्षेत्रांमध्ये यश मिळणार आहे, संधी मिळणार आहे. हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक दृष्टीने चांगले जाणार आहे. ज्या संधीची काही वर्षे वाट पाहात होतात, ती संधी या वर्षी लाभणार आहे.

खालील कालखंड सुसंधी

प्रसिद्धीसाठी अनुकूल दि. ०१/०५/२०२५ ते दि. ३०/०५/२०२५ दि. ०८/०६/२०२५ ते दि. २२/०६/२०२५ दि. ०१/०८/२०२५ ते दि. २०/०८/२०२५ दि. ०४/०९/२०२५ ते दि. ०९/१०/२०२५ दि. २५/१०/२०२५ ते दि. १८/१२/२०२५

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता

काही वर्षे हुकलेले पद यावर्षी निश्चित मिळेल. तुमच्या अभ्यासाचा, विचारांचा, व्यासंगाचा, कर्तृत्वाचा ठसा तुम्ही उमटवू शकाल. नावलौकिक वाढेल, यश मिळेलत, उमेद बाढेल व उत्साह बावेल.

मान, प्रतिष्ठेसाठी अनुकूल कालखंड

दि. १५/०६/२०२५ ते दि. १६/०७/२०२५ दि. १७/०८/२०२५ ते दि. ०९/१०/२०२५ दि. २६/११/२०२५ ते दि. ३१/१२/२०२५

सारांश:

सारांश, वृषभ राशीच्या स्त्री, पुरुषांना हे वर्ष असामान्य यशाचे, असाधारण लाभाचे व अलौकिक प्रतिभेचे ठरणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT